Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सीएसआर उपक्रमामुळे कर्करोग निदान क्षमता झाली दुप्पट

सीएसआर प्रकल्‍पामध्‍ये पीईटी-सीटी रूमच्‍या पायाभूत सुविधांमधील सर्वसमावेशक अपग्रेड्सचा देखील समावेश आहे, जसे नवीन फिक्‍स्‍चर्स, फ्लोअरिंग, कंट्रोल कन्‍सोल्‍स, एलईडी ग्‍लास पॅनेल्‍स आणि सुधारित सीटिंग क्षमतेचा समावेश आहे

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: May 15, 2025 | 06:32 PM
टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सीएसआर उपक्रमामुळे कर्करोग निदान क्षमता झाली दुप्पट (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सीएसआर उपक्रमामुळे कर्करोग निदान क्षमता झाली दुप्पट (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

कर्करोगाच्या उपचारांना चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, कोटक महिंद्रा बँकेने त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत, मुंबईतील परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील निदान क्षमतांमध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे. बँकेने अत्याधुनिक पीईटी-सीटी स्कॅनर खरेदी आणि स्थापनेसाठी निधी दिला आहे जो रुग्णालयाची दैनंदिन स्कॅन क्षमता दुपट्ट करेल, सध्या दैनंदिन स्कॅन क्षमता २० आहे जी दुपट्ट होऊन ४० होईल.

हे प्रगत हायब्रिड इमेजिंग तंत्रज्ञान कर्करोगाच्या सुरुवातीच्या काळात शोध, थेरपी मूल्यांकन आणि पुनरावृत्ती देखरेखीसाठी महत्त्वपूर्ण आहे, ज्यामुळे वेळेवर आणि अचूक निदान सुनिश्चित होते. दररोज ८०-१०० पीईटी सीटी स्कॅनपैकी जवळजवळ ६०% स्कॅन अत्यंत अनुदानित दराने (भारतातील सर्वात कमी आणि काही पूर्णपणे मोफत) दिले जातात. कोटकच्या समर्थनामुळे रुग्णांच्या वाट पाहण्याचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि प्रगत कर्करोग निदानाची उपलब्धता सुधारेल.

‘या’ कारणांनी शेअर बाजारात विक्रमी वाढ, मार्केट कॅप ५ लाख कोटींनी वाढला

कोटक महिंद्रा बँकेचे सीएसआर आणि ईएसजी प्रमुख हिमांशू निवसरकर म्हणाले, “हा उपक्रम भारताच्या आरोग्यसेवा परिसंस्थेला, विशेषतः कर्करोगाच्या काळजीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये, बळकट करण्यासाठी कोटकच्या सततच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करतो. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नवीन पीईटी-सीटी स्कॅनर बसवण्यास पाठिंबा देऊन, आम्हाला आशा आहे की अधिक रुग्णांना वेळेवर आणि अचूक निदान करणे सोपे होईल, जे त्यांच्या उपचार प्रवासात एक महत्त्वाचे पहिले पाऊल असेल.”

टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सीएस प्रमेश म्हणाले, “टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्‍ये आमच्‍या सर्व रूग्‍णांच्‍या वतीने आम्‍ही कोटक महिंद्रा बँकेचे आम्‍हाला आमच्‍या जुन्‍या पीईटी-सीटी स्‍कॅनरला बदलण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी त्‍यांनी वेळेवर दिलेल्‍या पाठिंब्‍याकरिता आभार व्‍यक्‍त करतो, जेथे आधीच्या पीईटी-सीटी स्‍कॅनरची क्षमता समाप्‍त झाली होती आणि हे साह्य अगदी योग्‍य वेळी करण्‍यात आले आहे. नवीन पीईटी-सीटी स्‍कॅनर अधिक कार्यक्षम आहे, दररोज अधिक स्‍कॅन करू शकतो आणि आम्‍हाला रूग्‍णांना सर्वोत्तमपणे सेवा देण्‍यास मदत करतो. यासाठी आम्‍ही कोटक आणि त्‍यांच्‍या सीएसआर टीमचे ऋणी आहोत. यासारखे सपोर्ट आम्‍हाला रूग्‍णांना दर्जेदार केअर देण्‍यास मदत करतात, जेथे बहुतांश रूग्‍णांवर अत्‍यंत सवलतीच्‍या दरात आणि कधी-कधी पूर्णपणे मोफत उपचार केले जातात.”

सीएसआर प्रकल्‍पामध्‍ये पीईटी-सीटी रूमच्‍या पायाभूत सुविधांमधील सर्वसमावेशक अपग्रेड्सचा देखील समावेश आहे, जसे नवीन फिक्‍स्‍चर्स, फ्लोअरिंग, कंट्रोल कन्‍सोल्‍स, एलईडी ग्‍लास पॅनेल्‍स आणि सुधारित सीटिंग क्षमता, जे सर्व अॅटॉमिक एनर्जी रेग्‍युलेटरी बोर्ड (एईआरबी) नॉर्म्‍सनुसार आहेत. या सुधारणा टाटा मेमोरिअल हॉस्पिटलला अधिकाधिक रूग्‍णांना सामावून घेण्‍यास आणि ऑपरेशनल कार्यक्षमता सानुकूल करण्‍यास सक्षम करेल. तसेच, भारतात सहजसाध्य व समान आरोग्‍यसेवा प्रदान करण्‍याप्रती आपली कटिबद्धता कायम राखत कोटक महिंद्रा बँकेने आपल्‍या सीएसआर उपक्रमांतर्गत वाराणसीमधील टाटा मेमोरिअल हॉस्पिटल केंद्र महामना पंडित मदन मोहन मालवीय कॅन्‍सर सेंटर (एमपीएमएमसीसी हॉस्पिटल)साठी आपला पाठिंबा दर्शवला आहे.

Share Market Closing Bell: शेअर बाजारात मोठी रिकव्हरी; सेन्सेक्स १२०० अंकांनी वधारला, निफ्टी २५,००० च्या वर झाला बंद झाला

Web Title: Cancer diagnosis capacity doubled at tata memorial hospital due to csr initiatives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 06:32 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.