1 लाखाचे झाले 84 लाख रुपये; चित्रपट क्षेत्रातील या कंपनीने गुंतवणूकदारांना दिलाय मजबूत परतावा!
कंपन्यांशी संबंधित सकारात्मक बातम्यांमुळे शेअर बाजारातील बहुतांश शेअर्स वधारले. पॉलीकॅब इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्येही अशीच वाढ झाली आहे. या कंपनीने भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावली आहे. या बातमीनंतर गुंतवणूकदार पॉलीकॅबच्या शेअर्सवर तुटून पडले आहे. पॉलीकॅब इंडियाच्या शेअर्सने 5 टक्के वाढ नाेंदवत, मुंबई शेअर बाजारात (बीएसई) 6934.15 रुपयांचा इंट्राडे उच्चांक गाठला आहे.
हे देखील वाचा – पैसे तयार ठेवा, …येतोय देशातील सर्वात मोठा आयपीओ; गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपणार!
वर्षभरात 32 टक्के वाढ
पॉलीकॅब इंडियाचा शेअर्स 15 ऑक्टोबर 2024 रोजी शेअर 7,607.15 रुपयांवर पोहोचला हाेता. हा शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. जानेवारी 2024 मध्ये हा शेअर 3,812.35 रुपयांवर होता. शेअर्सची ही 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी आहे. गेल्या एका वर्षात पॉलीकॅब इंडियाचे शेअर्स जवळपास 32 टक्के वाढले आहेत.
(फोटो सौजन्य – iStock)
काय सांगितलंय कंपनीने
स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये पॉलीकॅब इंडियाने म्हटले आहे की, कर्नाटक, गोवा आणि पुद्दुचेरीमध्ये भारत नेटच्या मिडल माईल नेटवर्कचे बांधकाम, अपग्रेडेशन, ऑपरेशन आणि देखभाल यासाठी ती सर्वात कमी बोली लावली आहे. कंपनी डिझाईन बिल्ड ऑपरेट अँड मेंटेन मॉडेलवर प्रकल्प सुरू करणार आहे. कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की, ऑर्डरचा आकार 4099.69 कोटी रुपये आहे. कंपनी तीन वर्षांत मिडल माईल नेटवर्क तयार करेल.
10 वर्षे देखभाल करणार
दोन्ही कंपन्यांमधील करारानुसार, पॉलीकॅब इंडिया प्रकल्पासाठी 10 वर्षांची देखभाल देखील करेल. देखरेखीसाठी पहिल्या पाच वर्षांसाठी भांडवली खर्चाच्या वार्षिक 5.5 टक्के आणि पुढील पाच वर्षांसाठी वार्षिक 6.5 टक्के भांडवली खर्च लागेल.
तिमाही निकालातील कंपनीची कामगिरी
आर्थिक वर्ष 2025 च्या सप्टेंबर तिमाहीत पॉलीकॅब इंडियाचा महसूल गेल्या वर्षीच्या 4,217.7 कोटी रुपयांच्या तुलनेत 30 टक्के वाढून, 5,498.4 कोटी रुपये झाला. त्याच वेळी जून तिमाहीतील 4,698 कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2025 च्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 17 टक्के वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 429.77 कोटींच्या तुलनेत 3 टक्के पेक्षा जास्त वाढून, 445.21 कोटी रुपये झाला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)