Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईएफ पॉलिमर द/नज: डीसीएम श्रीराम अ‍ॅगवॉटर चॅलेंजचा विजेता म्‍हणून २ कोटी रूपयांसह पुरस्‍कारित

The Nudge: जून २०२३ मध्ये सुरू झालेल्या, तसेच त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू झालेल्या कोहर्टसह डीसीएम श्रीराम अॅगवॉटर चॅलेंज भारतातील १ दशलक्ष अल्‍पभूधारक शेतकऱ्यांसाठी पाण्याची कार्यक्षमता, उत्पादकता आणि नफा वाढवण्याच्य

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Mar 03, 2025 | 07:01 PM
ईएफ पॉलिमर द/नज: डीसीएम श्रीराम अ‍ॅगवॉटर चॅलेंजचा विजेता म्‍हणून २ कोटी रूपयांसह पुरस्‍कारित (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

ईएफ पॉलिमर द/नज: डीसीएम श्रीराम अ‍ॅगवॉटर चॅलेंजचा विजेता म्‍हणून २ कोटी रूपयांसह पुरस्‍कारित (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

The Nudge Marathi News: भारत सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालयासोबत सहयोगाने डीसीएम श्रीराम फाउंडेशन आणि द/नज इन्स्टिट्यूटने ईएफ पॉलिमरला डीसीएम श्रीराम अॅगवॉटर चॅलेंजचा विजेता म्हणून घोषित केले. प्रमुख अतिथी म्हणून भारताचे जी२० शेर्पा आणि नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रॅण्‍ड फिनालेमध्‍ये भारतातील अल्‍पभूधारक शेतकऱ्यांकरिता पाणी वापर कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी त्याच्या अग्रगण्य उपायांसाठी ईएफ पॉलिमरला २ कोटी रुपयांसह सन्‍मानित करण्‍यात आले. फार्म२फोर्क टेक्‍नॉलॉजीजचे कृषी-तंत्रज्ञान व्यासपीठ असलेल्या कल्टवायव्हेटला देखील विशेष मान्यता मिळाली आणि सिंचन सुलभ करणाऱ्या व शेतकऱ्यांना प्रभावी निर्णय घेण्यास सल्ला देणाऱ्या स्मार्ट सिंचन सिस्‍टम्‍स विकसित करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल २५ लाख रुपयांसह पुरस्‍कारित करण्‍यात आले.

जून २०२३ मध्ये सुरू झालेल्या, तसेच त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू झालेल्या कोहर्टसह डीसीएम श्रीराम अॅगवॉटर चॅलेंज भारतातील १ दशलक्ष अल्‍पभूधारक शेतकऱ्यांसाठी पाण्याची कार्यक्षमता, उत्पादकता आणि नफा वाढवण्याच्या उद्देशाने डिझाइन करण्‍यात आले होते, ज्यामध्ये ऊस, गहू, भात आणि कापूस या चार प्रमुख जल-केंद्रित पिकांवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले होते. या चॅलेंजसाठी १३४ अर्ज मिळाले, त्यापैकी १६ अॅगटेक संस्थांची या कोहर्टसाठी निवड करण्‍यात आली, ज्यांनी सिंचन, बायोएग इनपुट, सल्लागार सेवा आणि इतर क्षेत्रात नाविन्‍यतांना चालना दिली. मूल्यांकनानंतर यशस्वी क्षमतेसाठी चार फायनालिस्‍ट्सची
निवड करण्‍यात आली: ईएफ पॉलिमर, कल्टवायव्हेट, इंडसटिल आणि फायफार्म. एकत्रित, या फायनालिस्‍ट्सनी गेल्या वर्षी जवळपास १५,००० अल्‍पभूधारक शेतकऱ्यांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला.

