गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुपकडून आगामी पिढ्यांकरीता प्रेरणादायक Workplace बनवण्यासाठी पुढाकार
अलीकडेच नवीन ब्रँड ओळख आणि महत्त्वाकांक्षी वाढीसाठी स्पष्ट दृष्टीकोन लाँच केल्यानंतर, गोदरेजच्या वतीने उद्योजकता-आधारित आणि नाविन्यपूर्ण मानसिकतेद्वारे चालवलेल्या मनुष्यबळाला प्रोत्साहन देण्यासाठी पीपल मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीचा नव्याने विचार करण्यात येत आहे.
“गोदरेज एंटरप्राईजेस ग्रुप कायमच समाजाकरिता मूल्यनिर्मिती करत असतो. तेच तत्त्वज्ञान आमच्या कर्मचारी वर्गापर्यंत विस्तारत नेत आहोत. नवकल्पकता आणि जबाबदारीपूर्ण संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने, आमच्या कंपनीचा वारसा पुढे नेणाऱ्या आद्यकर्त्यांच्या आगामी पिढ्यांचे सबलीकरण करण्याचे आमचे ध्येय आहे. नवकल्पकता, डिजीटल कार्यकुशलता, उद्योजकीय आणि नेतृत्व कार्यक्रमातंर्गत आमचे उपक्रम कर्मचारी वर्गाला नवकल्पना, प्रयोग आणि उद्देशासह आगेकूच करण्याच्या अनुषंगाने तयार करण्यावर आमचा भर आहे. तसेच वेगाने विकसित होत असलेल्या जगात अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी हे उपक्रम आमचे कर्मचारी बळ सुसज्जित होत असल्याची खातरजमा करतील”, अशी माहिती गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपच्या सीएचआरओ, हरप्रीत कौर यांनी दिली.
ईव्ही वित्तपुरवठ्यासाठी JSW MG Motor इंडियाची Kotak Mahindra Prime सोबत भागीदारी
देश-निर्मितीत ग्राहक अनुभव, नवोन्मेष आणि रचना-आधारित अभियांत्रिकीवर नव्याने लक्ष केंद्रित करून संपूर्ण मूल्य साखळीमध्ये डिजिटल स्वीकाराद्वारे, एरोस्पेस, इंट्रालॉजिस्टिक, बांधकाम, ऊर्जा संक्रमणासाठी अचूक अभियांत्रिकी आणि इतर यासारख्या राष्ट्र उभारणीसाठी महत्त्वपूर्ण उद्योगांमध्ये अर्थपूर्ण संधी उपलब्ध करणारी कार्यस्थळे तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक करत आहे. याव्यतिरिक्त, गोदरेजच्या वतीने अक्षय ऊर्जा, शाश्वत उत्पादन आणि ऊर्जा कार्यक्षमतेमध्ये नवीन युगातील कौशल्य उपक्रम सादर करून, अर्थपूर्ण कारकिर्दीच्या आकांक्षांशी जुळवून तरुणांना प्रेरणा देत आहे. रिमोट पद्धतीचे काम आणि जुळवून घेण्याजोग्या वेळेसह लवचिक कामाचे पर्याय, कर्मचाऱ्यांचा अनुभव आणखी वाढवतात. निरोगी कार्य-जीवन संतुलन उपलब्ध करून उत्पादकतेला चालना देतात. या प्रमुख क्षेत्रांमध्ये शाश्वतता आणि वैविध्यपूर्ण उपस्थितीवर लक्ष केंद्रित करून, गोदरेज पुढील पिढीच्या व्यावसायिकांसाठी एक व्यासपीठ म्हणून उभा आहे. जे नाविन्यपूर्ण, प्रयोग आणि मोठ्या उद्देशाने स्वतःला संरेखित करण्यास उत्सुक आहेत.
कंपनीच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या अंगी उद्योजक घडविण्याच्या क्षमतेला चालना देणाऱ्या उपक्रमांवर देखील लक्ष केंद्रित करते. स्प्रिंट सारखे उद्योजकता-आधारित उपक्रम, कर्मचाऱ्यांना नाविन्यपूर्ण, प्रयोग आणि परिवर्तनशील कल्पना जीवनात आणण्यास सक्षम करतात. मार्गदर्शन, स्रोत आणि क्रॉस-फंक्शनल कोलॅबरेशनच्या आधारे स्प्रिंट उपक्रम मालकी आणि सर्जनशील संस्कृतीला चालना देते. ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्यांना चालना मिळण्यात मदत होते.
स्मार्ट ऑटोमेट, अॅक्वाकूल आणि नेट झिरो हॅबिटॅट यासारखे उल्लेखनीय प्रकल्प नवोन्मेषाच्या माध्यमातून उद्योग-व्यापी बदल घडवून आणण्यासाठी गोदरेजची बांधिलकी प्रतिबिंबित करतात.
डिजिटल कौशल्याची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखून गोदरेजने प्रगत विश्लेषण आणि डिजिटल तंत्रज्ञानामध्ये कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी ड्राइव्ह फ्यूचर रेडीनेस आणि डिजीनेक्स्ट सारखे उपक्रम सुरू केले आहेत. वर्कफ्लोमध्ये डिजिटल कौशल्याचे एकत्रीकरण करून आणि वन सीआरएम तसेच ओमनी चॅनेल प्लॅटफॉर्मसारख्या प्रकल्पांवर सहकार्य करण्यास प्रोत्साहित करून, कंपनी चपळाई आणि समन्वयाची संस्कृती जोपासत आहे. कर्मचाऱ्यांप्रती विकसित होत असलेल्या तांत्रिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तयार करत आहे.
गोदरेज नाविन्यपूर्ण संशोधन आणि विकास करत असताना, ते तरुण प्रतिभांना आकर्षित आणि सक्षम करणारे भविष्य-केंद्रित कार्यस्थळ तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे. इंट्राप्रिन्योरशिप, डिजिटल परिवर्तन आणि टिकाऊपणा या तत्त्वांशी सांगड कार्यबळासोबत घालून गोदरेज केवळ कामाच्या भविष्याला आकार देत नाही तर जगभरातील उद्योग आणि समुदायांवर कायमस्वरूपी प्रभाव टाकतात.