Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौतम अदानी बांगलादेशला अंधारात ठेवणार, वीजपुरवठा थांबवणार? पाहा… काय आहे नेमकं कारण

अदानी समूहाची कंपनी अदानी पॉवरचे 800 दशलक्ष डॉलर्स शेजारील देश असलेल्या बांगलादेशात अडकले आहेत. त्यामुळे आता अदानी पॉवर कंपनी ही रक्कम घेण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणत आहे. कर्जदार आणि कोळसा पुरवठादारांनी कंपनीवर दबाव आणला तर बांगलादेशातील वीजपुरवठा प्रकरणी कठोर पावले उचलावी लागतील. असे अदानी समुहाकडून सांगितले जात आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 23, 2024 | 09:02 PM
महाराष्ट्राला ६,६०० मेगावॅट वीज मिळणार अदानींना कंत्राट

महाराष्ट्राला ६,६०० मेगावॅट वीज मिळणार अदानींना कंत्राट

Follow Us
Close
Follow Us:

अदानी समूहाची कंपनी अदानी पॉवरचे 800 दशलक्ष डॉलर्स शेजारील देश असलेल्या बांगलादेशात अडकले आहेत. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी पॉवर कंपनी ही रक्कम आपल्याला देण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणत आहे. पंतप्रधान शेख हसीना यांना हटवण्यासाठी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर, बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले. नव्याने स्थापन झालेल्या सरकारला देखील याबाबत जाणीव आहे.

हीच बाब लक्षात घेऊन, बांगलादेश बँकेचे नवीन गव्हर्नर अहसान एच मन्सूर यांनी म्हटले आहे की, जर आम्ही ही रक्कम अदानी पॉवर कंपनीला दिली नाही, तर ते आम्हाला वीज देणे बंद करतील. त्यामुळे आता बांगलादेश सरकारची मोठी गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अंतरिम सरकार करतंय समस्येचे निराकरण

अदानी समूहाकडून बांगलादेशला पुरविली जाणारी वीज झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात असलेल्या अदानी पॉवरच्या प्लांटमधून पुरवली जाते. गव्हर्नर अहसान एच मन्सूर यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अंतरिम सरकार या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. अदानी पॉवरची सध्या वीज कपात करण्याचा कोणताही विचार नसल्याची सांगितले जात आहे.

हेही वाचा – एचडीएफसी बँकेचा एक निर्णय… अन् जपानचा तिळपापड; भारत-जपानमधील आर्थिक संबंध बिघडणार!

काय म्हटलंय अदानी समुहाने

मात्र, आपण अडकलेले पैसे मिळवण्यासाठी बांग्लादेश सरकारशी बोलत आहे. कर्जदार आणि कोळसा पुरवठादारांनी कंपनीवर दबाव आणला तर कंपनीला कठोर पावले उचलावी लागतील. असेही बांगलादेश करण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत अदानी समुहाने म्हटले आहे.

शेजारील देशांमध्ये अदानी समुहाचा झपाट्याने विस्तार

अदानी समूहाने गेल्या काही वर्षांत भारताबाहेर झपाट्याने आपला विस्तार केला आहे. बांगलादेशसोबतच अदानी समूहाने श्रीलंका, भूतान आणि नेपाळमध्येही आपली व्याप्ती वाढवली आहे. परंतु, वीज देयकाला विलंब झाल्यास त्याच्या योजनांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारलाही भारतीय व्यावसायिक समूहांचा शेजारच्या देशांमध्ये विस्तार करायचा आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ही मोठी बाब मानली जात आहे.

अदानी पॉवरसोबतच भारताची एनटीपीसी आणि पीटीसी इंडिया या कंपन्या देखील बांगलादेशला वीज पुरवठा करतात. मात्र, या कंपन्यांच्या पेमेंट स्टेटसबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शेख हसीना सरकार पडल्यानंतर अंतरिम सरकार आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे आता अदानी पॉवरसह बांगलादेश वीज पुरवठा करणाऱ्या या कंपन्या देखील चिंतेत आहेत.

Web Title: Gautam adani to stop electricity to bangladesh 800 million dollars of adani power stuck in bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 09:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.