Share Market Today: कशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात? तज्ज्ञांनी काय सांगितलं? जाणून घ्या सविस्तर
१२ ऑगस्ट रोजी आज देखील शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,५९५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ३२ अंकांनी कमी होता. अमेरिका आणि चीनने टॅरिफ युद्धविराम आणखी ९० दिवसांसाठी वाढवल्यानंतर आशियाई बाजारपेठांमध्ये उत्साह कायम आहे.
सोमवारी ११ ऑगस्ट रोजी, शॉर्ट-कव्हरिंग आणि सर्वत्र खरेदीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराने जोरदार तेजी दाखवली. सेन्सेक्स ७४६.२ ९ अंकांनी म्हणजेच ०.९३% ने वाढून ८०,६०४.०८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २२१.७५ अंकांनी म्हणजेच ०.९१% ने वाढून २४,५८५.०५ वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ५०५.८५ अंकांनी किंवा ०.९२% ने वाढून ५५,५१०.७५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
सोमवार, ११ ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ झाली. बेंचमार्क, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, जवळजवळ एक टक्क्याने वाढले. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार हिंदुस्तान एरोनॉटिक्स, ओएनजीसी, कोचीन शिपयार्ड, जिंदाल स्टील अँड पॉवर, भारत डायनॅमिक्स, हिंडाल्को इंडस्ट्रीज, इंडियन हॉटेल्स ( आयएचसीएल ), बाटा इंडिया, अशोका बिल्डकॉन, अदानी एंटरप्रायझेस, एसजेव्हीएन, अॅस्ट्रल लिमिटेड, टिळकनगर इंडस्ट्रीज, श्री विजय इंडस्ट्रीज या स्टॉक्सवर लक्ष क्रेंद्रीत करू शकतात.
एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी आज गुंतवणूकरांना १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये मुंजाल ऑटो इंडस्ट्रीज, बजाज हिंदुस्थान शुगर आणि नेटवर्क १८ यांचा समावेश आहे.
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकरांना तीन स्टॉकची खरेदी-विक्री करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये IRFC, लॉरस लॅब आणि वरुण बेव्हरेजेस यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकरांना पाच ब्रेकआउट स्टॉकची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड, नवा, व्ही गार्ड इंडस्ट्रीज आणि सॅफायर फूड्स इंडिया यांचा समावेश आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंटमधील डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकरांना इंडियन बँक, पीबी फिनटेक आणि वन ९७ कम्युनिकेशन्स (पेटीएम) चे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आयसीआयसीआय बँक , ग्रासिम इंडस्ट्रीज, आरआयटीईएस लिमिटेड, द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज आणि एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग हे आज, १२ ऑगस्ट २०२५ रोजी एक्स-डिव्हिडंड ट्रेडिंगसाठी ५ प्रमुख स्टॉक्समध्ये आहेत.