Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिबिल अपडेट ते तक्रार निवारण; सिबिल स्कोरबाबत आरबीआयचे 6 नवीन नियम माहितीये का?

क्रेडिट स्कोअरबाबत रिझर्व्ह बँकेकडे अनेक तक्रारी येत होत्या. यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सिबिल स्कोरबाबत 6 नवीन नियम केले होते.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 02, 2024 | 07:50 AM
सिबिल अपडेट ते तक्रार निवारण, सिबिल स्कोरबाबत आरबीआयचे 6 नवीन नियम माहितीये का?

सिबिल अपडेट ते तक्रार निवारण, सिबिल स्कोरबाबत आरबीआयचे 6 नवीन नियम माहितीये का?

Follow Us
Close
Follow Us:

क्रेडिट स्कोअरबाबत रिझर्व्ह बँकेकडे अनेक तक्रारी येत होत्या. यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सिबिल स्कोरबाबत 6 नवीन नियम केले होते. तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज सहज मिळेल. पण तुम्हाला सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी फक्त एक चूक टाळावी लागेल. पेमेंट न करणे ही चूक आहे. आत्तापर्यंत रिझर्व्ह बँकेने सिबिल वर एकूण 6 नियम केले आहेत, ज्याचा थेट फायदा तुम्हाला होणार आहे. या 6 नियमांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

1 ) सिबिल दर 15 दिवसांनी अपडेट होणार – या नवीन नियमानुसार आता दर 15 दिवसांनी ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर अपडेट केला जाणार आहे. हा नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. ग्राहकांचे सिबिल स्कोअर दर महिन्याच्या 15 तारखेला आणि शेवटी अपडेट केले जाऊ शकतात. याचा फायदा असा होईल की लोकांचा सिबिल स्कोर दर 15 दिवसांनी अपडेट केला जाणार आहे. बँकांना कोणालाही कर्ज देताना योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. त्याचवेळी, लोकांना त्यांचे बिघडलेले सिबिल सुधारण्याची संधी देखील लवकरच मिळेल आणि लोकांना देखील फायदा होईल.

2) सिबिल तपासण्यासाठी ग्राहकाला माहिती पाठवावी लागणार – जेव्हा जेव्हा एखादी बँक किंवा एनबीएफसी ग्राहकांचा क्रेडिट रिपोर्ट तपासते. तेव्हा त्या ग्राहकाला माहिती पाठवणे आवश्यक असते. ही माहिती एसएमएस किंवा ईमेलद्वारे पाठविली जाऊ शकते. वास्तविक, क्रेडिट स्कोअरबाबत अनेक तक्रारी समोर येत होत्या. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे.

घरात किती पैसे ठेवता येतात, वाचा… काय आहे नियम?

3) विनंती नाकारण्याचे कारण देणे आवश्यक – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, जर ग्राहकाची कोणतीही विनंती नाकारली गेली. तर त्याला त्याचे कारण सांगणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकाला त्याची विनंती का नाकारली गेली हे समजणे सोपे होईल. विनंती नाकारण्याच्या कारणांची यादी तयार करणे आणि ती सर्व क्रेडिट संस्थांना पाठवणे महत्त्वाचे आहे.

4) वर्षातून एकदा ग्राहकांना मोफत संपूर्ण क्रेडिट रिपोर्ट द्या – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, क्रेडिट कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना वर्षातून एकदा विनामूल्य पूर्ण क्रेडिट स्कोअर प्रदान केला पाहिजे. यासाठी, क्रेडिट कंपनीला त्यांच्या वेबसाइटवर एक लिंक प्रदर्शित करावी लागेल. जेणेकरुन ग्राहकांना त्यांचा विनामूल्य संपूर्ण क्रेडिट अहवाल सहज तपासता येईल. यासह, ग्राहकांना त्यांचा सिबिल स्कोर आणि वर्षातून एकदा पूर्ण क्रेडिट इतिहास कळेल.

5) डिफॉल्टची तक्रार करण्यापूर्वी ग्राहकाला माहिती देणे आवश्यक – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, जर ग्राहक डिफॉल्ट होणार असेल तर डिफॉल्टची तक्रार करण्यापूर्वी ग्राहकाला माहिती देणे आवश्यक आहे. कर्ज देणाऱ्या संस्थांनी सर्व माहिती एसएमएस/ई-मेल पाठवून शेअर करावी. याशिवाय बँका आणि कर्ज वाटप करणाऱ्या संस्थांनी नोडल अधिकारी नेमावेत. क्रेडिट स्कोअर संबंधित समस्या सोडवण्यासाठी नोडल अधिकारी काम करतील.

6) ग्राहकांच्या तक्रारीचे 30 दिवसांत निराकरण करावे, अन्यथा दंड होणार – जर क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीने ग्राहकांच्या तक्रारीचे 30 दिवसांत निराकरण केले नाही, तर त्यांना प्रतिदिन 100 रुपये दंड भरावा लागेल. म्हणजेच जितक्या उशिरा तक्रारीचे निराकरण होईल, तितका अधिक दंड भरावा लागेल. कर्ज वाटप करणाऱ्या संस्थेला 21 दिवस आणि क्रेडिट ब्युरोला 9 दिवसांचा कालावधी मिळेल. जर बँकेने 21 दिवसांच्या आत क्रेडिट ब्युरोला माहिती दिली नाही तर बँक नुकसान भरपाई देईल. बँकेकडून माहिती दिल्यानंतर 9 दिवसांनंतरही तक्रारीचे निराकरण न झाल्यास क्रेडिट ब्युरोला नुकसान भरपाई द्यावी लागेल.

Web Title: Business rbi rules for cibil score news rbi has made 6 rules regarding cibil score

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2024 | 07:50 AM

Topics:  

  • RBI

संबंधित बातम्या

FD सोडा! RBI च्या फ्लोटिंग रेट्स बाँडमध्ये गुंतवणूक केल्याने मिळेल ‘जबरदस्त’ रिटर्न
1

FD सोडा! RBI च्या फ्लोटिंग रेट्स बाँडमध्ये गुंतवणूक केल्याने मिळेल ‘जबरदस्त’ रिटर्न

ATM Safety Facts: एटीएममधील ‘Cancel’ बटण दोनदा दाबल्याने PIN सुरक्षित राहतो का? जाणून घ्या सत्य!
2

ATM Safety Facts: एटीएममधील ‘Cancel’ बटण दोनदा दाबल्याने PIN सुरक्षित राहतो का? जाणून घ्या सत्य!

UPI Payment Error: UPI पेमेंट फेल? नेटवर्क, सर्व्हर डाऊन की सुरक्षा अलर्ट — जाणून घ्या खरे कारण
3

UPI Payment Error: UPI पेमेंट फेल? नेटवर्क, सर्व्हर डाऊन की सुरक्षा अलर्ट — जाणून घ्या खरे कारण

Dormant Account Activation: तुमचे खाते बंद झालेय? पुन्हा सक्रिय करण्यासाठी वाचा ही माहिती
4

Dormant Account Activation: तुमचे खाते बंद झालेय? पुन्हा सक्रिय करण्यासाठी वाचा ही माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.