Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rupee Dollar Exchange Rate: भारत-अमेरिका करारानंतर रुपयाला मिळाली संजीवनी! परदेशी गुंतवणूकदारांकडे बाजाराचे लक्ष

गेल्या आठवड्यात रुपयाने डॉलरला एकच धक्का दिला आहे, ज्यामुळे डॉलरला गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठे नुकसान झाले आहे.भारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक व्यापार कराराने रुपयाला मजबूती मिळाली. याबद्दल सविस्तर वाचा.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 08, 2026 | 09:51 AM
Rupee Dollar Exchange Rate: भारत-अमेरिका करारानंतर रुपयाला मिळाली संजीवनी! परदेशी गुंतवणूकदारांकडे बाजाराचे लक्ष

Rupee Dollar Exchange Rate: भारत-अमेरिका करारानंतर रुपयाला मिळाली संजीवनी! परदेशी गुंतवणूकदारांकडे बाजाराचे लक्ष

Follow Us
Follow Us:
  • भारत-अमेरिका व्यापार कराराचा डॉलरवर परिणाम
  • डॉलर कमकुवत, तर रुपया मजबूत
  • परदेशी गुंतवणूकदारांकडे बाजाराचे लक्ष
 

Rupee Dollar Exchange Rate: गेल्या काही दिवसांपासून जागतिक अस्थिरतेमुळे बाजारात चढ-उतार सुरू होती. त्यातच बाजारात डॉलरमुळे रुपया सतत घसरत होता. दररोज लहान-मोठ्या घसरणीमुळे बाजारात रुपयाचे मोठे नुकसान होत होते. परंतु गेल्या आठवड्यात रुपयाने डॉलरला (Dollar) एकच धक्का दिला आहे, ज्यामुळे डॉलरला गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठे नुकसान झाले आहे. बाजाराच्या दृष्टीने, रुपयाने डॉलरच्या तुलनेत तीन वर्षांतील सर्वांत मोठी उडी नोंदवली. खरं तर, दीर्घ प्रतीक्षेनंतर, भारत आणि अमेरिका (India-Us Trade) यांच्यातील ऐतिहासिक व्यापार कराराने रुपयाला नवीन जीवन दिले आहे.

हे देखील वाचा: Todays Gold-Silver Price: पुन्हा वाढले सोन्याचे भाव, चांदीही वधारली! तुमच्या शहरातील दर जाणून घ्या सविस्तर

शुक्रवारचा व्यापार सत्र थोडा अस्थिर असला तरी, हा आठवडा भारतीय अर्थव्यवस्था आणि चलनासाठी बळकटी देणारा ठरला आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना, डॉलरच्या तुलनेत रुपया किंचित कमकुवत झाला आणि ९०.६५५० वर स्थिरावला. परंतु, दिवसाच्या व्यवहारादरम्यान तो ०.३ % ने घसरला, याचे मुख्य कारण म्हणजे, नफा मिळविण्यासाठी, अनेक व्यापाऱ्यांनी डॉलर खरेदी वाढवली आणि रुपयावरील त्यांचे पैज मागे घेतले होते. बाजाराच्या भाषेत सांगायचं तर, स्टॉप-लॉसच्या ट्रिगरिंगमुळे घसरण थोडीशी वाढली. तथापि, प्रथमदर्शी ही घसरण किरकोळ दिसते.

संपूर्ण आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाने १.४ % ची मजबूत वाढ केली. जानेवारी २०२३ नंतर म्हणजेच गेल्या तीन वर्षातील ही त्याची सर्वात मजबूत साप्ताहिक कामगिरी आहे. या तेजीचा पाया मंगळवारी घातला गेला, जेव्हा अमेरिका आणि भारताने अनेक महिन्यांच्या वाटाघाटींनंतर व्यापार कराराची घोषणा केली.

हे देखील वाचा: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगाची अधिकृत वेबसाईट लाँच; आता थेट सरकारला नोंदवता येणार सूचना

रुपयाची तेजी टिकणार का?

रुपयाची (Indian Rupee) ही तेजी किती टिकेल हे मुख्यत्वे परदेशी गुंतवणूकदारांच्या वृत्तीवर अवलंबून असेल तरी, गेल्या महिन्यात, जानेवारी महिन्यामध्ये, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून सुमारे ४ अब्ज डॉलर्स काढून घेतले, ज्यामुळे चिंतेचे सावट निर्माण झाले, तथापि, फेब्रुवारी महिन्यात परिस्थिती उलटली आहे. या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी जवळजवळ १ अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स खरेदी केले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात गुंतवणूकदारांचे बाजारावर बारीक लक्ष असेल तर काही गुंतवणूकदार सावधगिरी बाळगतील.

Web Title: The result of the india us trade agreement the rupee has become stronger than the dollar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • dollar
  • India-US trade deal
  • indian rupee
  • share market

संबंधित बातम्या

Share Market News: ₹१५ च्या शेअरची चर्चा! ₹५११ कोटींच्या सेटलमेंटवर सहमती, सोमवारी ‘या’ शेअरवर ठेवा नजर; कंपनीबाबत मोठी अपडेट समोर
1

Share Market News: ₹१५ च्या शेअरची चर्चा! ₹५११ कोटींच्या सेटलमेंटवर सहमती, सोमवारी ‘या’ शेअरवर ठेवा नजर; कंपनीबाबत मोठी अपडेट समोर

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी
2

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न
3

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश
4

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.