Jharkhand Budget: अर्थमंत्री राधाकृष्ण किशोर यांनी सादर केला अबुआ अर्थसंकल्प, शिक्षण आणि समाजकल्याणावर भर

भारताला गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, दरडोई पाण्याची उपलब्धता १,४८६ घनमीटरपेक्षा कमी झाली आहे, हे प्रमाण पाण्याच्या कमतरतेसाठी १,७०० घनमीटर मर्यादेपेक्षा खूपच कमी आहे. भारतातील ७८ टक्‍के गोड्या पाण्याचा वापर करणारी शेती प्रमुख स्रोत आहे, ६२ टक्‍के पाणी भूजलाच्या वेगाने कमी होत असलेल्या पातळीमधून मिळते. सध्याच्या दराने २०३० पर्यंत भारताच्या पाण्याच्या गरजांसाठी फक्‍त ५० टक्‍के पाणी शिल्लक राहील, ज्यामुळे ६०० दशलक्ष शेतकऱ्यांना धोका निर्माण होईल. डीसीएम श्रीराम अॅगवॉटर चॅलेंज अॅगवॉटरटेक संघटनांच्या तांदूळ, गहू, ऊस आणि कापूस यांसारख्या पाणी-केंद्रित पिकांसाठी स्केलेबल, उच्‍च-प्रभावी उपाय तयार करण्याची क्षमता दाखवते, जे वाढती पाणीटंचाई आणि हवामान-संबंधित आव्हानांना तोंड देणाऱ्या अल्‍पभूधारक शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी महत्त्वपूर्ण आहेत.

डीसीएम श्रीराम लिमिटेडचे अध्यक्ष व वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक आणि डीसीएम श्रीराम फाउंडेशनचे संचालक श्री. अजय एस. श्रीराम म्हणाले, “पाणी शेतीसाठी सर्वात महत्त्वाचे संसाधन आहे. देशातील गंभीर पाणीटंचाई पाहता हे चॅलेंज अल्‍पभूधारक शेतकऱ्यांकरिता पाण्याचा वापर अधिक कार्यक्षम करण्यासाठी सर्वागीण, आधुनिक उपाय शोधण्यासाठी आणि त्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी महत्त्वाचे मिशन आहे. आम्ही विजेत्याचे, इतर अंतिम स्पर्धकांचे त्यांच्या अग्रगण्य कार्याबद्दल अभिनंदन करतो आणि हे उपाय देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणताना पाहण्यास उत्सुक आहोत.

द/नज प्राइजचे संचालक कनिष्क चॅटर्जी म्हणाले, “भारतात एकूण शेतकऱ्यांपैकी जवळपास ८५ टक्‍के अल्‍पभूधारक शेतकरी असल्याने भारतातील शेतीला आकार देण्यासाठी अशा उपाययोजनांचा समावेश केला पाहिजे, ज्यामुळे त्यांना पाणी अधिक कार्यक्षमतेने वापरण्यास, उत्पादकता वाढवण्यास आणि दीर्घकालीन स्थिरता निर्माण करण्यास मदत होईल. गेल्या २ वर्षात डीसीएम श्रीराम अॅगवॉटर चॅलेंजने दाखवून दिले आहे की, अॅगवॉटरटेक संस्था मोठ्या प्रमाणात नाविन्यपूर्ण उपाय डिझाइन व वितरित करू शकतात आणि त्‍यांचा उत्तम परिणाम होऊ शकतो. अॅगवॉटर इकोसिस्टम या स्केलेबल उपायांना पाठिंबा देत राहील आणि भारतातील अल्‍पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होईल अशा अधिक तंत्रज्ञान-केंद्रित प्रगतीसाठी मार्ग सुकर करेल, ज्यामुळे मूल्य साखळीतील गुंतागूंतीच्‍या आव्हानांचे निराकरण करण्‍यास मदत होईल.

