फोटो सौजन्य - Social Media
हल्लीच शार्क टँकमध्ये एका स्टार्टअपने पाऊल ठेवले होते. या स्टार्ट अपचे नाव OneDios असे होते. नितीन चावला असे या स्टार्टअपच्या संस्थापकांचे नाव आहे. नितीन गाजियाबादचा रहिवाशी आहे. त्याचे असे म्हणणे आहे कि त्याचा हा स्टार्टअप कोणत्याही व्यक्तीला अगदी ६० सेकंदात आणि ६ क्लिकमध्ये आपल्या तक्रारींची नोंद करण्यास मदत करू शकतो.
मुळात, नितीन यांचे म्हणणे आहे कि One Dios एक ऍप आहे. या ऍप्लिकेशनच्य यामाध्यमातून लोकं त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. याने त्यांचा वेळही वाचणार आहे. कारण कस्टमर केअरच्या नंबरवर कॉल केला कि त्यात फार वेळ जातो. हा ऍप एक प्लॅटफॉर्म असून लोकांना अगदी मिनिटात सुविधा पुरवण्याचे काम करणार आहे. अगदी ६ क्लिकमध्ये उमेदवारांना तक्रार करता येणार आहे. नितीनने याविषयी सांगताना त्याच्या शिक्षणाबद्दल सांगितले आहे. त्याने बीकॉम केला आहे तसेच MSc केला आहे. पहिल्या कंपनीत त्याला १५ लाखांच्या सेलचा टार्गेट मिळाला आहे. त्याला अचिव्ह करत नितीन सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंटमध्ये आले आहेत. त्याने आधी एखादी कंपनी जॉईन करत तेथे एक मोबाईल ऍप्लिकेशन तयार केला आहे. त्यांनतर त्याने IBM मध्ये जवळजवळ १२ वर्षांचा अनुभव घेतला आहे. मुळात, त्यांनी तेथे महत्वाच्या पदी कामे केले आहे. २०१९ मध्ये त्याने OneDios या स्टार्टअपला सुरुवात केली होती, तसेच २०२० मध्ये या कामातून राजीनामा दिला.
या स्टार्टअपने 2023-24 मध्ये 3.7 कोटी रुपयांची विक्री केली, पण 5.5 कोटी रुपये खर्च केले.
चालू वर्षी ऑक्टोबरपर्यंत कंपनीची विक्री 3.25 कोटी रुपये झाली आहे. या स्टार्टअपच्या विक्रीत 85 टक्के भाग रिटेलर्समधून तर 15 टक्के भाग ऍपच्या माध्यमातून येतो. या स्टार्टअपसाठी फाउंडरने 1.5 टक्के इक्विटीच्या बदल्यात 75 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, शार्क टँक इंडियाच्या शोमध्ये कोणत्याही जजने या स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवले नाहीत. अद्याप या स्टार्टअपने एकूण 16.5 कोटी रुपयांची फंडिंग मिळवली आहे.
या स्टार्टअपच्या फाउंडरवर सर्व शार्क नाराज झाले. अनुपम मित्तल यांनी थेट सांगितले की, “तुमचा हा व्यवसाय संपलाच आहे, जे बोलायचं आहे ते बोला.” फाउंडरने दिलेली आकडेवारी कोणालाच विश्वासार्ह वाटली नाही. वरुण दुआ यांनी फाउंडरवर गोंधळात टाकणाऱ्या उत्तरांचा आरोप केला. अमन गुप्ता यांनाही फाउंडरच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवता आला नाही. फाउंडर गेल्यानंतर विनीता सिंग यांनी तर सरळपणे म्हटले की, “हा फाउंडर खोटं बोलत होता.” या स्टार्टअपचा व्यवसाय मॉडेल कोणालाही पटला नाही, उलट सर्व जज गोंधळून गेले. शार्क टँक इंडियावर या स्टार्टअपला फंडिंग न मिळाल्यामुळे फाउंडरची मोठी अडचण झाली असून, त्यांचा व्यवसाय संकटात असल्याचे दिसून येते.