Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता; शार्क टँकचे जज अमन गुप्ता मोठा निर्णय घेणार!

सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्या आपले आयपीओ घेऊन आलेल्या आहेत. असे असताना लवकरच अमन गुप्ता बोट या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 16, 2024 | 08:00 PM
शेअर बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता; शार्क टँकचे जज अमन गुप्ता मोठा निर्णय घेणार!

शेअर बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता; शार्क टँकचे जज अमन गुप्ता मोठा निर्णय घेणार!

Follow Us
Close
Follow Us:

शार्क टँकचे जज आणि हेडफोन तसेच इअरफोन तयार करणाऱ्या बोट या कंपनीचे मालक अमन गुप्ता यांच्यामुळे शेअर बाजारात लवकरच मोठ्या घडामोडी घडू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार डेली वियर वॉच तसेच ऑडियो प्रोडक्ट्स तयार करणाऱ्या बोट या ब्रँडचा पुढच्या वर्षी आयपीओ येण्याची शक्यता आहे. हा आयपीओ एकूण 4000 कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. या आयपीओसाठी बोट कंपनीने आयसीआयसीआय सिक्योरिटीज, गोल्डमॅन सॅक्स आणि नोमुरा यांची बँकर म्हणून नियुक्ती केली आहे.

बोट आयपीओची कधीपासून होतेय चर्चा

बोट या कंपनीच्या आयपीओसाठी 2022 मध्ये सेबीकडे ट्राफ्ट पेपर दाखल करण्यात आले होते. मात्र, बाजाराची स्थिती लक्षात घेऊन हा आयपीओ थांबवण्यात आला होता. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये बोट या कंपनीचा महसूल 5 टक्क्यांनी घसरून, 3285 कोटी रुपयांवर राहिलेला आहे. असे असतानाच आता बोट या कंपनीचा आयपीओ येणार असल्याची चर्चा आहे. वित्त वर्ष 24 मध्ये कंपनीने आपला तोटा 50 टक्क्यांनी कमी करून, 70.8 कोटी रुपयांवर आणला आहे. आयपीओ येण्याआधी सणासुदीच्या काळातही बोट या कंपनीच्या ऑडिओ सेगमेंटमधील प्रोडक्टसची विक्री वाढली होती.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – …लवकरच शेअर बाजारात दाखल होणार ‘हा’ आयपीओ; वाचा… कधी खुला होणार!

बोटची बाजारात किती हिस्सेदारी?

मार्केट ट्रॅकर आयडीसीनुसार जूनच्या तिमाहीत या कंपनीच्या वियरेबल्स सेगमेंटच्या शिपमेंटमध्ये 10 टक्क्यांची घसरण झालेली आहे. वियरेबल्स सेगमेंटमध्ये वायरलेस ऑडियो डिव्हाईस आणि स्मार्टवॉच यांचा समावेश आहे. अमन गुप्ता आणि समीर मेहता या दोघांनी मिळून 2014 रोजी बोट या कंपनीची सुरुवात केली होती. बोट या कंपनीने आतापर्यंत 171 मिलियन डॉलर्सचा फंड उभा केलेला आहे. या कंपनीची भारतात वियरेबल्स सेगमेंटमध्ये बाजारात एकूण 26.7 टक्के हिस्सेदारी आहे.

कंपनीची सुरुवात कशी झाली होती?

अमन गुप्ता यांनी समीर मेहता यांना सोबत घेऊन 2014 साली बोट या कंपनीची सुरुवात केली होती. या काळात अमन गुप्ता यांच्याकडे जास्त पैसे नव्हते. त्यांनी आपल्या या व्यवसायाच सुरुवात 30 लाख रुपयांच्या भांडवलापासून केली होती. आज ही कंपनी 11500 कोटी रुपयांची आहे. दरम्यान, बोट कंपनीचा आयपीओ नेमका कधी येणार? हा आयपीओ आलाच तर त्याचा किंमत पट्टा किती असेल? याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Chances of large turnover in the stock market shark tank judge aman gupta will make a big decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 08:00 PM

Topics:  

  • IPO

संबंधित बातम्या

IPO मार्केटने गुंतवणूकदारांना दिला धक्का, तुमचे पैसे बुडणार? नेमक प्रकरण काय? जाणून घ्या
1

IPO मार्केटने गुंतवणूकदारांना दिला धक्का, तुमचे पैसे बुडणार? नेमक प्रकरण काय? जाणून घ्या

नफा कमावण्याची मोठी संधी! 34.02 कोटींचा IPO उद्या उघडणार; किंमत पट्टा 59-63 प्रति शेअर
2

नफा कमावण्याची मोठी संधी! 34.02 कोटींचा IPO उद्या उघडणार; किंमत पट्टा 59-63 प्रति शेअर

WeWork India चा IPO 3 ऑक्टोबरपासून सब्सक्रिप्शनसाठी खुला; कंपनी 3000 कोटी रुपये उभारणार
3

WeWork India चा IPO 3 ऑक्टोबरपासून सब्सक्रिप्शनसाठी खुला; कंपनी 3000 कोटी रुपये उभारणार

IPO: एकाच दिवशी तीन IPO उघडणार, ग्लोटिस-फॅबटेक आणि ओम फ्रेटमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी
4

IPO: एकाच दिवशी तीन IPO उघडणार, ग्लोटिस-फॅबटेक आणि ओम फ्रेटमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.