Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका गाण्यासाठी घेतात 3 कोटी, 1700 कोटींची संपत्ती; वाचा… ए. आर. रहमान यांच्याकडे काय-काय आहे?

एआर रहमान यांची गणना सर्वाधिक कमाई करणाऱ्या संगीतकारांमध्ये केली होते. त्यांची एकूण संपत्ती 1700 कोटी रुपयांहून अधिक आहे. एआर रहमान आणि सायरा बानो जवळपास तीन दशके एकत्र राहिल्यानंतर वेगळे होत आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 20, 2024 | 05:46 PM
A R Rahman Hospitalized : संगीतकार ए आर रेहमान यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; नेमकं काय झालं होतं?

A R Rahman Hospitalized : संगीतकार ए आर रेहमान यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; नेमकं काय झालं होतं?

Follow Us
Close
Follow Us:

ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमानने पत्नी सायरा बानोपासून घटस्फोट घेतला आहे. या संदर्भात दोघांच्या वकिलांनी एक जाहीर निवेदन जारी केले असून, त्यात ते वेगळे होत असल्याचे सांगण्यात आले आहे. एआर रहमान आणि सायरा बानो जवळपास तीन दशके एकत्र राहिल्यानंतर वेगळे होत आहेत. एआर रहमानची गणना सर्वाधिक कमाई करणाऱ्या संगीतकारांमध्ये केली होते. त्यांची एकूण संपत्ती 1700 कोटी रुपयांहून अधिक आहे.

1995 मध्ये केले दोघांनी लग्न

एआर रहमान आणि सायरा यांचे लग्न 1995 मध्ये झाले होते आणि आता 29 वर्षांनंतर दोघेही घटस्फोट घेत आहेत. दोघांना तीन मुले आहेत. सार्वजनिक निवेदनानुसार दोघांनीही विचारपूर्वक विभक्त होण्याचा हा निर्णय घेतला आहे. सायराचे म्हणणे आहे की, या नात्यात तिला खूप वेदना होत होत्या. हे नाते जपणे तिच्यासाठी खूप कठीण झाले होते. त्यामुळे आपण हे नाते तोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

1700 कोटी आहे एआर रहमानची संपत्ती

ए आर रहमान यांना स्लमडॉग मिलेनियर या बॉलीवूड चित्रपटासाठी ऑस्कर मिळाला आहे. ते भारतातील महान संगीतकार म्हणून गणले जातात. म्युझिक इंडस्ट्रीतील मोठे नाव असण्यासोबतच कमाईच्या बाबतीतही एआर रहमान पुढे आहे. लाइफस्टाइल एशियाच्या अहवालानुसार, एआर रहमानची एकूण संपत्ती 200 ते 240 दशलक्ष डॉलर्स किंवा सुमारे 1700 कोटी रुपये इतकी आहे.

हे देखील वाचा – केवळ 1000 रुपये भांडवलात सुरु केला व्यवसाय; आज महिन्याला कमावतायेत तब्बल 2 लाख रुपये!

चित्रपटासाठी आकारतात इतकी फी

मीडीया रिपोर्ट्सनुसार, एआर रहमानने जेव्हा आपल्या करिअरची सुरुवात केली. तेव्हा त्याला त्याच्या पहिल्या चित्रपट रोजासाठी संगीत देण्यासाठी 25,000 रुपये मिळाले होते. आज त्यांनी देशातील सर्वात मोठे संगीतकार म्हणून आपला ठसा उमटवला आहे. आता एआर रहमान एका चित्रपटाच्या संगीतासाठी 8-10 कोटी रुपये घेतात. याशिवाय एक गाणे तयार करण्यासाठी ते अंदाजित 3 कोटी रुपये घेतात. तर केवळ एका तासाच्या लाइव्ह परफॉर्मन्ससाठी त्यांची फी ही 1-2 कोटी रुपये इतकी आहे. रहमानच्या निव्वळ संपत्तीचा एक मोठा भाग त्याच्या संगीत रचनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून येतो.

परदेशात घर, महागड्या गाड्यांचा संग्रह

मीडीया रिपोर्टनुसार, एआर रहमानचे भारतातच नाही तर परदेशातही घरे आहेत. चेन्नईतील बंगल्याशिवाय लॉस एंजेलिस, अमेरिका आणि दुबईमध्येही त्यांची घरे आहेत. एआर रहमान यांच्याकडे रोल्स रॉयस सेदान घोस्ट कार, बीएमडब्ल्यू 7 सीरीज, ऑडी क्यू7, मर्सिडीज बेंझ एस-क्लास, रेंजरओव्हर यांसारख्या लक्झरी कार आहेत.

मनोरंजन उद्योगाचा आतापर्यंतचा महागडा घटस्फोट

ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ग्रॅमी पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संगीत देण्याव्यतिरिक्त रहमान संगीत कार्यक्रम, जाहिराती आणि इतर माध्यमांतूनही भरपूर कमाई करतात. रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत आणि त्यांचा घटस्फोट मनोरंजन उद्योगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा घटस्फोट ठरेल अशी अटकळ बांधली जात आहे.

Web Title: Ar rahman net worth charges 3 crores for one song wealth worth 1700 crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 05:46 PM

Topics:  

  • AR Rahman

संबंधित बातम्या

A. R. Rahman: ए. आर. रेहमानवर चोरीचा आरोप, उच्च न्यायालयाने दंड ठोठावला, नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार कोट्यवधी रुपये
1

A. R. Rahman: ए. आर. रेहमानवर चोरीचा आरोप, उच्च न्यायालयाने दंड ठोठावला, नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार कोट्यवधी रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.