Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीता अंबानींचे कपडे डिझाइन करते ‘ही’ फॅशन डिझायनर; हजारो कोटींच्या संपत्तीची आहे मालकीण!

मुकेश अंबानी यांच्या पत्नी निता अंबानी यांच्या कपड्यांची नेहमीच चर्चा होत असते. नीता अंबानी यांचे कपडे आणि दागिने समाजमाध्यमांवर चांगलेच व्हायरल होत असतात. त्याची सर्वत्र चर्चा होत असते. निता अंबानी यांचे हे कपडे प्रसिद्ध फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांनी बनवलेले असतात. अनिता यांचे अनेक ब्रँड देशभर पसरलेले आहेत. त्यांच्या ग्राहकांमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. फॅशन डिझायनर अनिताची संपत्ती करोडो रुपये आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 29, 2024 | 05:12 PM
नीता अंबानींचे कपडे डिझाइन करते 'ही' फॅशन डिझायनर; हजारो कोटींच्या संपत्तीची आहे मालकीण!

नीता अंबानींचे कपडे डिझाइन करते 'ही' फॅशन डिझायनर; हजारो कोटींच्या संपत्तीची आहे मालकीण!

Follow Us
Close
Follow Us:

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अनेकवेळा त्यांच्या महागड्या खर्चामुळे ते चर्चेत असतात. अलीकडेच त्यांच्या धाकट्या मुलाचे लग्न आणि त्यावर झालेला खर्च जगभरात चर्चेचा विषय बनला होता. अंबानी कुटुंबातील प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीची अत्यंत काळजी घेत असतो. मग ते खाद्यपदार्थ असो वा कपडे असोत. याबाबत ते नेहमीच काळजी घेत असतात.

बॉलिवूड सेलिब्रिटीही आहेत त्यांचे क्लायंट

मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानीही त्यांच्या ड्रेसिंगवर विशेष लक्ष देतात. त्यांनी परिधान केलेले दागिने किंवा कपडे लोकांचे लक्ष वेधून घेतात. नीता अंबानींचे कपडेही काही वेळा खूप व्हायरल होतात. त्यामुळे आता तुम्हाला माहितीये का? नीता अंबानीची फॅशन डिझायनर कोण आहे? अनिता डोंगरे असे तिचे नाव आहे. अनिता देखील सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांचे क्लायंट आहेत. यामध्ये प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टचाही समावेश आहे.

हे देखील वाचा – मराठवाड्याच्या भूमिपुत्राने केली जागतिक एआय साम्राज्याची निर्मिती; वाचा… त्यांची यशोगाथा!

जगभरात 270 पेक्षा जास्त स्टोअर्स

अनिता डोंगरे या प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. केवळ दोन शिलाई मशिनपासून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आज त्यांची जगभरात 270 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. ६१ वर्षांच्या अनिताला तिच्या आईकडून शिवणकामाचा वारसा मिळाला आहे. त्यांची आई शिवणकाम करायची. त्यामुळे अनितालाही लहानपणापासूनच फॅशनची आवड निर्माण झाली होती. मोठी झाल्यानंतर त्यांनी याच क्षेत्रात आपले करिअर केले आहे.

सुरुवातीला अपयश, नाही मानली हार

अनिताने सुरुवातीला तिच्या बहिणीसोबत 1995 मध्ये पाश्चात्य कपडे शिवण्यास सुरुवात केली. अनिताने आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी वडिलांकडून पैसे उसने घेतले होते. सुरुवातीला अनिताने हे कपडे स्थानिक दुकानदारांना विकले. यावेळी त्यांनी अनेक मॉल्स आणि ब्रँड्सशी संपर्कही साधला. मात्र त्यांची निराशा झाली. मात्र, तिने प्रयत्न सुरूच ठेवले. नंतर अनिताने अॅन्ड नावाचा स्वतःचा ब्रँड सुरू केला. लवकरच या ब्रँडच्या कपड्यांची मागणी वाढू लागली. 2015 मध्ये तिने तिच्या कंपनीचा ‘हाऊस ऑफ अनिता डोंगरे’ म्हणून री-ब्रँड केला. तिच्या ब्रँडमध्ये आता अॅन्ड, ग्लोबल देसी, अनिता डोंगरे ब्राइडल कॉउचर, अनिता डोंगरे ग्रासरूट्स आणि अनिता डोंगरे पिंक सिटी इत्यादींचा समावेश आहे.

किती आहे एकूण संपत्ती?

अनिताचा ब्रँड गेल्या काही वर्षात चांगलाच विकसित झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्या व्यवसायाची वार्षिक कमाई 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. फोर्ब्सने तिला भारतातील सर्वात श्रीमंत महिला फॅशन डिझायनर म्हणून सन्मान दिला आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार, अनिताची एकूण संपत्ती 10 मिलियन डॉलर (सुमारे 84 कोटी रुपये) पेक्षा अधिक आहे.

Web Title: Fashion designer anita dongre designs nita ambanis clothes the owner of thousands of crores of wealth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 05:09 PM

Topics:  

  • Nita Ambani

संबंधित बातम्या

नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकसोबत खेळाला गरबा, दसरा मोठ्या उत्साहात साजरा; व्हिडिओत दिसली जुगलबंदी
1

नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकसोबत खेळाला गरबा, दसरा मोठ्या उत्साहात साजरा; व्हिडिओत दिसली जुगलबंदी

सासू- सुनेमध्ये रंगला दांडिया रास, नीता अंबानीने राधिका मर्चंटला दिली टक्कर; VIDEO इंटरनेटवर व्हायरल
2

सासू- सुनेमध्ये रंगला दांडिया रास, नीता अंबानीने राधिका मर्चंटला दिली टक्कर; VIDEO इंटरनेटवर व्हायरल

Nita Ambani: बनारसी ब्रोकेड लेहंग्यात नीता अंबानींंचा रॉयल अंदाज, 60 व्या वर्षी तरूणींना लाजवणारा नखरा
3

Nita Ambani: बनारसी ब्रोकेड लेहंग्यात नीता अंबानींंचा रॉयल अंदाज, 60 व्या वर्षी तरूणींना लाजवणारा नखरा

Nita Ambani Saree Look: आर्यन खानच्या खास सोहळ्यात नीता अंबानींचीच चर्चा, साडीपेक्षाही नेकलेसने दिपले डोळे
4

Nita Ambani Saree Look: आर्यन खानच्या खास सोहळ्यात नीता अंबानींचीच चर्चा, साडीपेक्षाही नेकलेसने दिपले डोळे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.