
RBI Policy: RBI's 'December Surprise'?
जर तुमचे बँक खाते निष्क्रिय झाले तर तुम्ही त्या खात्यातून पैसे अथवा ऑनलाइन व्यवहार देखील करू शकणार नाही. यामध्ये प्रामुख्याने सेविंग अकाऊंट, करंट अकाऊंट आणि मुदत ठेवी यांचा समावेश आहे. जर खात्याची मुदत संपली असेल आणि अधिक काळ त्या खात्यातून काहीच व्यवहार झाले नसतील तर बँक संबधित खाते बंद करते. यामुळे खातेदारचे ऑनलाइन बँकिंग, नेट बँकिंग आणि एटीएममधून पैसे काढणे या सुविधा बंद करण्यात येतील. आणीबाणीच्या काळात जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही त्याचा वापर करू शकणार माही.
त्याचबरोबर, जर तुमचे ऑटो-डेबिट असेल; म्हणजेच,टीव्ही रिचार्ज, वीज बिल किंवा विमा प्रीमियमसाठी ऑटो-डेबिट पर्याय निवडला असेल तर खाते बंद झाल्यावर ते सुद्धा बंद होते. बँकेकडून तुमच्या खात्यासंबधित येणारे एसएमएस आणि ईमेल अलर्ट बंद करण्यात येतात. त्यामुळे व्याजदरांमध्ये बदल किंवा खात्याशी संबंधित इतर बदल तुमच्या पर्यंत पोहोचवण्यात अडथळा येतो. बराच काळ जर खाते निष्क्रिय राहिले तर हॅकिंग सारख्या अडचणी येऊ शकतात.
बंद खाते पुन्हा सक्रिय करण्याची प्रक्रिया
यादरम्यान, रिझर्व्ह बँके निष्क्रिय खात्यांवर कोणतेही शुल्क घेत नाही. फक्त किमान शिल्लक किंवा चेकबुक शुल्क लागू शकते. तुमचे बँकेत जर पैसे अडकले असतील तर काळजी करायची गरज नाही कारण, ते पैसे आरबीआयच्या डेफमध्ये जमा केले जातात. बँक खाते सुरू झाल्यावर आरबीआयकडून तुमच्या बँकेद्वारे पैसे मागू शकता. मात्र, या प्रक्रियेत बँक तुमचे मागील रेकॉर्ड, स्वाक्षरी आणि ओळख तपासते. बंद खाते सुरू करण्यासाठी ऑनलाइन पडताळणी शक्य नसल्याने प्रत्यक्ष बँकेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.