दसरा-दिवाळीपूर्वी महागाईचा झटका, LPG सिलिंडरच्या दरात वाढ, वाचा नवे दर (फोटो सौजन्य-X)
ऑक्टोबर महिना सुरु होताच दसरा आणि दिवाळी सणाचे वेध लागतात. मात्र त्याचपूर्वी नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आता व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 48.50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या वेबसाइटनुसार, नवीन दर आजपासून (Commercial LPG cylinder rates) लागू झाले आहेत.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 48.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत 19 किलोचा सिलेंडर आता 1740 रुपयांना मिळणार आहे, तर आधी त्याची किंमत 1691 रुपये होती. कोलकात्यात त्याची किंमत 1850.50 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1802 रुपये होती. मुंबईत तो 1692.50 रुपये तर चेन्नईत 1903 रुपये झाला आहे.
14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. हा सिलिंडर दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना उपलब्ध आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत 603 रुपये आहे. तर 1 सप्टेंबर 2024 रोजी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1691 रुपये, कोलकात्यात 1802 रुपये, मुंबईत 1644 रुपये आणि चेन्नईमध्ये 1855 रुपये होती. ऑगस्टमध्ये या किमती दिल्लीत 1652.50 रुपये, कोलकात्यात 1764.50 रुपये, मुंबईत 1605 रुपये आणि चेन्नईमध्ये 1817 रुपये होत्या.
या वर्षी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती अनेक वेळा वाढवल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारने महिला दिनानिमित्त मोठा दिलासा दिला आहे. या वर्षी मार्च महिन्यात सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांपर्यंत कपात केली होती.