सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफवरील व्याजाबाबत सरकारचा निर्णय (फोटो सौजन्य - iStock)
जर तुम्ही तुमच्या कुटुंबाचे आणि मुलांचे भविष्य लक्षात घेऊन पीपीएफ (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी पाच वर्षांत प्रथमच पॉलिसी रेट रेपो रेटमध्ये कपात केली. यानंतर, सरकार पुढील आर्थिक वर्षात पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी सारख्या लघु बचत योजनांवरील व्याजदर कमी करू शकते. सरकारकडून दर तिमाहीत लघु बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेतला जातो.
31 मार्चला घेणार आढावा
एप्रिल-जून तिमाहीचा पुढील आढावा ३१ मार्च रोजी होईल. अशा परिस्थितीत, आरबीआयच्या निर्णयाचा या बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजावर परिणाम होऊ शकतो. तथापि, अर्थ मंत्रालय व्याजदरात तात्काळ कपात करण्याचे टाळू शकते कारण नवीन व्याजदरांचा परिणाम येत्या काही महिन्यांतच दिसून येईल. शिवाय, आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत बँकांनी जास्त ठेवी उभारणे सामान्य आहे. एका सरकारी सूत्रानुसार, ‘बचत योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे.
RBI ने रेपो दरात २५ आधार अंकांची केली कपात; कर्जदारांच्या आर्थिक भार होणार कमी
लहान योजनांवरील व्याज होऊ शकते कमी
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अर्थ मंत्रालयाकडून पुढील वर्षी कधीही लहान बचत योजनांवरील व्याजदर कमी केले जाऊ शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की पीपीएफ सारख्या बचत योजना अजूनही आकर्षक राहतील कारण त्या कर लाभ आणि चक्रवाढीचा फायदा देतात. पुढील आर्थिक वर्षात, केंद्र सरकारने लघु बचत योजनेतून एकूण ३.४ लाख कोटी रुपये उभारण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर यावर्षीचा सुधारित अंदाज ४.१ लाख कोटी रुपये होता.
किती असणार व्याज
याशिवाय, महिला सन्मान योजनेअंतर्गत २०,००० कोटी रुपयांचा परतावा देण्याचीही सरकार बजेटमध्ये योजना आखत आहे कारण ही योजना मार्चमध्ये संपत आहे. सध्या, पीपीएफ अंतर्गत गुंतवणूकदारांना ७.१% व्याज दिले जाते आणि सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ८.२% वार्षिक व्याज दिले जाते. येत्या काही महिन्यांत सरकार हे दर कमी करू शकते, त्यामुळे गुंतवणूकदारांना आता पैसे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने आयकर कलम 80C अंतर्गत सूटचा लाभ देखील मिळतो.
कोण आहे मोहिनी? नावावर Ratan Tata यांनी ठेवली 500 कोटींची संपत्ती, काय आहे बिझनेस
सुकन्या समृद्धी योजना आणि PPF काय आहे
१० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने पालकाकडून भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते. (i) खाते किमान २५० रुपयांच्या सुरुवातीच्या ठेवीसह उघडता येते (ii) एका आर्थिक वर्षात किमान २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये जमा करता येतील
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही एक दीर्घकालीन बचत योजना आहे. ही केंद्र सरकारची योजना आहे. पीपीएफ खात्यात गुंतवणूक केल्यास कर सवलती मिळतात. या योजनेत, खातेधारकाला दरवर्षी किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करावे लागतात.