फोटो सौजन्य- istock
ऑक्टोबर महिना येत्या 5 दिवसात सुरु होणार आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये महत्वाचे सण आले आहेत त्यामुळे अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात दसरा, दिवाळी अशा सणांमुळे आणि बॅंकाच्या नियमित सुट्ट्यांमुळे देशभरात जवळजवळ 15 दिवस बॅंकांना सुट्ट्या असणार आहेत. जर तुम्हाला बॅंकेशी निगडीत कोणतेही काम असल्यास या सुट्ट्यापाहून लवकरात लवकर आटपून घ्या.
बॅंकांच्या सुट्टीबद्दल रिझर्व्ह बॅंकेकडून महिन्याच्या सुरवातीलाच सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात येते. त्यामुळे या ऑक्टोबर महिन्याच्या यादीनुसार 31 दिवसांमध्ये 15 दिवसांची सुट्टी दिली गेली आहे. यामध्ये नियमित शनिवार रविवार सुट्ट्यांसोबतच सणांच्या सुट्ट्या ही दिल्या गेल्या आहेत. जाणून घेऊया या सुट्ट्यांबद्दल
ऑक्टोबर महिना आणि बॅंकांच्या सुट्ट्या
बँका बंद असल्या तरी तुमचे बहुतांश काम थांबणार नाहीत
ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या हंगामामुळे देशभरातील बॅंकाना 15 दिवसांकरिता सुट्टी असली तरीही तुमचे बहुतांश काम थाबणार नाही. या बॅंकांच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन बॅंकिगची सुविधा वापरून पैश्यांचा व्यवहार करु शकतात. पैसे रोखीने काढण्यासाठी एटीएमचाही वापर केला जाऊ शकतात.