Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हीही ‘या’ बँकेचे खातेदार आहात का? आरबीआयकडून ‘या’ बड्या बँकेवर मोठी कारवाई!

देशातील बँकांची शिखर संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पूर्वांचल सहकारी बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया अलीकडेच मोठी कारवाई केली होती. त्यानंतर आता आरबीआयकडून पुन्हा एकदा नियमांचे पालन न केल्याचे कारण देत आणखी एका बड्या बँकेवर कारवाई करण्यात आली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 29, 2024 | 08:52 PM
तुम्हीही 'या' बँकेचे खातेदार आहात का? आरबीआयकडून 'या' बड्या बँकेवर मोठी कारवाई!

तुम्हीही 'या' बँकेचे खातेदार आहात का? आरबीआयकडून 'या' बड्या बँकेवर मोठी कारवाई!

Follow Us
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या नियमांचे पालन न केल्याने काही बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशातच आता आरबीआयने एका बड्या बँकेवर मोठी कारवाई केली आहे. प्रामुख्याने आरबीआयच्या काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हीही या बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला संबंधित बँकेवरील या कारवाईबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

काय आहे कारवाईमागील कारण?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याचे कारण देत हाँगकाँग आणि शांघाय बँक कॉर्पोरेशन (एचएसबीसी) या बँकेवर कारवाई केली आहे. या बँकेवर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि रुपे प्री पेड कार्ड्सबाबत कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इन्शुरन्स आणि कंडक्ट 2022 संदर्भात ही कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने एचएसबीसी बँकेला नियमांचे पालन न केल्यामुळे 29 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

काय म्हटलंय आरबीआयने आपल्या निवेदनात?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आरबीआयने एचएसबीसी बँकेला आपल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल आणि संबंधित पत्रव्यवहाराबद्दल नोटीस बजावली होती. तसेच या बँकेला आपल्या सूचनांचे पालन न केल्यामुळे दंड का ठोठावण्यात येऊ नये, याबाबत कारणे दाखवा. असे नोटीसमध्ये बजावण्यात आले होते. बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 46(4)(i) सह कलम 47A(1)(C) च्या तरतुदींनुसार आरबीआयला प्रदान केलेल्या अधिकारांनुसार हा दंड ठोठावण्यात आला आहे.”

‘या’ बँकांवरही कारवाईचा बडगा

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एका बँकेचा परवाना रद्द केला होता. उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील पूर्वांचल सहकारी बँकेवर आरबीआयने ही कारवाई केली होती. या कारवाईबाबत आरबीआयने म्हटले होते की, “पूर्वांचल सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाई करण्याची क्षमता नाही आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांना बँक बंद करण्याचे आणि लिक्विडेटरची नियुक्ती करण्याचे आदेश जारी करण्यास सांगितले होते. याशिवाय सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही आरबीआयने 1.45 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. आरबीआयने दिलेल्या काही मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआय म्हटले होते.

Web Title: Big action from rbi on hsbc bank fines 29 lakhs rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 08:50 PM

Topics:  

  • HSBC Bank
  • RBI
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू
1

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.