Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागड्या गाड्या, आलिशान घर; कोट्यधीश बाबा सिद्दिकी यांच्याकडे नेमकी किती होती संपत्ती?

माजी राज्यमंत्री तथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, दिग्दर्शकांशी जवळचे संबंध असणारे बाबा सिद्दिकी हे कोट्यधीश होते. त्यांच्याकडे महागड्या गाड्या होत्या. याच पार्श्वभुमीवर आज आपण त्यांच्या एकूण संपत्तीबाबत जाणून घेणार आहोत...

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 13, 2024 | 05:43 PM
बाबा सिद्दीकींच्या खात्यातील रक्कम चोरण्याचा मोठा डाव उधळला; मोबाईल नंबर अॅक्टिव्हेट करून बँक खातं...

बाबा सिद्दीकींच्या खात्यातील रक्कम चोरण्याचा मोठा डाव उधळला; मोबाईल नंबर अॅक्टिव्हेट करून बँक खातं...

Follow Us
Close
Follow Us:

माजी राज्यमंत्री तथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच बॉलिवूडमध्ये मोठे वजन असलेल्या या नेत्याची ऐन दसऱ्याच्या दिवशीच हत्या झाल्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, दिग्दर्शकांशी जवळचे संबंध असणारे बाबा सिद्दिकी हे कोट्यधीश होते. त्यांच्याकडे महागड्या गाड्या होत्या. याच पार्श्वभुमीवर आज आपण त्यांच्या एकूण संपत्तीबाबत जाणून घेणार आहोत…

किती आहे बाबा सिद्दिकी यांची एकूण संपत्ती?

बाबा सिद्दिकी यांचे शिक्षण 12 वी पर्यंत झालेले आहे. 2014 सालच्या निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या शपथपत्रानुसार बाबा सिद्दिकी हे एकूण 76 कोटी रुपये संपत्तीचे मालक होते. बाबा सिद्दिकी यांच्याकडे महागडे दागिने, महागड्या गाड्या देखील होत्या. दागिने आणि गाड्यांची जवळपास किंमत 30 कोटी रुपये होते. त्यांच्याकडे मर्सिडिज बेझ कार होती. सोन्याचे आणि हिऱ्याचे अनेक दागिने होते. 2009 सालच्या निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रानुसार 2009 साली त्यांची संपत्ती 25 कोटी रुपये होती.

हे देखील वाचा – बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन; धक्कादायक माहिती समोर

निवडणुकीतील शपथपत्रानुसार बाबा सिद्दिकी आणि त्यांच्या पत्नीकडे 2014 साली एकूण 6 कोटी रुपयांचे दागिने होते. बाबा सिद्दिकी यांच्या नावावर 2014 साली 4 कोटी रुपयांची एक व्यावसायिक इमारत होती. तर त्यांच्या पत्नीच्या नावे एकूण दोन व्यावसायिक इमारती आहेत. यातील एका इमारतीची किंमत 1 कोटी तर दुसऱ्या इमारतीची किंमत 91 लाख रुपये आहे. बाबा सिद्दिकी यांच्या नावे वांद्रे येथे 3 आणि 15 कोटी रुपयांच्या आणखी दोन व्यावसायिक इमारती देखील आहे.

दोघा आरोपींना अटक, दोघांचा शोध सुरू

बाबा सिद्दिकी यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ऐन दसऱ्याच्या म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना घडली. या हत्या प्रकरणातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. हे आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यामध्ये एका भाड्याच्या खोलीत राहत होते. बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी त्यांनी 2 लाख रुपयांची सुपारी घेतली होती. या हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Baba siddique shot dead expensive cars luxurious houses wealth did billionaire baba siddiqui

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 05:43 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.