Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल… 84.16 कोटी रुपये पगार, कोण आहेत विजय कुमार; ज्यांची सर्वदूर होतीये चर्चा!

देशातील आघाडीची आयटी कंपनी एचसीएल टेकचे सीईओ विजय कुमार यांनी सीईओ होण्याआधी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी तामिळनाडूच्या पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंग केले आहे. विजय कुमार हे सध्या न्यू जर्सीमध्ये राहत आहे. ते एचसीएल टेक कंपनीकडून वर्षाला ८४.१६ कोटी रुपये पगार घेतात.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 27, 2024 | 08:40 PM
तब्बल... 84.16 कोटी रुपये पगार, कोण आहेत विजय कुमार; ज्यांची सर्वदूर होतीये चर्चा!

तब्बल... 84.16 कोटी रुपये पगार, कोण आहेत विजय कुमार; ज्यांची सर्वदूर होतीये चर्चा!

Follow Us
Close
Follow Us:

एखाद्या व्यक्तीला वर्षाला ८४.१६ कोटी रुपये अर्थात महिन्याला ७ कोटी रुपये इतका पगार आहे. असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही सांगणाऱ्यास वेडा ठरवल्याशिवाय राहणार नाही. कारण एखाद्या कंपनीत महिना ७ सात कोटी पगार म्हणजे ही तितकीशी सोपी बाब नाहीये. मात्र, आता देशातील आयटी कंपनीच्या सीईओंच्या पगारात मोठी वाढ होत आहे. देशातील आघाडीची आयटी कंपनी एचसीएल टेकचे सीईओ विजय कुमार हे देखील सर्वाधिक पगार घेत आहे. विशेष म्हणजे सामान्य कर्मचाऱ्यांपेक्षा तुलनेत त्यांना तब्बल ७०० पट अधिक पगार आहे.

सर्वाधिक पगार घेणारे सीईओ म्हणून ओळख

कोणतीही कंपनी म्हटले की तिचा सीईओ हा ती कंपनी चालवणारा सर्वात महत्वाचा व्यक्ती असतो. कामाचा व्याप आणि कंपनीला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी कंपनीच्या सीईओला पगारही तितका दिला जातो. सीईओ विजय कुमार यांचा वार्षिक पगार ८४.१६ कोटी रुपये इतका आहे. भारतीय आयटी कंपन्यांच्या सीईओमध्ये ते सर्वाधिक पगार घेतात. कंपनीने २२ जुलै रोजी एक अहवाल जारी केला. या अहवालानुसार, त्यांचा पगार दरवर्षी १९१ टक्क्यांनी वाढला आहे.

हेही वाचा : ओला इलेक्ट्रिक कंपनी 6000 कोटींचा आयपीओ लॉन्च करणार; गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी!

वार्षिक ८४.१६ कोटी रुपये मिळतो पगार

कंपनीच्या अहवालानुसार, सी विजय कुमार यांचे मूळ वेतन १६.३९ कोटी रुपये आहे. त्यांना बोनस म्हणून ९.५३ कोटी रुपये दिले जातात. याचसोबत लाँग टर्म इन्सेन्टिव्ह म्हणून १९.७४ कोटी रुपये दिले जातात. त्यांच्या पगारात शेअर्स, भत्ते आणि अनेक इन्सेन्टिव्हचा समावेश आहे. हा सर्व पगार मिळून त्यांना वार्षिक ८४.१६ कोटी रुपये पगार मिळतो. विजय कुमार हे १९९४ पासून एचसीएल कंपनीत काम करत आहेत.

देशातील मोठ्या कंपनीच्या सीईओंचा पगार

सर्वाधिक पगार घेणाऱ्या आयटी कंपन्यांच्या सीईओमध्ये इन्फोसिस कंपनीचे सीईओ दुसऱ्या क्रमांकावर आहे. इन्फोसिस कंपनीचे सीईओ सलील पारेख यांना ६६.२५ कोटी रुपये इतका वार्षिक पगार आहे. त्यानंतर विप्रोचे नवीन सीईओ श्रीनी पल्लिया हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना ५० कोटी रुपये इतका वार्षिक पगार मिळतो.

Web Title: Hcl tech company ceo salary vijay kumar get highest salary 84 16 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 08:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.