फोटो सौजन्य - Social Media
मत्स्यपालन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला सशक्त करण्याचा एक चांगला आणि शाश्वत पर्याय मानला जातो. हे केवळ प्रथिनयुक्त आहाराचा मुख्य स्रोत नसून रोजगार आणि आर्थिक विकासातही मोठे योगदान देते. आज अनेक लोक या व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहेत. जर तुम्ही व्यवसाय सुरु करण्याचा आणि अफाट पैसे कमावण्याचा विचार करत आहात तर नक्कीच मत्स्यपालन उत्तम पर्याय आहे. खरं तर, भारत हा जगात तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मासे उत्पादक देश आहे आणि मत्स्यपालन क्षेत्रात (Aquaculture) दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत समुद्री आणि गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजाती जसे की कॅटफिश, टिलापिया आणि कार्प यांची मोठ्या प्रमाणावर शेती करतो. सूत्रांनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताचा समुद्री खाद्यपदार्थ निर्यात ६०,००० कोटी रुपयांहून अधिक होता, ज्यामध्ये फ्रोजन झिंग्याचा (shrimp) वाटा सर्वाधिक आहे.
ब्लू रेव्हॉल्यूशन आणि सरकारी योजना
भारत सरकारने ब्लू रेव्हॉल्यूशनच्या अंतर्गत मत्स्यपालनाला “सनराइज सेक्टर” (Sunrise Sector) म्हणून घोषित केले आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या अर्थसंकल्पात वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी या क्षेत्रासाठी २०,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम मत्स्यपालन केंद्रे, कोल्ड स्टोरेज आणि प्रक्रिया युनिट्सच्या आधुनिकीकरणासाठी वापरली जाणार आहे. याशिवाय, माशांच्या खाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील सीमा शुल्क 5 टक्क्यांवर आणण्यात आले आहे.
मत्स्यपालनाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील Pond System पारंपारिक पद्धत आहे. यात गोड्या पाण्यामध्ये माशांचे संवर्धन केले जाते. Cage System मध्ये समुद्रात किंवा तलावामध्ये माशांचे संवर्धन केले जाते. Recirculating System यात आधुनिक तंत्रज्ञान, ज्यामध्ये पाणी फिल्टर करून पुनर्वापरासाठी वापरले जाते. तर इंटिग्रेटेड मल्टीट्रॉफिक मत्स्यपालन (IMTA)मध्ये वेगवेगळ्या स्तरांवर राहणाऱ्या जलीय जीवांचा एकत्रितपणे संवर्धन केला जातो.
अशा प्रकारे करा मत्स्यपालन व्यवसायाची सुरुवात
व्यवसाय वाढवण्यासाठी चांगली मार्केटिंग रणनीती तयार करा आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. भारतामध्ये मत्स्यपालन हा केवळ व्यवसाय नव्हे, तर ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाचा घटक ठरत आहे.