'कोका-कोला'चे पर्यावरण पुरकतेच्या दिशेने मोठे पाऊल, १०० टक्के पुनर्वापर होणाऱ्या बॉटल्स लॉन्च!
कोका-कोला इंडिया या देशातील आघाडीच्या शीतपेय कंपनीने पर्यावरण पुरकतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. कंपनीकडून २५० मिली आपल्या बॉटल्समध्ये १०० टक्के पुनर्वापर होणाऱ्या पीईटीसह, अफोर्डेबल स्मॉल स्पार्कलिंग पॅकेजमध्ये (एएसएसपी) कोका-कोलाच्या बॉटल्स लाँच करण्याची घोषणा केली आहे. ज्याची सुरूवात आता ओरिसा या राज्यापासून झाली आहे. ज्यामुळे आता नवीन २५० मिमी एएसएसपीमधील १०० टक्के पुनर्वापर होणाऱ्या पीईटीमुळे आरपीईटी, नॉन-एएसएसपी व्हर्जिन पीईटीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जनांमध्ये ६६ टक्के घट होणार आहे.
कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार
कोका कोला कंपनीची बॉटलिंग पार्टनर हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस् प्रा. लि.(एचसीसीबीपीएल) या कंपनीद्वारे हा उपक्रम राबवला जात आहे. ज्यामुळे आता कंपनीची शाश्वततेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. कंपनीच्या या उपक्रमामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय कंपनीने अफोर्डेबल स्मॉल स्पार्कलिंग पॅकेज (एएसएसपी) देखील लाँच केले आहे.
‘शाश्वत पर्यावरणाच्या दिशेने मोठे पाऊल’
याबाबत बोलताना हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस् (एचसीसीबी) च्या वितरण साखळी विभागाचे कार्यकारी संचालक अलोक शर्मा यांनी म्हटले आहे की, ”एएसएसपीमध्ये रिसायकल्ड पीईटीचे सादरीकरण प्लास्टिक पुनर्वापर करणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ज्यामुळे कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. हा उपक्रम शाश्वत पर्यावरणाच्या दिशेने मोठे पाऊल आहे. देशातील शीतपेय उद्योगाला पर्यापूरकतेनुसार घेऊन जाणे, आपला दृष्टिकोन असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
२०३० पर्यंत ५० टक्के ध्येय गाठणार
तर कोका-कोला इंडिया व साऊथवेस्ट एशियाच्या टेक्निकल इनोव्हेशन आणि वितरण साखळी विभागाचे उपाध्यक्ष एनरिक अॅकरमन यांनी म्हटले आहे की, भारतात आरपीईटी विस्तारित करण्यासह देशातील ग्राहकांना उच्च दर्जाचे, फूड-ग्रेड, पुनर्वापर केलेले प्लास्टिक उपलब्ध करून देण्याप्रती आपली कटिबद्धता आहे. या पर्यावरणपूरक बॉटल्ससह पॅकेजिंगसाठी पुनर्वापर अर्थव्यवस्थेला गती देण्याचा, कचरा व कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न आहे. ज्यामुळे आपण २०३० पर्यंत ५० टक्के पुनर्वापर केलेल्या बॉटल्स निर्माण करण्याचे ध्येय गाठू शकतो” असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोका-कोला कंपनी ही ४० हून अधिक बाजारपेठांमध्ये १०० टक्के आरपीईटी बॉटल्स देते. २०२५ पर्यंत कंपनीने जागतिक स्तरावर कंपनीचे १०० टक्के पॅकेजिंग पुनर्वापर करण्याचा आणि २०३० पर्यंत पॅकेजिंगमध्ये किमान ५० टक्के पुनर्वापर केलेल्या घटकांचा वापर करण्याचा कंपनीचा उद्देश आहे.