Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातातील सर्वात मोठे प्रदर्शन! आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार

प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते होणार 89 व्या सर्वसाधारण सभेचे उद्घाटन, पीयूष गोयल यांच्या हस्ते भारत मंडपम इथे आयोजित आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 15, 2025 | 04:44 PM
भारतातातील सर्वात मोठे प्रदर्शन!आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार (फोटो सौजन्य-X)

भारतातातील सर्वात मोठे प्रदर्शन!आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

भारत आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या (International Electrotechnical Commission – IEC) 89 व्या सर्वसाधारण सभेचे यजमानपद भूषवणार असून, नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे येत्या 15 ते 19 सप्टेंबर 2025 या काळात ही सर्वसाधारण सभा होणार आहे. या आयोजनाबाबत भारतीय मानक संस्थेने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने 100 पेक्षा जास्त देशांमधून 2,000 पेक्षा जास्त तज्ञ एकत्र येणार आहेत. हे सर्वजण शाश्वत, पूर्णतः इलेक्ट्रिक आणि परस्परांशी जोडलेल्या जगाच्या जडणघडणीसाठी आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक मानके निश्चित करण्यावर विचारमंथन करतील. भारत चौथ्यांदा आणि 1960, 1997 आणि 2013 नंतर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या या प्रतिष्ठित सर्वसाधारण सभेचे यजमानपद भूषवत आहे.

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते या सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल भारत मंडपम इथे आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. हे प्रदर्शन विद्युत – तांत्रिक क्षेत्राशी संबंधीत भारतातातील आजपर्यंतचे सर्वात मोठे प्रदर्शन असेल. या प्रदर्शनातून इलेक्ट्रिक गतिशीलता (मोबिलिटी), स्मार्ट लाइटिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानविषयक उत्पादनामधील नवोन्मेषाचे दर्शन घडेल. यासोबतच भारतातील स्टार्टअप्ससाठी एक जागतिक संपर्काचा विस्तार करण्यासाठीचे व्यासपीठही यामुळे उपलब्ध होईल.

फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी गुंतवणूकदार सावध, सेन्सेक्स 118 अंकांनी घसरला; निफ्टी 25069 वर बंद झाला

स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा विषयक उपाय योजनांसाठी महत्त्वाच्या असलेल्या लो व्होल्टेज डायरेक्ट करंट (LVDC) या क्षेत्रात मानकीकरणासाठी भारत जागतिक सचिवालयाची भूमिकाही बजावणार आहे. जागतिक लोकसंख्येपैकी 99% लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारे आणि जागतिक व्यापार मूल्यापैकी जवळपास 20% व्यापारावर प्रभाव असलेले तब्बल 170 देश आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाचे सदस्य असल्याची माहिती आयोगाचे उपाध्यक्ष विमल महेंद्रू यांनी दिली आहे. भारत लो व्होल्टेज डायरेक्ट करंट या क्षेत्राच्या मानकीकरणाचे नेतृत्व करत असून, यामुळे स्वच्छ उर्जा तंत्रज्ञान विषयक मानके विकसित करण्याच्या जागतिक प्रयत्नांना बळकटी मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय मानक संस्थेचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी गुणवत्ता आणि मानकीकरणाला शिक्षण जगताशी जोडण्यासाठी संस्थेच्या प्रयत्नांविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांचे गट आणि सहा महिन्यांच्या संरचित आंतर्वासिता (इंटर्नशिप) कार्यक्रमाच्या माध्यमातून, युवा व्यावसायिक उद्योजकांना उद्योग क्षेत्र आणि मानक विकास प्रक्रियेविषयी ओळख करून दिली जात असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या युवा व्यावसायिक तज्ञ कार्यक्रमांतर्गत, जगभरातील 93 युवा व्यावसायिक तज्ञां यासंबंधिच्या कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे आणि उद्योग भेटींमध्ये सहभागी होणार आहे, या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाची नवी पिढी तयार होईल असे त्यांनी सांगितले. भारतीय मानक संस्थेचे महासंचालक (नियुक्त) संजय गर्ग आणि उपमहासंचालक चंदन बहल हे देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. चंदन बहल यांनी आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या सर्वसाधारण सभा 2025 निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. या जागतिक सभेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाल्याने, नवोन्मेष, शाश्वतता आणि गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा क्षेत्रामधील भारताच्या नेतृत्वाला अधिक बळकटी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्वसाधारण सभेत भविष्यातील पिढीच्या अनुषंगाने मानकांची रचना करण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञान विषयक आणि व्यवस्थापन विषयक समित्यांच्या 150 पेक्षा जास्त बैठका होतील. तसेच, काही महत्त्वाच्या उदयोन्मुख क्षेत्रांवर भर असलेल्या कार्यशाळांची एक मालिकाही आयोजित केली जाणार आहे. याअंतर्गत शाश्वत जगाला चालना (15 सप्टेंबर), कृत्रिम बुद्धिमत्ता : नवोन्मेषाच्या आधारे भविष्याला आकार (16 सप्टेंबर), ई-मोबिलिटीच्या भविष्याला आकार (17 सप्टेंबर), आणि मानकांच्या माध्यमातून अधिक सर्वसमावेशक जगाची निर्मिती तसेच पूर्णतः इलेक्ट्रिक आणि परस्पराशी जोडलेल्या समाजाची निर्मिती (18 सप्टेंबर) या उपक्रमांचे आयोजन केले जाई. जागतिक सर्वेक्षणांतून स्वच्छ आणि हरित उपायजोनांना नागरिकांकडून प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाचे संपर्क संचालक जेम्स वुड यांनी या पत्रकार परिषदेत दिली. भारत हा शाश्वततेचा सच्चा पुरस्कर्ता असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. नवी दिल्ली हे या जागतिक संवादाच्या आयोजनासाठीचे एक आदर्श ठिकाण असल्याचे ते म्हणाले.

