Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गोकुळ’च्या दूध दरात वाढ; वाचा… आता एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागणार!

राज्यातील आघाडीचा दूध संघ असलेल्या गोकुळकडून गाईच्या दूध दरात प्रतिलिटर मागे २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मागील महिन्याच्या सुरुवातीला मदर, अमूल आणि पराग डेअरीकडून गाईच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता गोकुळ देखील दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 05, 2024 | 05:03 PM
गोकुळच्या दूध दरात झाली वाढ; म्हैस-गायीचे दूध 'इतक्या' रुपयांनी महागले

गोकुळच्या दूध दरात झाली वाढ; म्हैस-गायीचे दूध 'इतक्या' रुपयांनी महागले

Follow Us
Follow Us:

महागाईने आधीच सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून, आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील प्रमुख दूध उत्पादक संघ असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाने गाईच्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यानुसार आता गाईच्या दुध दरात प्रति लिटरमागे २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही दरवाढ तात्काळ लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा मिळणार आहे. तर ग्राहकांना मात्र, याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

काय आहे नवीन दूध दर?

सध्याच्या घडीला राज्यभरात गोकुळचे गाईचे दुध हे ५४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. ज्यात आता आणखी दोन रुपयांनी वाढ करण्यात आल्याने, ग्राहकांना आता एक लिटर गाईच्या दुधासाठी ५६ रुपये मोजावे लागणार आहे. १ जुलैपासून ही दरवाढ लागू करण्यात आली असून, ही दरवाढ प्रामुख्याने मुंबई आणि पुणे या ठिकाणच्या ग्राहकांना लागू करण्यात आल्याचे गोकुळकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘या’ दूध संघांकडून दरात वाढ

दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीला मदर डेअरीकडून दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपये वाढ करण्यात आली होती. तर अमूलने देखील आपल्या दूध दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर कर्नाटकातील नंदिनी संघानेही दर वाढवले होते. त्यानंतर आता गोकुळने आपल्या दुध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या घडीला खुल्या बाजारात दुधाचे भाव ९० रुपये प्रति लिटर आहे. तर गोकुळ दूध ७२ रुपये लिटर दराने मिळत आहे. मदर डेअरीचे एक लिटर दूध ७६ रुपये तर अमूल दूध ६८ रुपयांना विकले जात आहे.

Web Title: Increase in milk price of gokul 56 rupees will be charged for one liter now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 04:59 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Milk Prices

संबंधित बातम्या

कृषी विभागाचा दणका, खत विक्रीचे 107 परवाने निलंबित; तब्बल 7 केंद्रांवर गुन्हे दाखल
1

कृषी विभागाचा दणका, खत विक्रीचे 107 परवाने निलंबित; तब्बल 7 केंद्रांवर गुन्हे दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.