
Hinduja group
Gopichand Hinduja : भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते, जेव्हा कोणी व्यवसाय करायचा सुद्धा विचार केला नव्हता तेव्हा हिंदुजा ग्रुप उदयास आली. याच हिंदुजा ग्रुपचे सर्वेसर्वा गोपीचंद हिंदुजा यांचे लंडनमध्ये वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदुजा ग्रुपने ब्रिटनसह जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यावसायिक म्हणून सलग 7 वर्ष भारतीय वंशाचे अब्जाधीश गोपीचंद हिंदुजा यांना मान मिळत होता. हिंदुजा ग्रुपचे साम्राज्य प्रत्येक क्षेत्रात अगदी ऑइलपासून ऑटोमोबाईलपर्यंत पसरलेले आहे. त्यामुळे हिंदुजा ग्रुपने जगभरात व्यापार क्षेत्रात नवीन उंची गाठली.
जागतिक स्तरावर भारतीय कंपनीला नेणारे गोपीचंद हिंदुजा यांनी केवळ हिंदुजा ग्रुपचे नेतृत्व केले नाही तर देशासाठी संकटसमयी उभे राहिले. हिंदुजा ग्रुप रिअल इस्टेट, बँकिंग, मीडिया, ऑटोमोबाईल्ससह ऊर्जा, औषधे यामध्येही अग्रेसर आहे. त्यांनी या क्षेत्रात स्वतःचे स्थान प्रस्थापित केले आहे. 2023 मध्ये त्यांचे मोठे भाऊ श्रीचंद हिंदुजा यांचे निधन झाले. त्यानंतर, हिंदुजा समूहाची सूत्रे गोपीचंद हिंदुजा यांनी हाती घेतली. गोपीचंद हिंदुजा यांचे नाव श्रीमंत यादीत कायम अव्वल स्थानावर राहिले.
हेही वाचा : Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्या – चांदीचे दर? एका क्लिकवर जाणून घ्या सविस्तर
गोपीचंद हिंदुजा यांची एकूण संपत्ती
2025 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या माहिती नुसार गोपीचंद हिंदुजा यांची एकूण संपत्ती तब्बल 33,67,948 कोटी रुपये आहे. डेव्हिड व सायमन रुबेन यांच्यापेक्षा 8 हजार कोटींनी जास्त होती. लंडनमध्ये हिंदुजा समूहाकडे अधिक तर रिअल इस्टेटचे होल्डिंग्ज आहे. ज्यात व्हाइटहॉल येथील ऐतिहासिक ओल्ड वॉर ऑफिस बिल्डिंगमध्ये असलेल्या हॉटेलचा सुद्धा समावेश आहे. अगदी एक छोटी कंपनी म्हणून त्याची सुरुवात झाली होती ज्यात भारत आणि इराणमध्येही काही वस्तूंमध्ये गुंतवणूक केली. त्यांनतर मग त्याचा विस्तार इतका वाढला कि त्यांनी तेल, ऑटोमोबाईल्ससह वित्तमध्ये ही उंची गाठली.
हिंदुजा कुटुंबातील सर्व सदस्य अनेक ठिकाणावरून हिंदुजा समूह सांभाळतात. गोपीचंद हिंदुजा यांच्या हाती कारभार येताच त्यांनी भारतातील एनआरआयने पहिली मोठी गुंतवणूक करत 984 मध्ये गल्फ ऑइल विकत घेतले. आणि त्यानंतर 3 वर्षांनी अशोक लेलँड सुद्धा विकत घेतले. त्यांचे दोन भाऊ एक मोनाकोमध्ये स्थायिक आहे तर लहान भाऊ भारतात असून भारतातील हितसंबंध सांभाळत असतात.