Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणुकीची सुवर्णसंधी! पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचा IPO ‘या’ तारखेला होणार खुला; जाणून घ्या प्राईस बँड

पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचा आयपीओ २४ फेब्रुवारी २०२६ रोजी खुला होणार आहे. ₹३६७-₹३८६ प्राईस बँड असलेल्या या आयपीओद्वारे कंपनी १५ नवीन स्टोअर्स सुरू करणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 16, 2026 | 08:28 PM
पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचा IPO 'या' तारखेला होणार खुला (Photo Credit- X)

पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचा IPO 'या' तारखेला होणार खुला (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
  • पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचा IPO ‘या’ तारखेला होणार खुला
  • जाणून घ्या प्राईस बँड
मुंबई, १६ फेब्रुवारी २०२६: पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी लिमिटेड (PNGS Reva Diamond Jewellery Limited) ने स्मार्ट होरायझन कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (पूर्वीचे श्रेणी कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड) सल्ल्याने, आपल्या पहिल्या सार्वजनिक समभाग विक्रीसाठी (IPO) प्रति शेअर ₹३६७ ते ₹३८६ चा किंमतपट्टा निश्चित केला आहे. या शेअर्सचे दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹१० आहे.

कंपनीचा आयपीओ मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल आणि गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान ३२ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३२ च्या पटीत बोली लावू शकतात. आयपीओपूर्व आणि प्राईस बँड जाहिरातीच्या तारखेनुसार आऊटस्टॅन्स्डिंग इक्विटी शेअर्सची संख्या २,१८६६,४०० (दर्शनी मूल्य ₹१०) इतकी आहे. हा आयपीओ ₹३,८०० दशलक्ष पर्यंतचा नवीन इश्यू (Fresh Issue) आहे.

निधीचा वापर

या नवीन इश्यूमधून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ₹२,८६५.६४ दशलक्षचा वापर १५ नवीन स्टोअर्स उभारण्यासाठी केला जाईल. तसेच, ₹३५४.०० दशलक्ष या १५ नवीन स्टोअर्सच्या लाँचशी संबंधित विपणन (Marketing) आणि प्रचारात्मक खर्चासाठी वापरले जातील, ज्याचा उद्देश ‘रेवा’ (Reva) या फ्लॅगशिप ब्रँडची स्थानिक जागरूकता आणि दृश्यमानता वाढवणे हा आहे. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाईल.

‘मेक इन इंडिया’ला बळ! AM/NS India कडून दोन नवीन प्रीमियम स्टीलची घोषणा; घरगुती उपकरणांच्या निर्मितीत क्रांती येणार

वाटप प्रक्रिया

हा इश्यू ‘बुक-बिल्डिंग’ प्रक्रियेद्वारे राबवला जात आहे. यामध्ये निव्वळ इश्यूच्या (Net Issue) किमान ७५% हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB), तर जास्तीत जास्त १५% हिस्सा बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) आणि १०% हिस्सा किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी (Retail) राखीव ठेवण्यात आला आहे.

३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत कंपनीचे ऑपरेशन्समधून मिळालेला महसूल ₹१,५६७.१८ दशलक्ष होता आणि निव्वळ नफा ₹२०१.३३ दशलक्ष होता. आर्थिक वर्ष २०२५ (FY25) मध्ये कंपनीचा महसूल ₹२,५८१.८३ दशलक्ष होता, जो आर्थिक वर्ष २०२३ (FY23) मधील ₹१,९८८.४८ दशलक्षच्या तुलनेत वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये निव्वळ नफा ₹५९४.७४ दशलक्ष होता, जो आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ₹५१७.४७ दशलक्ष होता. स्मार्ट होरायझन कॅपिटल ॲडव्हायझर्स हे या इश्यूचे ‘बुक रनिंग लीड मॅनेजर’ आहेत आणि बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे ‘रजिस्ट्रार’ आहेत.

परदेशी पर्यटकांसाठी NPCI कडून मोठी भेट; आता भारतात येणारे पाहुणेही वापरू शकणार UPI

Web Title: Pngs rewa diamond jewellerys ipo to open on this date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • Business News
  • investment
  • IPO

संबंधित बातम्या

Budget Planning Tips : पगार येताच खिसा रिकामा होतोय? बचतीसाठी फॉलो करा सोप्या टिप्स
1

Budget Planning Tips : पगार येताच खिसा रिकामा होतोय? बचतीसाठी फॉलो करा सोप्या टिप्स

तुमच्या लाडक्या Dunkin’ Donuts चा भारतातील प्रवास संपला! एकामागून एक स्टोअर्स होणार बंद, नेमकं कारण काय?
2

तुमच्या लाडक्या Dunkin’ Donuts चा भारतातील प्रवास संपला! एकामागून एक स्टोअर्स होणार बंद, नेमकं कारण काय?

टॅफेची 2.14 लाखांहून अधिक ट्रॅक्टर्स विक्री; FY26 मध्ये स्थानिक बाजारपेक्षाही जलद वाढ
3

टॅफेची 2.14 लाखांहून अधिक ट्रॅक्टर्स विक्री; FY26 मध्ये स्थानिक बाजारपेक्षाही जलद वाढ

FedEx चा ‘Chennai Super Kings’सोबत भागीदारीचा दुसरा टप्पा सुरू; तीन खास डिजिटल फिल्म्स लाँच
4

FedEx चा ‘Chennai Super Kings’सोबत भागीदारीचा दुसरा टप्पा सुरू; तीन खास डिजिटल फिल्म्स लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.