Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…हक्काच्या घराचे स्वप्न धुसर; प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किंमतीत तब्बल 30 टक्क्यांनी झालीये वाढ!

देशातील टॉप 7 शहरांमध्ये घरांच्या किमती 32 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यात प्रामुख्याने जमिनीच्या वाढत्या किमती आणि सातत्याने वाढणारा बांधकाम खर्च याला जबाबदार धरले जात आहे. देशातील घरांच्या किमती हैदराबादमध्ये सर्वाधिक वाढल्या आहेत. याशिवाय दिल्ली एनसीआर, मुंबई महानगर प्रदेश, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि पुणे येथे देखील घरांच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 30, 2024 | 04:19 PM
...हक्काच्या घराचे स्वप्न धुसर; प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किंमतीत तब्बल 30 टक्क्यांनी झालीये वाढ!

...हक्काच्या घराचे स्वप्न धुसर; प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किंमतीत तब्बल 30 टक्क्यांनी झालीये वाढ!

Follow Us
Close
Follow Us:

स्वतःचे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु, गेल्या काही वर्षांत हे स्वप्न अनेकांसाठी कठीण होत चालले आहे. देशातील बड्या शहरांमध्ये हे काम आणखीनच कठीण होत आहे. टॉप 7 शहरांमध्ये घरांच्या किमती 32 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यात प्रामुख्याने जमिनीच्या वाढत्या किमती आणि सातत्याने वाढणारा बांधकाम खर्च याला जबाबदार धरले जात आहे. देशातील घरांच्या किमती हैदराबादमध्ये सर्वाधिक वाढल्या आहेत. याशिवाय दिल्ली एनसीआर, मुंबई महानगर प्रदेश, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि पुणे येथे घरांच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत.

टॉप 7 शहरांमध्ये घरांच्या किमतींत 23 टक्क्यांनी वाढ

रिअल इस्टेट कन्सल्टंट फर्म एनरॉकच्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशातील टॉप 7 शहरांमधील घरांच्या किमती वार्षिक आधारावर सरासरी 23 टक्क्यांनी वाढल्या आहेत. हैदराबादमध्ये सर्वाधिक 32 टक्के वाढ झाली आहे. दिल्ली एनसीआर आणि बेंगळुरूमध्ये 29 टक्के, मुंबई एमएमआरमध्ये 24 टक्के, पुणे आणि चेन्नईमध्ये 16 टक्के आणि कोलकातामध्ये 14 टक्के दर वाढले आहेत. अहवालानुसार, पहिल्या 7 शहरांमधील सरासरी किमती गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत प्रति चौरस फूट रुपये 6,800 वरून 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत 8,390 रुपये प्रति चौरस फूटपर्यंत वाढल्या आहेत.

हे देखील वाचा – राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये अनुदान जमा; सोयाबीन, कापूस उत्पादकांना दिलासा!

काय आहेत घरांच्या किंमतींच्या वाढीमागील कारणे

घरांच्या किमती गेल्या काही तिमाहीत सातत्याने वाढत आहेत. जमिनीचे भावही सातत्याने वाढत आहेत. सिमेंट, रिबार, गिट्टी, वाळू आणि मजुरांवर होणारा खर्चही वाढत आहे. आलिशान घरांची मागणी वाढल्याने घरांच्या किमतीतही वाढ झाली आहे. ॲनारॉकच्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबरमध्ये घरांची विक्री 11 टक्क्यांनी घसरून, 1,07,060 युनिट्सवर आली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 1,20,290 युनिट्स इतकी नोंदवली गेली होती. याशिवाय नवीन घरांच्या पुरवठ्यातही 19 टक्के घट झाली आहे. जुलै-सप्टेंबरमध्ये 93,750 नवीन घरे विक्रीसाठी समोर आले होते. तर 2023 मध्ये याच कालावधीत 1,16,220 नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली होती.

शहरनिहाय किती झालीये वाढ

दिल्ली एनसीआरमध्ये सध्या प्रॉपर्टीचे दर 7,200 रुपये प्रति चौरस फूट इतके झाले आहेत. जे एका वर्षापूर्वी 5,570 रुपये प्रति चौरस फूट इतके होते. याशिवाय बेंगळुरूमध्ये घरांच्या किमती 8,100 रुपये प्रति चौरस फूटाने वाढल्या आहेत. जे गेल्या वर्षी 6,275 रुपये प्रति चौरस फूट इतके होते. हैदराबादमध्ये हे दर 5,400 रुपये प्रति चौरस फूट वरून, 7,150 रुपये प्रति चौरस फूट झाले आहेत.

मुंबई एमएमआरमधील घरांच्या किमती 13,150 रुपये प्रति चौरस फूट वरून, 16,300 रुपयांवर गेल्या आहेत. पुण्यात प्रति चौरस फूट ६,५५० रुपयांच्या तुलनेत आता ७,६०० रुपये प्रति चौरस फूट मोजावे लागतात. चेन्नईमध्ये हाच दर 5,770 रुपये प्रति चौरस फूट वरून, 6,680 रुपये प्रति चौरस फूट झाला आहे. कोलकात्यात किंमती 5,700 रुपये प्रति चौरस फूट वर गेल्या आहेत. जी एका वर्षापूर्वी 5,000 रुपये प्रति चौरस फूट इतकी होती.

Web Title: Housing prices in major cities have increased by as much as 30 percent dream of the house of right is dim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 04:19 PM

Topics:  

  • real estate

संबंधित बातम्या

Home Price Hike: घराचे स्वप्न महागलं, ठाण्यात घरं ४६ टक्क्याने महाग, अ‍ॅनारॉक ग्रुपचा अहवाल समोर
1

Home Price Hike: घराचे स्वप्न महागलं, ठाण्यात घरं ४६ टक्क्याने महाग, अ‍ॅनारॉक ग्रुपचा अहवाल समोर

घर खरेदी करणे होईल सोपे! नवीन निवासी प्रकल्प होणार सुरू, जाणून घ्या
2

घर खरेदी करणे होईल सोपे! नवीन निवासी प्रकल्प होणार सुरू, जाणून घ्या

मालमत्ता खरेदीदारांना दिलासा, सर्कल रेटमध्ये वाढ असूनही एलडीएने घेतला ‘हा’ निर्णय
3

मालमत्ता खरेदीदारांना दिलासा, सर्कल रेटमध्ये वाढ असूनही एलडीएने घेतला ‘हा’ निर्णय

जागतिक तणावाच्या काळातही भारतीय गुंतवणूकदारांनी रिअल इस्टेटमध्ये दाखवली ताकद, देशांतर्गत गुंतवणूक ५३ टक्के वाढली
4

जागतिक तणावाच्या काळातही भारतीय गुंतवणूकदारांनी रिअल इस्टेटमध्ये दाखवली ताकद, देशांतर्गत गुंतवणूक ५३ टक्के वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.