ईपीएफओची नवीन योजना लवकरच जाहीर होणार; 'या' कर्मचाऱ्यांना 15,000 रुपये मिळणार!
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) नवीन योजना लागू करण्याच्या तयारीत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ऐम्नेस्टी स्कीम सुरु करण्याच्या तयारी आहेत. या योजनेअंतर्गत कंपन्यांना फायदा होणार आहे. ज्या कंपन्या आर्थिक भार किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ईपीएफओमध्ये नोंदणी पूर्ण करु शकल्या नाहीत किंवा त्यांची खाती सक्रिय ठेवू शकल्या नाहीत. त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.
तीन हप्त्यांमध्ये १५ हजार रुपये दिले जाणार
केंद्रिय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सूचनेनुसार या योजनेची रुपरेषा तयार केली जात आहे. डिसेंबर अखेर ही योजना जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, कर्जमाफी योजना एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमचा भाग असेल. २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी कामगारांना संघटित क्षेत्राशी जोडण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. यामध्ये ईपीएफओमध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये १५ हजार रुपये दिले जाणार आहेत.
ईपीएफओशी संबंधित आर्थिक सहाय्य दिले जाणार
उत्पादन क्षेत्रात संधी निर्माण करण्यासाठी ईपीएफओशी संबंधित आर्थिक सहाय्य दिले जाईल. याचसोबत १ लाखांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियोक्तांना ३ हजार रुपये दिले जाणार आहे. दोन वर्षांसाठी हे पैसे दिले जाणार आहे.यामुळे कर्मचाऱ्यांना ईएलआयशी जोडण्याची संधी मिळेल. यामुळे कर्मचाऱ्यांना ईपीएफओमध्ये नोंदणी करता येणार आहे.
या योजनेअंतर्गत २०१७ ते २०२४ दरम्यान, ज्यांना ईपीएफओमध्ये नोंदणी पूर्ण करता आसी नाही किंवा नोंदणीनंतर वेळेवर योगदान जमा करता आले नाही, त्यांना या योजनेअंतर्गत दिलासा मिळणार आहे. ज्यामुळे कंपन्यांना कर्मचाऱ्यांना ईपीएफओमध्ये सामील करण्याची संधी मिळेल.
काय आहेत नियम
कोणत्याही कंपनी किंवा फर्ममध्ये २० पेक्षा जास्त कर्मचारी असल्यास त्यांना ईपीएफओमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. ईपीएफओमध्ये नोंदणी न केल्यास किंवा वेळेवर योगदान न केल्यास तुमचे खाते निष्क्रिय केले जाईल.