Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेंकेल इंडियाकडून रिसर्चर्स वर्ल्‍ड लॅबचे अनावरण; शालेय विद्यार्थ्यांना होणार फायदा!

हेंकेल रिसर्चर्स वर्ल्‍ड ८ ते १० वर्ष वयोगटातील मुलांमध्‍ये कुतूहल जागृत करण्‍यावर लक्ष केंद्रित करते आणि मुलांना प्रत्‍यक्ष संशोधकांच्या भूमिकेत आणत अध्‍यापन व अध्‍ययनाप्रती सर्वांगीण दृष्टिकोनाचा अवंलब करते.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 11, 2024 | 04:20 PM
हेंकेल इंडियाकडून रिसर्चर्स वर्ल्‍ड लॅबचे अनावरण; शालेय विद्यार्थ्यांना होणार फायदा!

हेंकेल इंडियाकडून रिसर्चर्स वर्ल्‍ड लॅबचे अनावरण; शालेय विद्यार्थ्यांना होणार फायदा!

Follow Us
Follow Us:

हेंकेल अॅधेसिव्‍ह्ज टेक्‍नॉलॉजीज प्रायव्‍हेट लिमिटेड (हेंकेल इंडिया)ने शिरगाव, पुणे येथील शारदाश्रम स्‍कूलमध्‍ये त्‍यांच्‍या रिसर्चर्स वर्ल्‍ड लॅबच्‍या उद्घाटनाची घोषणा केली आहे. रिसर्चर्स वर्ल्‍ड हा हेंकेला सिग्‍नेचर जागतिक शिक्षण उपक्रम आहे, जो विद्यार्थ्‍यांना विज्ञान विश्‍वाची ओळख करून देतो, ज्‍यामागे त्‍यांच्‍यामध्‍ये एसटीईएम विषयांबाबत उत्‍सुकता निर्माण करण्‍याचा उद्देश आहे.

हेंकेल इंडियाच्‍या २०२४-२५ साठी सीएसआर योजनेअंतर्गत स्‍थापित करण्‍यात आलेल्‍या या लॅबचे उद्घाटन हेंकेल इंडियाचे अध्‍यक्ष एस. सुनिल कुमार आणि शारदाश्रम स्‍कूलचे संस्‍थापक प्रकाश देवळे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. मावळचे शिक्षण अधिकारी संजय नाइकवाडे यांनी उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. हेंकेल रिसर्चर्स वर्ल्‍ड ८ ते १० वर्ष वयोगटातील मुलांमध्‍ये कुतूहल जागृत करण्‍यावर लक्ष केंद्रित करते आणि मुलांना प्रत्‍यक्ष संशोधकांच्या भूमिकेत आणत अध्‍यापन व अध्‍ययनाप्रती सर्वांगीण दृष्टिकोनाचा अवंलब करते.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

शारदाश्रम स्‍कूलमधील रिसर्चर्स वर्ल्‍ड लॅबमध्‍ये एका वेळी २० विद्यार्थी सामावू शकतात. ही लॅब आसपासच्‍या जवळपास ४० शाळांना साह्य करेल. प्रत्‍येक सत्रामध्‍ये प्रयोगामध्‍ये सविस्‍तर स्‍पष्‍टीकरण, उपकरणांचा वापर आणि सुरक्षितता उपायांचा समावेश आहे. ज्‍यानंतर प्रत्‍यक्ष कृती करण्‍याची सुविधा दिली जाते. ज्या ठिकाणी विद्यार्थी त्‍यांच्‍या निरीक्षणांची नोंद करू शकतात आणि फॅसिलिटेटर्ससोबत त्‍याबाबत चर्चा करू शकतात. वर्षभरात विद्यार्थी १२ प्रयोग पूर्ण करतील. ज्या ठिकाणी पुण्‍यातील हेंकेल कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाईल. जे रिसर्चर्स वर्ल्‍ड लॅबमध्‍ये शिक्षक म्‍हणून सेवा देतात.

हे देखील वाचा – एशियन पेंट्सचा शेअर 9.50 टक्क्यांनी घसरला, 2020 नंतर स्टॉकने पहिल्यांदा गाठली निच्चांकी पातळी!

या उद्घाटनाबाबत मत व्‍यक्‍त करताना एस. सुनिल कुमार म्‍हणाले आहे कि, “हेंकेल इंडियामध्‍ये आम्‍हाला शारदाश्रम स्‍कूलमध्‍ये लॅबचे उद्घाटन करण्‍याचा आनंद होत आहे. समुदायांच्‍या प्रगतीला चालना देण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेचा भाग म्‍हणून हेंकेल रिसर्चर्स वर्ल्‍डचा सर्व मुलांना एसटीईएम शिक्षण उपलब्‍ध करून देत त्‍यासंदर्भातील तफावत दूर करण्‍याचा उद्देश आहे.

याशिवाय व्‍यावहारिक ज्ञान व प्रात्‍यक्षिकांशिवाय विज्ञानाचे खरे पैलू अनुभवता येऊ शकत नाही किंवा घडवून आणले जाऊ शकत नाही. मुलांना त्‍यांच्‍या जिज्ञासू विचारसरणीला प्रकाशझोतात आणण्‍यासोबत त्‍यांच्‍यामधील वैज्ञानिक/संशोधक-सारख्‍या वृत्तीला चालना देण्‍याची संधी देण्‍याकरिता हेंकेलने रिसर्चर्स वर्ल्‍ड लाँच केले आहे. हा उपक्रम दीर्घकाळापर्यंत तरूण विचारवंतांमध्‍ये विज्ञानाप्रती आवड निर्माण करेल, तसेच त्‍यांना जिज्ञासू होण्‍यास प्रेरित करेल आणि शोध घेण्‍याची वृत्ती विकसित होण्‍यास मदत करेल.” असेही त्या म्हणाल्या आहेत.

रिसर्चर्स वर्ल्‍ड उपक्रमाची आता २० देशांमध्‍ये यशस्‍वीरित्‍या अंमलबजावणी करण्‍यात आली आहे. भारतात या उपक्रमाचे लाँन्चिंग या जागतिक उपक्रमासाठी उत्‍साहवर्धक विस्‍तारीकरण आहे. एप्रिल २०११ मध्‍ये हेंकेलच्‍या डसलडॉर्फ मुख्‍यालयामध्‍ये या उपक्रमाचे उद्घाटन केल्‍यापासून जगभरातील १००,००० हून अधिक मुलांनी हेंकेलच्‍या रिसर्चर्स वर्ल्‍ड उपक्रमांमध्‍ये सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचा दैनंदिन जीवनामध्‍ये महत्त्वपूर्ण परीक्षण, विश्‍लेषण, डेटा, विज्ञान व सर्जनशीलतेचे स्‍पष्‍टीकरण अशा वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍याचा उद्देश आहे.

हेंकेलच्‍या भारतातील सीएसआर प्रयत्‍नांनी वंचित पार्श्‍वभूमींमधील विद्यार्थ्‍यांना मदतीचा हात पुढे करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे. ज्या ठिकाणी अशा समर्पित लॅब्‍सच्‍या माध्‍यमातून आवश्‍यक अध्‍ययन संधी दिल्‍या जात आहेत. तसेच हेंकेलने अॅस्‍ट्रॉनॉमी लॅब, शाश्‍वत शिक्षण, करिअर मार्गदर्शन, क्रीडा व सांस्‍कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांसाठी शारदाश्रम स्‍कूलसोबत सहयोग केला आहे.

Web Title: Henkel india unveils researchers world lab school students will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 04:20 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.