Diwali Bonus 2025-26: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सरकारने स्पष्ट सांगितले आहे की, हा बोनस सगळ्यांनाच नाही, तर पात्र कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे. यामध्ये MTS म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफ येतो. त्याचबरोबर ग्रुप C मधील कर्मचारी आणि नॉन गॅझेटेड ग्रुप B मधील कर्मचारी यांना याचा फायदा होईल.
फक्त एवढेच नाही, गावखेड्यात पोस्ट वाटणारे आपले GDS म्हणजे ग्रामीण डाक सेवक यांनाही या बोनस मध्ये घेतले आहे. त्यांना एक्स-ग्रेशिया बोनस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. जे लोक रोजंदारीवर किंवा तात्पुरत्या स्वरूपात काम करतात, अशा नैमित्तिक कामगारांसाठी सुद्धा वेगळा तदर्थ बोनस ठेवला आहे.
कर्मचाऱ्यांना लॉटरी… दिवाळीपूर्वी मिळणार तब्बल 60 दिवसांचा घसघशीत …
सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे किती बोनस मिळणार. सरकारच्या नियमानुसार हा बोनस 60 दिवसांच्या पगाराइतका असणार आहे. पण इथे एक अट आहे. पगाराची मर्यादा 7000 रुपये ठेवली आहे. गणना करताना महिन्याचा पगार 7000 रुपयांच्या वर धरला जाणार नाही.
जर तुम्ही 7000 रुपये पगार धरून हिशोब केला तर जास्तीत जास्त 13,816 रुपये बोनस मिळू शकतो. हा आकडा कमाल आहे. प्रत्येकाला एवढाच मिळेल असे नाही.टपाल विभागाने 16 ऑक्टोबर 2026 रोजी याचे अधिकृत पत्र काढले आहे. त्यात सांगितले आहे की, प्रत्येक कर्मचाऱ्याचा बोनस वेगळा असेल. तुमची पात्रता काय आहे, तुमचा सरासरी पगार किती होता, तुम्ही वर्षभरात किती दिवस काम केले, यावरून तुमचा बोनस ठरेल.
Diwali Bonus Rules 2026: दिवाळीला बोनस मिळणार की नाही …
MTS कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार बोनस दिला जाईल. ग्रुप C वाल्यांना PLB म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस मिळेल जो 60 दिवसांचा असेल. ग्रुप B मधील जे अराजपत्रित कर्मचारी आहेत आणि नियमात बसतात, त्यांनाही बोनस मिळेल. GDS कर्मचाऱ्यांना एक्स-ग्रेशिया बोनस मिळणार आहे.
सरकारने बोनस काढण्यासाठी एक फॉर्म्युला दिला आहे. तो असा आहे –
बोनस = सरासरी पगार गुणिले 60 भागिले 30.4इथे 30.4
हा एका महिन्याचा सरासरी आकडा आहे. समजा तुमचा पगार 7000 आहे, तर 7000 गुणिले 60 = 4,20,000. त्याला 30.4 ने भागले की उत्तर येते 13,815.78 म्हणजे जवळपास 13,816 रुपये.
जर तुमचा पगार कमी असेल किंवा तुम्ही 6 महिनेच काम केले असेल तर बोनस कमी मिळेल. पगार मोजताना बेसिक पगारासोबतच DA, SB भत्ता, डेप्युटेशन भत्ता असे भत्ते पण जोडले जातात. पण लक्षात ठेवा, जरी तुमचा पगार 40 हजार असला तरी बोनससाठी तो 7000 रुपयेच धरला जाईल. त्यापेक्षा जास्त धरला जाणार नाही.