यानिमित्ताने भारत मंडपम इथे भारतीय मानक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या प्रदर्शनात 75 प्रदर्शक सहभागी होणार आहेत. यात आघाडीचे उद्योग, संस्था आणि स्टार्टअप्सचा समावेश असेल. हे प्रदर्शक आंतरराष्ट्रीय मानके उत्पादनाचा विकास आणि नवोन्मेषाला कशा रितीने चालना दिली जात आहे, त्याबद्दलची कल्पक स्वरुपातील माहिती प्रदर्शित करतील. हे प्रदर्शन 16 ते 19 सप्टेंबर 2025 या काळात दुपारी 2:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल. तसेच https://gm2025.iec.ch/ या दुव्याला भेट देऊन, यासाठीच्या विनामूल्य प्रवेशाकरता आगाऊ नोंदणी करता येणार आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांच्या प्रवेशाची सोय प्रवेशद्वार क्रमांक 10 आणि प्रवेशद्वार क्रमांक 4 वर करण्यात आली आहे. या प्रदर्शनाला शाळा आणि महाविद्यालयांमधील 2,000 पेक्षा जास्त विद्यार्थी भेट देतील अशी अपेक्षा आहे.

शाश्वत जगाच्या जडणघडणीला प्रोत्साहन या संकल्पनेचे प्रतिक म्हणून, भारतीय मानक संस्थेच्या दालनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांना डिजिटल शाश्वततेची शपथ घेण्याचे आवाहन केले जाईल. अशा तऱ्हेने घेतलेल्या प्रत्येक शपथेसाठी, भारतीय मानक संस्था देशभरातील आपल्या कार्यालयांच्या परिसरात एक रोपटे लावून पर्यावरण संरक्षण आणि शाश्वततेप्रतीची आपली वचनबद्धता अधिक दृढ करणार आहे.

आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाची (IEC) स्थापना 1906 मध्ये झाली होती. ही संस्था विद्युत, इलेक्ट्रॉनिक आणि संबंधित तंत्रज्ञान विषयक आंतरराष्ट्रीय मानके विकसित करण्यासाठी प्रयत्न करणारी जगातील एक आघाडीची संस्था आहे. या संस्थेसोबत जगभरातील 30,000 तज्ञ जोडले गेले आहेत.

आता पैसे काढण्यासाठी ATM मध्ये जाण्याची गरज नाही, फोनवरच QR कोड स्कॅन करून पैसे काढा, कसं ते जाणून घ्या

Web Title: India will host the 89th general assembly of the international electrotechnical commission from 15 to 19 september

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 04:43 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Waqf Amendment Act 2025: वक्फ कायद्यावरील कोर्टाचा निकाल मुस्लिमांसाठी दिलासा की धक्कादायक? कोणत्या तरतुदींवर बंदी?
1

Waqf Amendment Act 2025: वक्फ कायद्यावरील कोर्टाचा निकाल मुस्लिमांसाठी दिलासा की धक्कादायक? कोणत्या तरतुदींवर बंदी?

Waqf Amendment Act 2025 बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! ‘इस्लामच्या अनुयायांशी संबंधित…”, कोर्टाने काय म्हटलं?
2

Waqf Amendment Act 2025 बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! ‘इस्लामच्या अनुयायांशी संबंधित…”, कोर्टाने काय म्हटलं?

India-US trade tariffs : सर्जियो भारतातील राजदूत होण्यास अयोग्य, नवारो मूर्ख…ट्रम्पच्या निर्णयांवर बोल्टन कडाडले
3

India-US trade tariffs : सर्जियो भारतातील राजदूत होण्यास अयोग्य, नवारो मूर्ख…ट्रम्पच्या निर्णयांवर बोल्टन कडाडले

India UN Vote : पॅलेस्टाईन हा वेगळा देश असावा… भारताने संयुक्त राष्ट्रात केले मतदान, पाहा किती देशांनी दिला पाठिंबा?
4

India UN Vote : पॅलेस्टाईन हा वेगळा देश असावा… भारताने संयुक्त राष्ट्रात केले मतदान, पाहा किती देशांनी दिला पाठिंबा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.