Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशभरातील ‘ही’ बँक खाती रडारवर; मोदी सरकार करणार सर्जिकल स्ट्राईक!

देशाने नोटबंदीचा अनुभव घेतला आहे. त्यानंतर गुलाबी नोटबंदी करण्यात आली. आता नागरिकांना अजून एका सर्जिकल स्ट्राईकला सामोरे जावे लागणार आहे. मोदी सरकार बँक खात्यावर स्ट्राईक करणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 08, 2024 | 07:50 AM
देशभरातील 'ही' बँक खाती रडारवर; मोदी सरकार करणार सर्जिकल स्ट्राईक!

देशभरातील 'ही' बँक खाती रडारवर; मोदी सरकार करणार सर्जिकल स्ट्राईक!

Follow Us
Close
Follow Us:

देशात इंटरनेट जसे स्वस्त झाले. तसा त्याचा वापर वाढला. आता 5G आणि 6G कडे देशाचा प्रवास सुरू झाला आहे. पण त्यासोबतच सायबर चाच्यांचे, सायबर गुन्हेगारांचे जाळे सुद्धा फोफावले आहेत. त्यांच्या जाळ्यात अडकून अनेकांचा मेहनतीचा पैसा गायब होत आहे. आता डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून फसवणुकीचा प्रकार वाढला. या सायबर भामट्यांवर नकेल कसण्यासाठी केंद्र सरकार सज्ज झाले आहे. त्यांच्या मुळावरच आता घाव घालण्यात येणार आहे. बोगस बँक खाती आता रडारवर आली आहेत.

बोगस बँक खाती रडारवर

केंद्र सरकारने बोगस बँक खाती बंद करण्याची तयारी केली आहे. बोगस खाती शोधण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून बँकिंग फसवणुकीवर रोख लावण्याचा प्रयत्न होणार आहे. यामुळे बोगस बँक खात्यांची माहिती समोर येईल. ‘म्यूलहंटर डॉट एआई’ या आधुनित तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केंद्रीय बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. त्याचा उपयोग करून अवघ्या काही मिनिटात अशा बोगस खात्याची माहिती समोर येईल.

बोगस खात्यांवर कशी होणार कारवाई?

आर्थिक सेवा सचिव एम. नागराजू यांच्या अध्यक्षतेखाली याविषयीची एक बैठक झाली. त्यात बँकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, म्यूल, बोगस खात्यांवर धडक कारवाई करावी आणि सर्वच बँकांनी अशा बोगस खात्यासंदर्भातील माहिती एकमेकांना शेअर करावी यावर भर देण्यात आला.

10 डिसेंबरला खुला होणार ‘हा’ आयपीओ; वाचा… किंमत पट्टा, कितीये लाॅट आकार!

वित्तीय सेवा विभागाने याविषयी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. नागरिकांच्या मेहनतीचा पैसा वाचवण्यासाठी आणि त्याच्या सुरक्षतेसाठी सक्रिय आणि आवश्यक उपाय करणे गरजेचे असल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच यासाठी सर्व बँकांनी एकमेकांना सहकार्य करण्याचे धोरण ठरवण्यास सूचवण्यात आले आहे.

बोगस खात्यांचा कसा करण्यात येतो वापर?

बोगस बँक खात्याचा वापर सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसा लुबाडण्यासाठी करतात. दुसर्‍याच व्यक्तीच्या कागदपत्रांआधारे अशी बँक खाती उघडण्यात येतात. सायबर गुन्हेगार लोकांना फसवणूक जी रक्कम वसूल करते, तो पैसा या बँक खात्यात जमा करण्यात येतो. एकदा या खात्यात पैसा आला की तो अन्य वेगवेगळ्या खात्यात जातो आणि मग सायबर गुन्हेगाराच्या मूळ खात्यात हस्तांतरीत होतो. त्यामुळे तो वसूल करणे अवघड होते.

 

Web Title: Big decision now after demonetization fake bank accounts are on the radar modi government will do a surgical strike on fake bank accounts to stop banking fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2024 | 07:50 AM

Topics:  

  • RBI

संबंधित बातम्या

Digital Rupee Wallet: आता पेमेंट होणार अजून सोपे, RBI वॉलेट नोंदणी करण्याची पद्धत घ्या जाणून
1

Digital Rupee Wallet: आता पेमेंट होणार अजून सोपे, RBI वॉलेट नोंदणी करण्याची पद्धत घ्या जाणून

UPI यूजर्स इकडे लक्ष द्या! RBI शेअर केल्या 5 स्मार्ट ट्रिक, तुमचे पैसे राहतील सुरक्षित
2

UPI यूजर्स इकडे लक्ष द्या! RBI शेअर केल्या 5 स्मार्ट ट्रिक, तुमचे पैसे राहतील सुरक्षित

गुलाबी नोटांसंदर्भात मोठी अपडेट! 2000 रुपयांच्या नोटा अजूनही चलनात? आरबीआयने केला धक्कादायक खुलासा
3

गुलाबी नोटांसंदर्भात मोठी अपडेट! 2000 रुपयांच्या नोटा अजूनही चलनात? आरबीआयने केला धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.