विजेता, ईएफ पॉलिमर शेतीसाठी उपलब्धता सुधारण्यासाठी प्रयत्‍न करणारी कृषी-जैविक स्टार्टअप आहे. सध्या राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये कार्यरत असलेले त्यांचे उत्पादन ‘फसल अमृत हे सेंद्रिय माती कंडिशनर आहे, जे त्याच्या वजनाच्या १०० पट जास्त पाणी शोषू शकते. यामुळे मातीतील ओलावा टिकवून ठेवता येतो आणि पीक उत्पादन वाढते. गेल्या दोन वर्षांत ईएफ पॉलिमरने ११ राज्यांमधील १७००० हून अधिक शेतकऱ्यांना सुविधा दिली आहे. अल्‍पभूधारक शेतकऱ्यांसाठी परवडणारे तंत्रज्ञान आणि डेटा पारदर्शकता आणण्यासाठी विशेष मान्यता मिळालेली कल्‍टवायव्‍हेट आर्द्रता पातळी, पीक आरोग्य, पर्यावरणीय परिस्थिती आणि त्यापलीकडे महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी आयओटी-सक्षम माती सेन्सर्स, हवामान केंद्रे आणि सॅटेलाइट-आधारित रिमोट सेन्सिंगचा वापर करते. राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये कार्यरत असलेल्या त्यांच्या सेवा विशेषतः भात उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतात.

इतर दोन फायनालिस्‍ट्स देखील या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहेत. इंडस्टिल फार्मटेक प्रायव्हेट लिमिटेड ऑटोफार्म नावाचा कृषी तंत्रज्ञानाचा इनोव्‍हेटर देते, जो सिंचन स्वयंचलित करण्यासाठी, सूक्ष्म- सिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पाण्याची कार्यक्षमता सुधारण्यासाठी वापरला जातो. त्यांचे आयओटी प्लॅटफॉर्म स्मार्ट डिवाईसेसच्‍या माध्‍यमातून सिंचन आणि फर्टिगेशन स्वयंचलित करते, जे मोबाइल अॅपद्वारे व्यवस्थापित केले जाते. यामुळे पाणी, खत आणि कीटकनाशकांचा वापर कमी होण्‍यासोबत उत्पादन आणि कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. फायफार्म (फिझिझ अॅगटेक प्रायव्हेट लिमिटेड) सिंचन ऑटोमेशन तंत्रज्ञान देते, जे शेतकऱ्यांना दुरून मोबाइल अॅप्‍लीकेशनच्‍या माध्‍यमातून पंप आणि व्हॉल्व्ह नियंत्रित करण्यास सक्षम करते. हे मोबाइल अॅप्‍लीकेशन इंटेलिजण्‍ट सिंचन सिस्‍टम्‍स वापरून पाण्याचा वापर मोजते आणि ऑप्टिमाइझ करते.

या प्रवासादरम्यान संस्थांना सल्लागार, ज्युरी आणि प्रमुख इकोसिस्टम भागीदारांकडून मार्गदर्शन मिळाले, ज्यात हेमेंद्र माथुर (गुंतवणूकदार व व्हेंचर पार्टनर, भारत इनोव्हेशन फंड आणि सह-संस्थापक, थिंकएजी), अरुणा रंगाचर पोहल (वरिष्ठ सल्लागार व अध्यक्ष, सल्लागार समिती, आयएफएचडी) आणि अरिंदम दत्ता (माजी कार्यकारी संचालक, राबोबँक) यांचा समावेश होता. अतिरिक्‍त प्रमुख इकोसिस्टम भागीदारांमध्ये इमॅन्युएल मरे (गुंतवणूक संचालक, कॅस्पियन), विलास शिंदे (अध्यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स) आणि रोमियल सॅम्युअल (संस्थापक व कार्यकारी संचालक, इंडस वॉटर इन्स्टिट्यूट) यांचा समावेश होता. संशोधन, ज्ञान आणि इमर्शन भागीदारांमध्ये इकोसिएट कन्सल्टंट्स, देशपांडे फाउंडेशन, थिंकएजी, द डॉघर्टी वॉटर फॉर फूड ग्लोबल इन्स्टिट्यूट, २०३० वॉटर रिसोर्सेस ग्रुप, विलग्रो, सोशल अल्फा, अर्घ्यम, भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाची राष्‍ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (मॅनेज) आणि आयआयटी-आयआयटी यांचा समावेश होता.

Bihar Budget: महिला, शेतकरी, तरूणांवर लक्ष केंद्रित करणार बिहार सरकार, अर्थसंकल्पात महत्वाच्या तरतुदी

Web Title: Ef polymers thenudge dcm shriram awarded with rs 2 crore as winner of agwater challenge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 07:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.