'या' आयपीओला गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद; ८२ टक्क्यांपर्यंत नफा मिळण्याचे संकेत!
आईडेंटिकल ब्रेन्स स्टूडियोच्या आयपीओने शेअर बाजारात जोरदार एंन्ट्री करण्यासाठी तयारी केली आहे. कंपनीचा आयपीओ 18 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी खुला होता. स्टॉक मार्केटमध्ये या शेअरची लिस्टिंग 26 डिसेंबर रोजी होणार आहे. तथापि, सूचीबद्ध होण्यापूर्वीच, आयडेंटिकल ब्रेन स्टुडिओच्या आयपीओच्या जीएमपीने शेअर बाजारात खळबळ उडवून दिली आहे.
जोरदार सबस्क्रिप्शन मिळाले
आईडेंटिकल ब्रेन्स स्टूडियोचा आयपीओ पहिल्याच दिवशी 30.25 पट सबस्क्राइब झाला आहे. विशेषत: किरकोळ श्रेणीमध्ये 49.46 पट, एनआयआय श्रेणीमध्ये 22.43 पट आणि क्युआयबी श्रेणीमध्ये 2.61 पट सदस्यता प्राप्त झाली आहे. दुसऱ्या दिवशी, यास अधिक गती मिळाली असून, या आयपीओची एकूण सदस्यता 145.44 पट झाली आहे. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी 223.27 वेळा, एनआयआय गुंतवणूकदारांनी 135.09 वेळा आणि क्युआयबी गुंतवणूकदारांनी 17.43 वेळा सहभाग घेतला आहे.
किती आहे जीएमपी
आईडेंटिकल ब्रेन्स स्टूडियो या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात 26 डिसेंबर रोजी लिस्टिंग होणार आहे. ग्रे मार्केटमध्ये याला जोरदार मागणी आहे. जो 92.59 टक्क्यांनी लिस्टिंग वाढ दर्शवत आहे. 54 रुपयांच्या इश्यू किंमतीच्या विरूद्ध, तो 104 रुपयांवर सूचीबद्ध केला जाऊ शकतो.
सर्वसामान्यांना झटका! जीएसटी परिषदेने ‘तो’ निर्णय घेण्याचे टाळले; महागाईचा फटका बसणार
कुठे वापरला जाणार आयपीओचा निधी
आयपीओमधून उभारलेली रक्कम कंपनीच्या विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी वापरली जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या पैशाचा वापर अंधेरी ऑफिसला हायटेक करण्यासाठी केला जाणार आहे. लखनऊमध्ये नवीन शाखा कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. कलर ग्रेडिंग, डिजिटल इंटरमीडिएट (डीआय) आणि साउंड स्टुडिओ सेटअप, हाय-टेक कॉम्प्युटर, स्टोरेज सिस्टम आणि सॉफ्टवेअर खरेदी करणे. खेळते भांडवल आणि इतर गरजा पूर्ण केल्यानंतर हे होणार आहे.
कंपनीची सेवा आणि क्लायंट बेस
आयडेंटिकल ब्रेन स्टुडिओ वेब मालिका, टीव्ही शो, माहितीपट आणि जाहिरातींसाठी VFX सेवा प्रदान करते. कंपनीच्या मोठ्या ग्राहकांमध्ये प्रसिद्ध स्टुडिओ आणि बॉलिवूडचे निर्माते यांचा समावेश आहे.
कशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती
कंपनीची आर्थिक कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 5.34 कोटी रुपये इतका राहिला आहे. जो आर्थिक वर्ष २०२३ मधील असलेल्या 1.61 कोटींच्या नफ्यापेक्षा तिप्पट आहे. ऑपरेटिंग महसूल आर्थिक वर्ष २०२४ मध्ये 20.08 कोटी रुपयांवर पोहोचला, जो आर्थिक वर्ष २०२३ मध्ये 8.04 कोटी रुपये होता.
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी
VFX उद्योगाची वाढती मागणी आणि कंपनीची चांगली कामगिरी लक्षात घेता हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक संधी ठरू शकतो. कंपनीच्या विस्तार योजना आणि वाढत्या महसुलामुळे ती दीर्घकालीन मजबूत कंपनी बनू शकते.