फोटो सौजन्य: Social Media
गरूडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग लिमिटेड, एक प्रमुख ईपीसी (इंजिनियरिंग, प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन) कंपनीने आज उत्तर प्रदेश सरकारच्या गोरखपूर डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून सर्वात मोठे 1,087.34 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवले असल्याची घोषणा केली. या कंत्राटानुसार, कंपनी गोरखपूर शहरात एक अत्याधुनिक आणि ५००० आसन क्षमतेचे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर विकसित करणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून, कंपनी गोरखपूरच्या विकसित भागात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक विकासास हातभार लावणार आहे.
कंपनीने यापूर्वीच गोरखपूर डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून 24 लाख चौरस फुटांच्या बांधकामासाठी मान्यता मिळवली आहे, ज्यात आगीसंबंधी आवश्यक सर्व सुरक्षा उपायांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कंपनीला 30 महिन्यांचा कालावधी दिला आहे. गोरखपूर डेव्हलपमेंट अथॉरिटीचे हे कंत्राट, गरूडा कन्स्ट्रक्शनच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील अद्वितीय कौशल्याचे प्रतीक आहे.
या कंत्राटामुळे कंपनीचे ऑर्डर बुक २८३० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये कंपनीच्या आयपीओ दरम्यान, त्यांच्या ऑर्डर बुकची किंमत १४०८.२७ कोटी रुपये होती. या कंत्राटामुळे कंपनीच्या बाजारपेठेतील स्थान अधिक मजबूत झाले आहे. तसेच कंपनी आपली जागतिक पायाभूत सुविधा विकासातील भूमिका अधिक दृढ करत आहे.
गरूडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनियरिंग लिमिटेड एक मल्टी-सेक्टर कंपनी आहे जी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे, जसे की पायाभूत सुविधा, शाश्वत उर्जा प्रकल्प, उच्चभ्रू निवासी प्रकल्प, शहरी पायाभूत सुविधांचे निर्माण, रस्ते बांधकाम, औद्योगिक वसाहती आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्र. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये विविध पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्ज (पीएसयूज) आणि खासगी प्रकल्पांचा समावेश आहे.
Budget 2025: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होणार! केंद्रीय अर्थसंकल्पात काय असेल खास? वाचा सविस्तर बातमी
कंपनी सध्या 704.61 कोटी रुपयांच्या रापतीनगर टाउनशीप अँड स्पोर्ट्स सिटी डेव्हलपमेंट प्रकल्पावर काम सुरु केले आहे. या प्रकल्पाद्वारे गरूडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग पुन्हा एकदा आपल्या उच्च तांत्रिक क्षमतांचे आणि वेळेवर प्रकल्प पूर्ण करण्याच्या कौशल्याचे प्रदर्शन करत आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष, प्रवीण कुमार अगरवाल, म्हणाले, “आम्हाला अभिमान आहे की आम्ही उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवताना देशाच्या विकासात योगदान देत आहोत. आमची उत्पादन श्रेणी वेळोवेळी बदलणाऱ्या बाजारपेठेच्या गरजांनुसार सुसंगत आहे. नाविन्य, शाश्वतता आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करून आम्ही भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी सज्ज आहोत.”
कंपनीने मुंबईतील लोअर परेळ आणि बीकेसी प्रकल्पांसह विविध प्रीमियम निवासी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांमध्ये आपली उपस्थिती वाढवली आहे. याव्यतिरिक्त, बेंगळुरूमध्ये बुटिक हॉटेल प्रकल्पाच्या माध्यमातून कंपनी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातही विस्तार करत आहे.
याच्या माध्यमातून गरूडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनियरिंग लिमिटेडने आपल्या व्यवसायात आणखी एक मोठा टप्पा गाठला असून त्याच्या वाढीच्या योजनांमध्ये पुढील काही वर्षांत अनेक महत्त्वाचे प्रकल्प समाविष्ट असतील.
सध्या Garuda Construction and Engineering Ltd चा शेअर 132 रुपयाला ट्रेड करत आहे. याच शेअरने गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना 39.38% परतवा दिला आहे. आता या कंत्राटामुळे कंपनीच्या शेअरमध्ये किती वाढ होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.