रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine Crisis) गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत. यामुळे भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold – Silver Price) वाढ पाहायला मिळत आहे.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सकाळी सोन्याचा वायदे भाव १.५ टक्क्यांनी वाढला. आज सोन्याचा दर ५०,९९० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. सोने दरात तब्बल ८०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्यासह चांदीचा भावही वाढला आहे. चांदीच्या दरात १.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीसह दर ६५,८६९ किलोग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. जगभरातील वाढत्या महागाईमुळे सोने दरात वाढ होत असल्याचं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे.
[read_also content=”शिवभक्त असावा तर असा – १ लाखापेक्षा जास्त बेलाची झाडं लावून दुर्गा प्रसाद पांडेय करतायत शंकराची अनोख्या पद्धतीने आराधना https://www.navarashtra.com/viral/shivbhakt-durga-prasad-pandey-worshiping-shiva-by-planting-more-than-1-lakh-bael-plant-nrsr-246583.html”]
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव फेब्रुवारीमध्ये ६ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. हे दर मागील एका वर्षाच्या सर्वोच्च स्तरावर आहेत. रशिया आणि युक्रेनमधील संकट वाढतचं राहिलं, तर सोन्या-चांदीच्या किमती वाढतच जातील असं जाणकारांचं म्हणणं आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सोनं ५५ हजारपर्यंत पोहोचू शकतं असा अंदाज आहे.
शुक्रवारी सोने दरात काहीशी घसरण झाली होती. एमसीएक्सवर शुक्रवारी सोन्याचा वायदे भाव १.०५ टक्के अर्थात ५५३ रुपयांनी कमी झाला होता. यामुळे सोने दर ५१००० रुपयांजवळ होता. चांदीचा वायदे भावही ११०५ रुपयांनी कमी होऊन ६५,७९३ रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत होता. परंतु आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मोठी वाढ झाली आहे.