बीअरच्या किमतीत अचानक वाढ (फोटो सौजन्य - IStock)
पब आणि पार्ट्या आता महाग होतील आणि खिसाही आता होईल रिकामा. हे वाचून तुम्हालाही आता डोक्याला हात लावावा लागणार आहे. या अवस्थेत बिअरच्या ग्लासने चिअर्स म्हणण्याची मजा थोडीशी बिघडणार आहे आणि आता लोक जड अंतःकरणाने बिअरचा ग्लास उचलू लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे नेमके काय असा जर प्रश्न असेल तर थांबा! आम्ही तुम्हाला सगळी माहिती सांगतोय.
कर्नाटक सरकारने बिअरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. २० जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बिअरच्या किमतीत ही वाढ १० ते ४५ रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने वेगवेगळ्या ब्रँडसाठी ही वाढ वेगवेगळ्या प्रकारे केली आहे. या निर्णयामुळे कर्नाटकात बिअरच्या विक्रीत घट होण्याची भीती आहे. याचा बिअर शॉप चालक आणि पब मालकांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कारण एका अहवालानुसार, त्यांना आधीच व्यावसायिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
बिअरचे उत्पादनही कमी होऊ शकते
कर्नाटक हे बिअर उत्पादनात देशातील आघाडीच्या राज्यांपैकी एक आहे. प्रत्येक ६५० मिली बिअरची किंमत १० रुपयांवरून ४५ रुपये केल्याने, बिअरची विक्री कमी झाल्यामुळे त्याचे उत्पादन देखील कमी होऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे आणि याचा नक्कीच व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही
देशातील 4 मोठ्या कंपन्यांना 1 लाख कोटीपेक्षा अधिक Loss, मुकेश अंबानींची कंपनीही यादीत समाविष्ट
१०० रुपयांच्या बाटलीची किंमत १४५ रुपये
कर्नाटक सरकारच्या ताज्या आदेशानंतर, १०० रुपयांच्या बिअरच्या बाटलीची किंमत १४५ रुपये होईल. त्याचप्रमाणे, २३० रुपयांची बाटली २४० रुपयांची होईल. कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार, उत्पादन शुल्क १८५ वरून १९५ टक्के करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारचा दावा आहे की उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलातील तोटा भरून काढण्यासाठी किमती वाढवण्यात आल्या आहेत. मात्र याचा परिणाम आता व्यवसायावर अधिक होणार असल्याचे दिसून येत आहे. कारण अचानक बीअर इतकी महागल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला नक्कीच झळ पोहचणार आहे ज्यामुळे अधिकाधिक विचार करत ग्राहक बीअरची बाटली विकत घेणे टाळूही शकते.
Share Market Today : ५ दिवसांत कमावले तब्बल २५००० कोटी; नाव ऐकून चक्रावून जाल
का वाढवले भाव
गेल्या वर्षी दारू विक्रीत वाढ झाली असली तरी, महसूल लक्ष्य साध्य होऊ शकले नाही. या कारणास्तव हे पाऊल उचलावे लागले आहे. तथापि, सरकारच्या दाव्यावर दारू विक्रेते समाधानी नाहीत. त्यांचा असा विश्वास आहे की आता दारूची विक्री १० टक्क्यांनी कमी होऊ शकते, अशा परिस्थितीत सरकारचे उत्पन्न किती वाढेल हे सांगणे कठीण आहे. फेडरेशन ऑफ वाईन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष करुणाकर हेगडे म्हणाले आहेत की, बाजारासाठी हा खूप वाईट काळ आहे. यानंतर, अशाप्रकारे किंमतवाढीमुळे खूप नुकसान होईल.