Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hurun India 500 List: ‘या’ आहेत भारतातील टॉप 10 कंपन्या, हुरुन इंडियाने जाहीर केली यादी

Hurun India 500 List: हुरून इंडियाने नुकतीच भारतातील टॉप 500 कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, आणि एचडीएफसी बँक टॉप 10 कंपन्यांमध्ये आहे.

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Feb 19, 2025 | 12:34 PM
'या' आहेत भारतातील टॉप 10 कंपन्या, हुरुन इंडियाने जाहीर केली यादी (फोटो सौजन्य _सोशल मीडिया)

'या' आहेत भारतातील टॉप 10 कंपन्या, हुरुन इंडियाने जाहीर केली यादी (फोटो सौजन्य _सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

Hurun India 500 List Marathi News: अ‍ॅक्सिस बँकेच्या बँकिंग युनिट बरगंडी प्रायव्हेट आणि हुरून इंडियाने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या यादीनुसार, भारतातील टॉप १० सर्वात मौल्यवान कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप सौदी अरेबियाच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. यामध्ये मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या क्रमांकावर आहे.

हुरुन इंडियाने भारतातील टॉप १० मौल्यवान कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिले स्थान भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे आहे. दुसऱ्या क्रमांकावर टाटा समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आहे. अ‍ॅक्सिस बँकेच्या बँकिंग युनिट बरगंडी प्रायव्हेट आणि हुरून इंडियाने जाहीर केलेल्या यादीनुसार, भारतातील टॉप १० सर्वात मौल्यवान कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप सौदी अरेबियाच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे.

Todays Gold Price: काय आहेत आजचे सोन्या – चांदीचे भाव? खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर

रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि एचडीएफसी बँक भारतातील टॉप १० सर्वात मौल्यवान कंपन्यांमध्ये आहेत. भारतातील टॉप ५०० कंपन्यांचे एकत्रित मूल्य ३.८ ट्रिलियन डॉलर्स आहे, जे भारताच्या स्वतःच्या जीडीपी आणि संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया आणि स्पेनच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे.

या सर्व कंपन्यांनी देशांतर्गत शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 पेक्षा चांगली कामगिरी केली आहे, जे अनुक्रमे २७ टक्के आणि ३० टक्क्यांनी वाढले आहेत, तर कंपन्यांची सरासरी वाढ ४०टक्के होती.

टॉप १० कंपन्या आणि त्यांचे मूल्य

१. रिलायन्स इंडस्ट्रीज: मूल्य: ₹१७,५२,६५० कोटी

२. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS): मूल्यः ₹१६,१०,८०० कोटी

३. एचडीएफसी बँक: मूल्यः ₹१४,२२,५७० कोटी

४. भारती एअरटेल: मूल्यः १९,७४,४७० कोटी

५. आयसीआयसीआय बँक: मूल्यः १९,३०,७२ कोटी

६. इन्फोसिस: मूल्यः ₹७,९९,४० कोटी

७. आयटीसी: मूल्य: ₹५,८०,६७० कोटी

८. लार्सन अँड टुब्रो: मूल्यः ₹५,४२,७७० कोटी

९. एचसीएल टेक्नॉलॉजीज: मूल्यः ₹५,१८,१७० कोटी

१०. राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई): मूल्यः ₹४,७०,२५० कोटी

टाटा सन्स सर्वात मौल्यवान औद्योगिक कंपनी

टाटा सन्स ही सर्वात मूल्यवान औद्योगिक कंपनी होती, तिच्या अंतर्गत १५ कंपन्या आहेत, ज्यांचे शेअर्स ३७ टक्क्यांनी वाढून ३२.२७ लाख कोटी रुपये झाले. टॉप ५०० कंपन्यांच्या एकूण मूल्यात या समूहाचा वाटा १०टक्के आहे.

सर्वात वेगाने वाढणारी कंपनी

ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस ही यादीतील सर्वात वेगाने वाढणारी कंपनी होती, ज्यात वार्षिक मूल्य वाढीचा दर २९७ टक्के होता. आता आयनॉक्स विंड आणि झेप्टो या कंपन्या वेगाने वाढत आहेत.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ही भारतातील सर्वात मौल्यवान नॉन-लिस्टेड कंपनी आहे. २०२४ मध्ये त्याचे मूल्य २०१ टक्क्यांनी वाढून ₹४.७ लाख कोटी होण्याची अपेक्षा आहे.

‘या’ Made In India वॉटर प्‍युरिफिकेशन ब्रँडच्या तिसऱ्या तिमाहीत झाली दमदार वाढ

Web Title: Hurun india 500 list these are the top 10 companies in india the list announced by hurun india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 12:34 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.