Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाजार घसरणीतही ‘हा’ शेअर लागतोय अप्पर सर्किटला; 15 टक्क्यांच्या उसळीमुळे गुंतवणूकदार सुखावले!

आज एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे शेअर 15 टक्क्यांनी वाढले आहे. एका दिवसात कंपनीचा शेअर 15 टक्के किंवा 554 रुपयांनी वाढून, 4165 रुपयांवर पोहोचला आहे. त्यानंतर आता कंपनीच्या स्टॉकने अप्पर सर्किटला धडक मारली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jan 03, 2025 | 03:55 PM
बाजार घसरणीतही 'हा' शेअर लागतोय अप्पर सर्किटला; 15 टक्क्यांच्या उसळीमुळे गुंतवणूकदार सुखावले!

बाजार घसरणीतही 'हा' शेअर लागतोय अप्पर सर्किटला; 15 टक्क्यांच्या उसळीमुळे गुंतवणूकदार सुखावले!

Follow Us
Close
Follow Us:

डी-मार्ट या ब्रँड नावाने स्टोअर्स चालवणाऱ्या राधाकिशन दमानी यांच्या रिटेल कंपनी असलेल्या एव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या शेअर्समध्ये बऱ्याच काळानंतर मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. 3 जानेवारी 2025 रोजी आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे शेअर 15 टक्क्यांनी वाढले आहे. एका दिवसात कंपनीचा शेअर 15 टक्के किंवा 554 रुपयांनी वाढून, 4165 रुपयांवर पोहोचला आहे. त्यानंतर आता कंपनीच्या स्टॉकने अप्पर सर्किटला धडक मारली आहे.

तिसऱ्या तिमाहीत कंपनीची कामगिरी उत्कृष्ट

एव्हेन्यू सुपरमार्ट्सने आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ज्यामुळे डी-मार्टचा स्टॉक आजच्या सत्रात रॉकेट बनला आहे. क्विक कॉमर्स कंपन्यांकडून आव्हान असूनही, कंपनीने उत्कृष्ट परिणाम सादर केले. ज्यामुळे कंपनीचा हा स्टॉक हिरव्या निशाणीवर परत आला आहे. दरम्यान, तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 17.5 टक्क्यांनी वाढून, 15565.23 कोटी झाला आहे. जो मागील वर्षीच्या कालावधीतील तिमाहीत गेल्या आर्थिक वर्षात 13,247.33 कोटी रुपये इतका नोंदवला गेला होता. 31 डिसेंबर 2024 पर्यंत कंपनीची देशभरात एकूण 387 स्टोअर्स असणार आहेत.

आता 10 मिनिटांत रुग्णवाहिकेची सुविधा मिळणार; ‘ही’ कंपनी देशभरात पुरवणार सुविधा!

शेअर्समध्ये ११.४३ टक्के वाढ

शुक्रवारी 3 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात घसरण झाली असली तरी, एव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आहे. शेवटच्या सत्रात शेअर 3611 रुपयांवर बंद झाला होता. जो 15 टक्क्यांहून अधिक उसळीसह 4166 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारी बाजार बंद होण्याच्या सुमारास हा शेअर ११.४३ टक्क्यांच्या वाढीसह ४०२४ रुपयांवर व्यवहार करत आहे. हा शेअर ५९०० रुपयांच्या उच्चांकावरून जवळपास ४० टक्क्यांनी घसरला होता.

अव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर, विदेशी ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे. आणि 5360 रुपयांच्या लक्ष्यासाठी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, मॉर्गन स्टॅनले आणि मॅक्वेरी यांनी वेटेज कमी करून 3700 रुपयांचे टार्गेट दिले आहे.

डीमार्टचा बाजार हिस्सा वाढण्यास मदत होणार

डीमार्ट हे डिस्काउंट रिटेलर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीत वस्तू उपलब्ध होत असल्याने विक्री वाढण्यास मदत होत आहे. यामुळे डी-मार्टला अत्यंत संवेदनशील बाजारपेठेतील बाजारातील हिस्सा वाढवण्यास मदत झाली आहे. सीएलएसएने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, डी-मार्ट ही भारतातील 500 अब्ज डॉलर अन्न आणि किराणा मालाच्या बाजारपेठेतील एक मोठी स्पर्धक कंपनी आहे. सध्या ही जागा छोट्या विक्रेत्यांनी व्यापली आहे. सीएलएसएचा विश्वास आहे की, पुढील 25 वर्षांत TAM 2.3 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढेल. ज्यामध्ये डी-मार्टचा हिस्सा सध्याच्या 1 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Web Title: Even in the market downturn dmart stock is holding up in the upper circuit investors are happy with the 15 percent jump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • share market
  • Share Market Today

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतवणूदारांनो आज सावध राहा! तज्ज्ञांनी दिलाय इशारा, चुकीचा निर्णय घेतला तर होईल मोठा तोटा
1

Share Market Today: गुंतवणूदारांनो आज सावध राहा! तज्ज्ञांनी दिलाय इशारा, चुकीचा निर्णय घेतला तर होईल मोठा तोटा

3000000000000 रुपयांवर स्वाह! शेअर बाजार गडगडला, बाजारात भूकंप कशामुळं?
2

3000000000000 रुपयांवर स्वाह! शेअर बाजार गडगडला, बाजारात भूकंप कशामुळं?

Share Market Today: Indian Bank सह हे शेअर्स आज गुंतवणूकदारांना करू शकतात श्रीमंत! बाजारातील तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला
3

Share Market Today: Indian Bank सह हे शेअर्स आज गुंतवणूकदारांना करू शकतात श्रीमंत! बाजारातील तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला

Share Market Today: शेअर बाजारात आज काय परिस्थितीत असणार? गुंतणूकदारांना कोणते शेअर्स नफा देणार? जाणून घ्या सविस्तर
4

Share Market Today: शेअर बाजारात आज काय परिस्थितीत असणार? गुंतणूकदारांना कोणते शेअर्स नफा देणार? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.