Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत आटा, तांदूळ, डाळ महागणार; ‘इतके’ वाढणार दर, सरकारच्या हालचाली सुरु!

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने स्वस्तातील भारत आटा, तांदूळ आणि डाळींच्या किमती वाढवण्याबाबत चर्चा केली असून, लवकरच वाढलेल्या किंमतीत त्यांची विक्री सुरू केली जाणार असल्याचे सरकारी पातळीवरून सांगितले जात आहे. त्यामुळे आता सणासुदीच्या काळात तुमच्या स्वयंपाक घरातील बजेट कोलमडणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 06, 2024 | 06:53 PM
भारत आटा, तांदूळ, डाळ महागणार; 'इतके' वाढणार दर, सरकारच्या हालचाली सुरु!

भारत आटा, तांदूळ, डाळ महागणार; 'इतके' वाढणार दर, सरकारच्या हालचाली सुरु!

Follow Us
Close
Follow Us:

केंद्र सरकारकडून देशभरातील गरिबांना स्वस्तात पीठ, तांदूळ आणि डाळी पुरवल्या जातात. ज्यामुळे अनेकांना आपले कुटूंब व्यवस्थित चालण्यास मदत होते. मात्र, आता सरकारकडून या स्वस्तात वितरित केल्या जाणाऱ्या भारत आटा, तांदूळ आणि डाळींच्या किंमती वाढवल्या जाणार आहे. असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता सणासुदीच्या काळात तुमच्या स्वयंपाक घरातील बजेट कोलमडणार आहे. नुकतीच या स्वस्तातील भारत आटा, तांदूळ आणि डाळींच्या किमती वाढवण्याबाबत सरकारच्या मंत्रिमंडळाने चर्चा केली असून, लवकरच वाढलेल्या किंमतीत त्यांची विक्री सुरू केली जाणार असल्याचे सरकारी पातळीवरून सांगितले जात आहे.

देशभरातील सर्वसामान्यांसाठी धक्का देणारी ही बातमी आहे. सरकारी पातळीवर झालेल्या चर्चेनुसार भारत आटा, तांदूळ, डाळ हे सर्व वाढलेल्या किमतीत विकले जाणार आहेत. आठवडाभरात त्यांची विक्री सुरू होईल. मात्र, यासाठी लोकांना अधिकची किंमत मोजावी लागणार आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

हे देखील वाचा – ओला इलेक्ट्रिकवरून पेटले शाब्दिक युद्ध; नितीन गडकरींच्याही नावाचा समावेश! वाचा… संपुर्ण प्रकरण!

काय असतील नवीन किंमती

– 10 किलो गहू पिठाची किंमत 275 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढणार आहे.
– 10 किलो तांदळाची किंमत 295 रुपयांवरून 320 रुपयांपर्यंत वाढणार आहे.
– 1 किलो हरभरा डाळीची किंमत 60 रुपयांवरून 70 रुपये किलो होणार आहे.

दरम्यान, भारत डाळ (मूग) चा दर 107 रुपये प्रति किलो ठेवला जाऊ शकतो. आणि यावेळी स्वस्त खाद्यपदार्थांच्या यादीत भारत डाळ (मसूर) समाविष्ट केली जाऊ शकते. यासाठी 89 रुपये दर निश्चित केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा – वाळवंटात फुलवली सफरचंदाची शेती; ‘ही’ महिला शेतकरी करतीये वर्षाला 40 लाखांची कमाई!

काय आहे सरकारचा प्लॅन?

सरकारला सध्या सरकारच्या राखीव कोट्यात असलेला जास्तीत जास्त तांदुळ वितरित करायचा आहे. एकीकडे सरकारला तांदळाच्या अनुदानावर फारसा खर्च करायचा नाही, तर दुसरीकडे स्टॉकमध्ये ठेवलेल्या तांदळाचा मोठा पुरवठाही समायोजित करायचा आहे. त्याचवेळी, विपणन वर्ष 2024-25 साठी नवीन सरकारी खरेदी देखील सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत गोदाम रिकामे करण्याचा दबाव असेल, जेणेकरून नवीन तांदूळ आणि गहू पिके ठेवण्यासाठी जागा निर्माण करता येईल. असेही सरकारी सुत्रांकडून सांगितले जात आहे.

Web Title: Bharat atta rice dal will become expensive discussion in the union cabinet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 06:53 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.