Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: ल्युपिन लिमिटेड आणि टेक महिंद्रासह आज ‘हे’ शेअर्स पालटणार तुमचं नशिब! बाजारातील तज्ज्ञांनी केली शिफारस

Share Market Update: शेअर बाजार आज हिरव्या रंगात उघडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही शेअर्सची देखील शिफारस करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 25, 2026 | 08:45 AM
Stock Market Today: ल्युपिन लिमिटेड आणि टेक महिंद्रासह आज 'हे' शेअर्स पालटणार तुमचं नशिब! बाजारातील तज्ज्ञांनी केली शिफारस

Stock Market Today: ल्युपिन लिमिटेड आणि टेक महिंद्रासह आज 'हे' शेअर्स पालटणार तुमचं नशिब! बाजारातील तज्ज्ञांनी केली शिफारस

Follow Us
Follow Us:
  • जागतिक बाजारातील तेजीचा परिणाम; आज Lupin Limited, Tech Mahindraसह ‘हे’ शेअर्स राहतील फोकसमध्ये
  • ट्रम्प यांच्या घोषणेनंतर बाजारात उत्साह; तज्ज्ञांनी सुचवले आजचे 5 दमदार शेअर्स
  • आजच्या बाजारात कमाईची संधी? तज्ज्ञांकडून 5 शेअर्सची खरेदी शिफारस
India Share Market Update: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील इराणमध्ये सुरु असलेले युद्ध पाच दिवसांसाठी थांबल्याची घोषण केली आहे. तसेच याबाबत वरिष्ठ नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा सुरु असल्याची असल्याचे देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. याचाच सकारात्मक परिणाम आता शेअर बाजारावर देखील होत आहे. जागतिक बाजारातील तेजीच्या अनुषंगाने भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, बुधवारी वाढीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १९२ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,१२० च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: घसरणीनंतर पुन्हा वधारले सोन्याचे भाव, चांदीही महागली! आजच्या किंमती पाहून ग्राहक चिंतेत!

मंगळवारी, अमेरिका-इराण युद्धातील तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली आणि बेंचमार्क निफ्टी ५० २२,९०० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स १,३७२.०६ अंकांनी, म्हणजेच १.८९ टक्क्यांनी वाढून ७४,०६८.४५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३९९.७५ अंकांनी, म्हणजेच १.७८ टक्क्यांनी वाढून २२,९१२.४० वर स्थिरावला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक १,१६७.९० अंकांनी किंवा २.२७ टक्क्यांनी वाढून ५२,६०५.६५ वर बंद झाला.  (फोटो सौजन्य – Pinterest)

निओट्रेडरचे सहसंस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना पाच शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. राजा व्यंकटरमण यांनी शिफारस केल्यानुसार आज गुंतवणूकदार इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड (इंडिगो), ग्रॅन्युल्स इंडिया लिमिटेड, ल्युपिन लिमिटेड, साई लाईफ सायन्सेस लिमिटेड आणि टेक महिंद्रा लिमिटेड हे शेअर्स खरेदी करू शकतात.

महानगर गॅस लिमिटेडने दिले अखंडित PNG आणि CNG पुरवठ्याचे आश्वासन; सादर केले ग्राहकाभिमुख पीएनजी उपक्रम आणि लाभ

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना पाच शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. सुमीत बागडिया यांच्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर, सीसीएल प्रॉडक्ट्स (इंडिया), स्टरलाइट टेक्नॉलॉजीज, ग्रॅन्युल्स इंडिया आणि अलिव्हस लाइफ सायन्सेस हे शेअर्स खरेदी करू शकतात. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. यामध्ये अंबुजा सिमेंट्स, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि पर्सिस्टंट सिस्टम्स यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Experts recommend lupin limited tech mahindra and other top stocks share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात कोणते स्टॉक्स ठरणार गेमचेंजर? तज्ज्ञ काय म्हणाले? जाणून घ्या
1

Share Market Today: शेअर बाजारात कोणते स्टॉक्स ठरणार गेमचेंजर? तज्ज्ञ काय म्हणाले? जाणून घ्या

Share Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजाराला धक्का? सेन्सेक्स-निफ्टीबाबत तज्ज्ञांचा मोठा अंदाज
2

Share Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजाराला धक्का? सेन्सेक्स-निफ्टीबाबत तज्ज्ञांचा मोठा अंदाज

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; व्यवहार करताना राहा सावध, ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष
3

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; व्यवहार करताना राहा सावध, ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market News: शेअर बाजारातून चांगला परतावा हवा? डॉ. विकास व्ही गुप्ता म्हणतात की…
4

Share Market News: शेअर बाजारातून चांगला परतावा हवा? डॉ. विकास व्ही गुप्ता म्हणतात की…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.