
'नवभारत' शिखर परिषदेत भारत–कजाकिस्तान व्यापार संबंधांना नवे बळ
Navbhart Kazakhstan Event: “वसुधैव कुटुंबकम” या तत्वाचे पालन केल्याने आज भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी भारताची अर्थव्यवस्था बनली आहे. आता जग देखील भारताच्या वसुधैव कुटुंबकम मंत्राचा अवलंब करत आहे. यामुळे जगासाठी समृद्धीचा मार्ग मोकळा होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या ११ वर्षांत प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. ११ वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती, परंतु आता ती पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. लवकरच अमेरिका आणि चीननंतर भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल”, असा विश्वास प्रसिद्ध बँकर, गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
कजाकिस्तानचे प्रमुख व्यावसायिक शहर अल्माटी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सोमवारी नवभारत आंतरराष्ट्रीय व्यवसाय उत्कृष्टता शिखर परिषदेचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता फडणवीस उपस्थित होत्या. याशिवाय नवभारत समूहाचे संचालक वैभव माहेश्वरी, अतिथी म्हणून कजाकिस्तानचे माजी राजदूत आणि व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष बुलत सारसेनबायेव, स्टेपनोगोस्र्कचे महापौर, अल्माटी शहर आर्थिक मंडळाचे उपसंचालक झेनसिल सेब्रुली, कजाकिस्तानच्या कौशल्य विकास गटाचे संचालक अल्मास कोझिकोव्ह हे उपस्थित होते. यावेळी देश-परदेशात व्यवसायवृद्धीने भारताला गौरव मिळवून देणाऱ्या उद्योजकांना फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा : Todays Gold-Silver Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ! लग्नसराईत किंमतींनी तोडले विक्रम
भारतीय उद्योजकांना गुंतवणूक करण्याचे आवाहन
कजाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत आणि व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षांचे सल्लागार बुलत सरसेनबायेव म्हणाले की, ‘नवभारत ‘ने आपल्या सुंदर शहरात ही जागतिक परिषद आयोजित करून कौतुकास्पद काम केले आहे. अनेक भारतीय उद्योगपतींनी कजाकिस्तानमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्टील, तेल आणि वायू, इलेक्ट्रॉनिक्स आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड गुंतवणूकीची क्षमता आहे. भारतीय उद्योजकांनी गुंतवणूक करावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले
दोन्ही देशांमधील संबंध दृढ होतील
शिखर परिषदेत भारत आणि कजाकिस्तानमधील उद्योजकांना संबोधित करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस म्हणाल्या की, भारत आणि कजाकिस्तानमधील उद्योजकांचे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत आणि ‘नवभारत’ने अल्माटी येथे आयोजित केलेल्या या जागतिक व्यापार शिखर परिषदेमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होतील, द्विपक्षीय व्यापार वाढेल आणि गुंतवणुकीच्या संधी वाढतील. ‘नवभारत’ ने भारतातील उदयोन्मुख उद्योजकांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे आणि हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
भारत हा कजाकिस्तानचा खरा मित्र
अल्माटी शहर आर्थिक मंडळाचे उपसंचालक झेनसिल सेब्रुली यांनी कजाकिस्तानचा खरा मित्र म्हणून भारताचे वर्णन केले. ते म्हणाले की, नवभारत शिखर परिषद भारत आणि कजाकिस्तानच्या आर्थिक विकासाला एक नवीन दिशा देईल. नवभारत जागतिक व्यापार शिखर परिषदेचा संदेश जगभरातील व्यवसाय विस्तार आणि गुंतवणूक संधी शोधणाऱ्या प्रत्येक भारतीय उद्योगपतीपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.