
Chairman Gopichand P. Hinduja
हिंदुजा ग्रुपचे दिवंगत अध्यक्ष श्रीचंद हिंदुजा यांचे २०२३ मध्ये निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची सूत्रे गोपीचंद पी. हिंदुजा यांनी स्वीकारली होती. अशातच त्यांचे हि लंडनमध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. गोपीचंद पी. हिंदुजा यांचे ते धरून चार भावंड आहेत. २०२५ च्या या वर्षी, संडे टाईम्सच्या प्रकाशित करण्यात आलेल्या यादीत ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून अव्वल स्थान मिळवले होते. गोपीचंद हिंदुजा यांनी मुंबईत १९५९ मध्ये हिंदुजा ग्रुपमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
हेही वाचा : Share Market Holiday: गुरुनानक जयंतीला बाजार राहणार का बंद? कधी असणार सुट्टी
त्यांच्या पश्चात त्यांची दोन भावंड प्रकाश पी. हिंदुजा व अशोक पी. हिंदुजा तसेच, त्यांच्या पत्नी आणि दोन मुले व एक मुलगी आहे. गोपीचंद हिंदुजा यांच्या पत्नीचे नाव सुनीता हिंदुजा आहे. हिंदुजा ग्रुपने १९८४ मध्ये गोपीचंद पी. हिंदुजा यांच्या निर्णयानंतर गल्फ ऑइलचे हाती घेतले. त्यानंतर त्यांनी कर्जबाजारी अशोक लेलँड १९८७ मध्ये विकत घेतली होती.भारतात ही घटना सर्वात मोठ्या कॉर्पोरेट यशोगाथांपैकी एक असल्याचे मानले जाते. त्यांच्या कार्यकाळात कंपनीने वीजसह पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रातही स्वता:चे अस्तित्व मजबुतीने प्रस्थापित केले.
गोपीचंद हिंदुजा यांचे शिक्षण जय हिंद कॉलेज मुंबई मधून पूर्ण झाले आहे. त्यानंतर वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून त्यांनी कायद्यात डॉक्टरेट पूर्ण केली. तर पुढे, लंडनमधील रिचमंड कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट काबीज केली.
हिंदुजा परिवार लंडनमध्ये राहत असले तरी त्यांचे मूळ भारतात स्थित आहे. हिंदुजा ग्रुपचे मुख्यालय मुंबईत असून बँकिंग, वित्त, ऊर्जा, मीडिया, ट्रकिंग, लुब्रिकंट्स आणि केबल टेलिव्हिजन या सर्व क्षेत्रात यांचा दबदबा टिकून आहे. या ग्रुपमध्ये जवळपास २००,००० हून अधिक कामगार काम करतात. सध्या पाकिस्तानमध्ये असलेली सिंध येथे १९१९ मध्ये हिंदुजा ग्रुपची स्थापना परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी केली होती.