
Apple Pay वरही लागणार MDR? ( सौजन्य - सोशल मीडिया )
Apple युजर्ससाठी भारतात Apple Pay सुरू झाले आहे. सध्या, भारतात Axis Bank Visa आणि Mastercard क्रेडिट कार्डला सपोर्ट करते. याचा अर्थ असा की, आता आयफोन, ॲपल वॉच आणि इतर ॲपल उपकरणांचा वापर करून सहजपणे पेमेंट करता येणार आहे. पण यासगळ्यावर एक प्रश्न निर्माण होतो: जर UPI वापरून ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या व्यापारी पेमेंटवर MDR लागू होत असेल, तर ॲपल पे वापरून केलेल्या पेमेंटवरही MDR लागू होईल का?
१५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणाऱ्या नवीन UPI नियमांनुसार, ₹२,००० पेक्षा जास्त रकमेच्या निवडक व्यक्ती-ते-व्यापारी UPI पेमेंटवर ०.४% MDR लागणार आहे. पण ₹७५,००० किंवा त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांवर कमाल ₹३०० रुपयांचा MDR लागणार आहे. यामधून फक्त फ्यूल, टेलीकॉम, विमा आणि रेल्वे यांसारख्या काही अत्यावश्यक क्षेत्रांसाठी ₹५ चा एकसमान MDR निश्चित करण्यात आला आहे.
पण, ॲपल पे हे UPI वर नव्हे, तर क्रेडिट किंवा डेबिट कार्ड टोकनायझेशनवर चालते. त्यामुळे, ॲपल पे वापरून केलेल्या कोणत्याही कार्ड पेमेंटवर ०.४% MDR लागणार नाही.
येथे ॲपल पे आणि UPI मध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. ॲपल पे सुरुवातीला भारतात Visa आणि Mastercard क्रेडिट कार्डसोबत काम करत आहे. याचा अर्थ असा की, पेमेंट UPI द्वारे नव्हे, तर कार्ड नेटवर्कद्वारे प्रक्रिया केले जाते. क्रेडिट कार्ड पेमेंटवर MDR सारखे व्यापारी शुल्क देखील आकारले जाते. हे सामान्यतः व्यापारी आणि त्यांच्या पेमेंट प्रोव्हायडरमधील व्यवस्थेचा एक भाग असते. त्यामुळे, ॲपल पे द्वारे कार्ड पेमेंट स्वीकारताना व्यापाऱ्यांना पेमेंट प्रोसेसिंग खर्च येऊ शकतो.
सध्या, ॲपल पे भारतात व्हिसा आणि मास्टरकार्ड क्रेडिट कार्ड्ससोबत सुरू झाले आहे. सुरुवातीला UPI सपोर्ट देण्यात आला नव्हता. पूर्वीच्या अहवालांमध्ये असेही म्हटले होते की ॲपल पे सुरुवातीला भारतात कार्ड नेटवर्क्सद्वारे सुरू होईल आणि UPI ला सपोर्ट करणार नाही. त्यामुळे, जर तुम्ही ॲपल पे द्वारे कार्ड पेमेंट करत असाल, तर तुम्हाला UPI प्रमाणे MDR भरावा लागणार नाही.