'डबल सुरक्षा' योजना काय आहे
मुंबई: अधिक खर्चामुळे सर्वसमावेशक आरोग्य योजना परवडत नसलेल्या व्यक्ती अथवा रुग्णालयामध्ये भरतीदरम्यान बेहिशेबी खर्चासाठी अतिरिक्त कव्हरेज शोधणाऱ्या श्रीमंत व्यक्तींसाठी ‘डबल सुरक्षा’ कवच स्थिर स्वरुपात दैनिक रोख लाभ प्रदान करते. ‘डबल सुरक्षा’ कवच पॉलिसीधारकांना त्यांच्या वैयक्तिक गरजांच्या आधारे रुग्णालय उपचाराशी संबंधित वैद्यकीय किंवा गैर-वैद्यकीय खर्चाकरिता पेआउट वापरण्याची आर्थिक लवचिकता प्रदान करते.
ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याच्या उद्देशाने मॅग्मा एचडीआयने विस्तृत पातळीवर विविध शहरात केलेल्या गुणात्मक संशोधनरुपी अभ्यासातून हे सुरक्षा कवच प्रत्यक्षात आकारास आले आहे. संशोधनातून कंपनीला असे आढळले आहे की, रुग्णालयातील उपचारांमुळे वैद्यकीय खर्चात वाढ होत असते किंवा त्यात अनपेक्षित भरही पडत असते. समाजातील मध्यम उत्पन्न वर्गातील व्यक्तींचे उपचारावेळी नियमित कामकाज थांबल्याने त्यांच्या उत्पन्नालाही फटका बसतो. सर्वसमावेशक आरोग्य विमा योजनेच्या तुलनेत ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार विमा पेआउट वापरण्याची लवचिकता देणाऱ्या कमी खर्चाच्या विमा पर्यायाची तीव्र गरज असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले.
कशी आहे योजना
नव्या योजनेबाबत भाष्य करताना मॅग्मा एचडीआयचे आरोग्य आणि अपघात विभागाचे प्रमुख अमित सिरसीकर म्हणाले, “ ग्राहकांना वास्तविक जीवनात भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देता यावे, यासाठी ‘डबल सुरक्षा’ योजना तयार करण्यात आलेली आहे. एखाद्या व्यक्तीकडे आधीपासून सर्वसमावेशक आरोग्य विमा कवच आहे किंवा नाही यानुसार ‘ ‘डबल सुरक्षा’ योजना प्रत्येकासाठी प्रासंगिकतेनुसार वेगवेगळी असू शकते.
हेदेखील वाचा – भारताचा विकास दर जागतिक अर्थव्यवस्थेत सर्वाधिक चांगलाः वर्ल्ड बँक चीफ अजय बंगा
‘डबल सुरक्षा’ कवच
अनेकदा असेही आढळून आले आहे की, आरोग्य विमा कवच असलेल्यांना देखील अनपेक्षित खर्चांचा सामना करावा लागतो. बहुतेक आरोग्य पॉलिसींमध्ये समाविष्ट नसलेल्या उपभोग्य वस्तूंचा करावा लागणारा वापर किंवा रुग्णालयात उपचार सुरु असताना रुग्णासोबत राहणाऱ्या सहकारी व्यक्तीचा प्रवास आणि भोजनाचा खर्च यासारख्या अनपेक्षित खर्चाला तोंड द्यावे लागते. जेव्हा उपचारासाठी अन्य शहरात जाणे आवश्यक असते, तेव्हा सहकारी व्यक्तीच्या राहण्याच्या खर्चाची भर पडून हे खर्च आणखी वाढतात. पॉलिसीधारकांना आर्थिक सहाय्य प्रदान करत या अतिरिक्त खर्चाच्या पूर्ततेसाठी ‘डबल सुरक्षा’ कवच आवश्यक ती पावले उचलते.
महत्त्वाचा आधार
सर्वसमावेशक आरोग्य योजना परवडत नसलेल्या ट्रक ड्रायव्हर्स किंवा घरगुती कामगारांसारख्या व्यक्तींना ही योजना महत्त्वाचा आधार देते. या योजनेआधारे ते वैद्यकीय खर्च पेलू शकतात आणि उपचारासाठी रुग्णालयात भरती असताना होणाऱ्या उत्पन्न नुकसानीपासून स्वत:चे संरक्षण देखील करू शकतात. ही योजना खऱ्या अर्थाने आपल्या वचनाला मूर्त रूप देते: चलती रहे जिंदगी, रुकावटों पे रुके नहीं याचाच अर्थ कोणत्याही अडथळ्यांना न जुमानता जीवन पुढे सरकत राहते, याची खात्री ही योजना करते.”
दुहेरी लाभ
‘डबल सुरक्षा’ हे नाव दोन कठीण परिस्थितींमध्ये दुहेरी दैनिक रोख लाभाचे प्रतिनिधित्व करते. आयसीयू रुग्णालय उपचार आणि अपघातामुळे होणारे रुग्णालय उपचार. ‘डबल सुरक्षा’ अनेक पूरक आणि वैकल्पिक कवच प्रदान करते. त्याआधारे पॉलिसीधारकांना आपल्या वैयक्तिक गरजांनुसार स्वत:साठी विमा कवच तयार करता येते. ग्राहकाच्या गरजेनुसार निश्चित करता येणारी विम्याची रक्कम आणि पॉलिसीसाठी लवचिक कालावधीसह ही योजना विविध आर्थिक परिस्थितींशी जुळवून घेण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे.
मुख्य अतिरिक्त सुविधांमध्ये समाविष्ट घटक:






