...तुम्हीही आयटीआर भरला नाही, ...होऊ शकते जेल; केवळ चार दिवस शिल्लक!
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अखेरची मुदत जवळ आली आहे. अर्थात ३१ जुलै २०२४ ही आयटीआर रिटर्न भरण्याची शेवटची मुदत असल्याने करदात्यांना कराचा भरणा करण्यासाठी केवळ चारच दिवस शिल्लक राहिले आहेत. विशेष म्हणजे आयकर विभागाने सर्व करदात्यांना कर भरणे अनिवार्य केले असून, सरकारचा आयटीआर भरण्यासाठीची मुदत वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले जात आहे.
काय म्हटलंय आयकर विभागाने?
परिणामी, आता करदात्यांना दंड न भरता आयटीआर भरायचा असेल, तर तुम्हाला 31 जुलैपूर्वी आयटीआर भरावा लागणार आहे. अन्यथा यानंतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. इतकेच नाही तर आयकर विवरणपत्र भरले नाही तर करदात्यांना तुरुंगात देखील जावे लागू शकते. एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत केंद्रीय आयकर विभागाने म्हटले आहे की, “आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयकर रिटर्न 31 जुलैपूर्वी भरावे लागणार आहे. आयटीआर दाखल केल्याने रिफंड ते व्हिसा अर्ज आणि कर्ज घेण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी मदत होते. करदात्यांनी 31 जुलैपर्यंत आयटीआर भरला नाही तर कलम 234A अंतर्गत व्याज आणि कलम 234AF अंतर्गत दंड देखील लागू केला जाऊ शकतो.”
Kind Attention Taxpayers!
Do remember to file your ITR if you haven’t filed yet.
The due date to file ITR for AY 2024-25 is 31st July, 2024.#FileNow pic.twitter.com/cm3yxE3u8R— Income Tax India (@IncomeTaxIndia) July 26, 2024
‘या’ तारखेपर्यंत भरता येणार उशिराने आयटीआर
विशेष म्हणजे काही कारणामुळे तुम्ही आपला आयटीआर वेळेत दाखल करू शकला नाही. तर तुम्हाला उशीरा आयटीआर फाईल केल्याने दंड भरावा लागेल. प्राप्तिकर कायद्यानुसार, उशीरा दंड आणि करावरील व्याजासह 31 डिसेंबर 2024 पर्यंत आयटीआर दाखल करता येईल. या तारखेनंतर आयटीआर दाखल करण्याची संधी मिळणार नाही. यानंतर आयकर विभागाकडून थेट कारवाई केली जाते.
किती भरावा लागेल दंड?
दरम्यान, 31 जुलैपर्यंतनंतर उशीरा आयटीआर फाइलिंगसाठी करदात्यांना 5000 रुपयांपर्यंत निश्चित दंड भरावा लागू शकतो. त्याच वेळी तज्ञांच्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2024 पर्यंत आयटीआर भरला नाही तर आयकर विभागाकडून करदात्यांना नोटीस पाठविली जाऊ शकते. यानंतर करदात्यांच्या कराच्या रकमेवर 50 ते 200 टक्के दंड आकारला जाऊ शकतो. देय तारखेपासून विवरणपत्र भरेपर्यंत कराच्या रकमेवर व्याज आकारले जाऊ शकते. काही परिस्थितींमध्ये करदात्यांच्या विरोधात खटला देखील दाखल केला जाऊ शकतो. आयकर विभागाला हा अधिकार आहे.
दाखल होऊ शकतो गुन्हा
केंद्रसर कारच्या आयकर कायद्यानुसार, आयटीआर न भरल्यास 6 महिन्यांपासून ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. मात्र त्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. आयकर विभाग अशा प्रकरणांमध्येच गुन्हा देखील दाखल करू शकतो. जेव्हा कराची रक्कम 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल. इन्कम टॅक्स विभाग करदात्यांना सतत आयटीआर फाइल करण्यास सांगत आहे.