
'मूलमंत्र बचतीचा" , सोप्या पद्धतीने कशी करावी पैशांची गुंतवणूक ? काय सांगतात तज्ज्ज्ञ, जाणून घ्या
असं म्हणतात की, लक्ष्मी आणि कुबेराला सोडून सगळ्यांनाच धनसंपत्ती कितीही असलीी तरी कमीच पडते. काळानुरुप वाढत जाणाऱ्य़ा गरजा, जबाबदाऱ्या आणि नोकरी- व्ययसायातील अस्थिरता प्रत्येकाला अडचणीत आणते.अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्य़ा मुलभूत गरजा असल्या तरी, त्या गरजा पूर्ण करण्याकरीता पैशांची गरज ही लागतेच. ऑनलाईन ट्रेडींग, एसआय. पी., म्युच्युअल फंड, क्रिप्टो करन्सी आणि स्टॉक मार्केट या सध्याच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैशांची गुंणतवणूक करण्याचे पर्याय आहेत. अनेकांना हातात खेळणारा पैसा कुठे आणि कसा वापरायचा याबाबत ज्ञान नसतं. म्हणूनच सध्याच्या काळात हा प्रत्येकाने अर्थसाक्षर होणं गरजेचं आहे. असं अर्थतज्ज्ञ कायम सांगतात. सुप्रसिद्ध उद्योजक आणि मार्गदर्शक प्रफुल्ल वानखेडे यांनी त्यांच्या ‘गोष्ट पैशापाण्याची’ .या पुस्तकात अर्थसाक्षरतेबाबत संशोधनात्मक माहिती दिली आहे.
जो पगार आपल्याला मिळतोय तो कुठे आणि कसा गुंतवायचा, चांगले परतावे कसे मिळवायचे यासाठी सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे वाचन. आर्थसाक्षर होण्यासाठी तुम्ही तज्ज्ञांची पुस्तकं वाचायली पाहिजे. विविध अर्थतज्ज्ञांनी जागतिक पातळीवर केलेलं संशोधन, त्यांचा अभ्यास आणि त्यांची मतं तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यासली पाहिजेत. असं उद्योजक वानखेडे यांनी त्यांच्या ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकात नमुद केले आहे. वानखेडे ‘लेट्स रीड इंडिया’ या त्यांच्या वाचन चळवळीतून गुंतवणूकीबाबत मार्गदर्शन करत असतात.
हेही वाचा- इंडियन बॅंक आणि टाटा मोटर्समध्ये महत्वाचा करार ! व्यावसायिक वाहन खरेदीदारांना होणार लाभ
महिन्याच्या शेवटी मिळणारा दहा-बारा आकडी पगार, सेव्हन स्टार हॉटेलमध्ये राहीलं म्हणजे कोणी अर्थसाक्षर होत नाही. गरज नसताना चैनीच्या वस्तू खरेदी करणं किंवा श्रीमंतीचा दिखाऊपणा करणं टाळायला हवं. अनाठायी पैसे खर्च करणं हे अधोगतीचं लक्षण आहे. पैशांची बचत करणं आणि कंजूशीनं वागणं यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे.
हेही वाचा-मॅग्मा एचडीआय तर्फे ‘डबल सुरक्षा’ योजनेचा शुभारंभ, प्रत्येक उत्पन्न गटासाठी परवडणारे विमा संरक्षण
शाळेत शिक्षक हुशार विद्यार्थ्याच्या बाजूला ढ मुलांना बसवतात. जेणेकरुन हुशार विद्यार्थ्याच्या संगतीमुळे इतर मुलं अभ्यास करायला लागतीस. हाच नियम इथे देखील लागू होतो. तुम्ही कोणत्या माणसांच्या संगतीत राहता त्याचा परिणाम तुमच्या बुद्धिमत्तेवर होत असतो. जर तुम्ही तुमची संगत उद्योजक, अर्थतज्ज्ञ किंवा पैसे गुंतवणूकीवर सल्ला देणाऱ्या व्यक्तींशी ठेवलीत तर तुम्हाला भविष्यात याचा चांगला फायदा होतो. पैशांप्रमाणे चांगल्या माणसांमध्ये केलेली गुंतवणूक आयुष्यभराची कमाई असते.