तुम्हांला बॅंका कर्ज देणार की नाही? 'या' एका स्कोरवरून ठरते; वाचा... कसा सुधारेल तो?
आपल्यापैकी अनेकजण आपल्या विविध कामांसाठी प्रामुख्याने घर घेण्यासाठी, कार घेण्यासाठी याशिवाय अन्य गोष्टींसाठी कर्ज घेत असतो. त्यामुळे आता तुम्हांला देखील पैशाची गरज असेल. तुम्हाला देखील कर्ज घ्यायचे असेल. तुम्ही बँका आणि वित्तीय संस्थांच्या फेऱ्या मारत आहेत. मात्र, त्याआधी तुम्हांला कर्ज द्यायचे की नाही. हे बँका किंवा वित्तीय संस्था कोणत्या आधारावर ठरवतात, हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.
तुम्हांला बँका आणि वित्तीय संस्थांकडून किती कर्ज मिळेल, हे तुमच्या नावावर नोंदवलेल्या विशेष स्कोअरद्वारे ठरवले जाते. त्यास सिबिल स्कोर म्हणतात. सिबिल स्कोअर ही तीन अंकी संख्या असते. त्यास क्रेडिट माहिती अहवाल देखील म्हणतात. कर्ज घेण्याचा आणि त्याची परतफेड करण्याचा तुमचा संपूर्ण इतिहास या स्कोअरमध्ये दडलेला असतो. या क्रमांकाच्या आधारे कर्जाची परतफेड करण्यासाठी तुमची विश्वासार्हता किती चांगली आहे, हे बँका ठरवतात.
जानेवारी महिन्यात इतके दिवस राहतील बॅंका बंद; वाचा… सुट्ट्यांची संपूर्ण यादी!
सिबिल स्कोर काय असतो?
सिबिल स्कोर किंवा क्रेडिट माहिती अहवाल क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड नावाच्या एजन्सीद्वारे तयार केला जातो. या एजन्सीला थोडक्यात सिबिल असे म्हणतात. तुम्हांला कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर जाणून घेणे खुप गरजेचे आहे. तो 300 ते 900 च्या दरम्यान असतो. साधारणपणे 700 च्या वर स्कोअर चांगला मानला जातो. सिबिल वेबसाइटला भेट देऊन पेमेंट केल्यानंतर तुम्ही तुमच्या सिबिल स्कोअरबद्दल माहिती मिळवू शकतात. अनेक प्रकारच्या डिजिटल पेमेंट सेवा देखील तुम्हाला सिबिल स्कोअरची माहिती मोफत देत असतात.
सिबिल स्कोअरमध्ये तुमची वैयक्तिक माहिती, तुमचा संपर्क पत्ता, तुमचा कर्जाचा लाभ आणि परतफेडीचा इतिहास, तुमचा कर्जाचा जामीनदार होण्याविषयीची माहिती समाविष्ट असते. या स्कोअरची संख्या ही देखील दर्शवते की, तुम्ही एखाद्या विशिष्ट कालावधीत कर्जासाठी कुठे अर्ज केला होता, जो मंजूर झाला होता किंवा नाकारला गेला होता. या स्कोअरच्या आधारे कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठीच्या चौकशीचीही नोंद केली जाते.
सिबिल स्कोर सुधारण्यास किती दिवस लागतात
तुमचा सिबिल स्कोअर 700 पेक्षा कमी असेल, तर खात्री बाळगा की बँका किंवा वित्तीय संस्था तुम्हाला कर्ज देण्यास टाळाटाळ करतील. बहुतेक प्रकरणांमध्ये, ते कर्ज देण्यास स्पष्टपणे नकार देतील. त्यामुळे जर तुमचा स्कोअर कमी असेल तर किती दिवसात आणि कसा सुधारेल. आणि त्याद्वारे तुम्हांला कर्ज मिळेल. हे जाणून घेणार आहोत. सर्वसाधारणपणे तुमचा सिबिल स्कोर 650-700 दरम्यान असेल तर 750 पर्यंत पोहोचण्यासाठी चार ते 12 महिने लागू शकतात. जर तो 650 रुपयांपेक्षा कमी असेल, तर कर्ज मिळण्याची पातळी गाठण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.