सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय; यापुढे...
देशात आजही अनेक ठिकाणी हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जात आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने आपल्या निर्णयामध्ये म्हटले आहे की, वेगवेगळ्या राज्यांतील आणखी 18 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत. दरम्यान, 23 जून 2021 पासून, हॉलमार्किंगचा नियम लागू झाल्यापासून, आतापर्यंत सुमारे 40 कोटी सोन्याचे दागिने हॉलमार्क केले गेले आहेत. सरकार देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या टप्प्यात त्याची अंमलबजावणी करत आहे.
या राज्यांमध्ये लागू असलेले नियम
भारत सरकार आता देशाच्या विविध भागात भेसळयुक्त सोन्याच्या दागिन्यांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नियम लागू करत आहे. मात्र, हा नियम देशात 23 जून 2021 रोजीच करण्यात आला आहे. परंतु, टप्प्याटप्प्याने विविध जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू आहे. सरकारने गुरुवारी (ता.१६) ज्या 18 जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी जाहीर केली आहे. त्यामध्ये आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, ओडिशा, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे. त्यामुळे आता देशात असे 361 जिल्हे आहेत. ज्या ठिकाणी हॉलमार्किंगशिवाय दागिने आणि सोन्याच्या कलाकृती दागिन्यांच्या दुकानात विकल्या जाणार नाहीत.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – वाढत्या महागाईतच भाजीपाल्याच्या दरात वाढ; टोमॅटो, कांदा, बटाट्याचे दर भिडलेत गगनाला!
नोंदणीकृत ज्वेलर्सच्या संख्येतही वाढ
केंद्र सरकार देशातील ज्वेलर्सच्या नोंदणीवर काम करत आहे. यामुळेच देशात नोंदणीकृत ज्वेलर्सची संख्या पूर्वीपेक्षा खूप वाढली आहे. पूर्वी नोंदणीकृत ज्वेलर्सची संख्या केवळ 34,647 होती. जी आता 1,94,039 झाली आहे. याशिवाय हॉलमार्किंग केंद्रांची संख्याही ९४५ वरून १,६२२ झाली आहे.
हे देखील वाचा – चार रुपयांच्या शेअरची कमाल, 1 लाखाचे झाले 8 लाख रुपये; गुंतवणूकदार मालामाल!
ॲपद्वारे तुम्ही हॉलमार्क केलेले सोने ओळखू शकतात
तुमच्याकडे हॉलमार्किंग असलेले कोणतेही दागिने असल्यास, परंतु ते योग्य हॉलमार्किंग आहे की नाही. याबद्दल तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही बीआयएस केअर मोबाइल ॲपद्वारे ते ओळखू शकतात. खरे तर, या ॲपचा वापर करून, ग्राहक हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सत्यता पडताळू शकतो आणि उत्पादनाच्या गुणवत्तेबद्दल किंवा बीआयएस मार्कच्या गैरवापराबद्दल त्याची तक्रार देखील नोंदवू शकतो.