फोटो सौजन्य: iStock
ज्याप्रमाणे आपण पैसे कमावत असतो त्याच प्रमाणे ते खर्च देखील करत असतो. पण अनेकदा आपण आपल्या मेहनतीने कमावलेले पैसे नेमके खर्च कुठे करतो हेच आपल्याला समजत नसते. अशावेळी अनेक आर्थिक सल्लागार आपल्या महिन्याचा जमा खर्च कुठेतरी लिहून ठेवावा, असा सल्ला देत असतात. पण संपूर्ण भारतीय कोणत्या गोष्टींवर आपला पैसा खर्च करतात याबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का?
भारतात, लोक त्यांच्या पगाराच्या 33 टक्क्यांहून अधिक रक्कम ईएमआय भरण्यासाठी खर्च करतात. ‘हाऊ इंडिया स्पेंड्स: अ डीप डायव्ह इनटू कंझ्युमर स्पेंडिंग बिहेवियर’ या रिपोर्टमध्ये हे उघड झाले आहे. भारतातील सर्वात मोठी B2B SaaS फिनटेक कंपनी Perfios ने PwC India च्या सहकार्याने 19 फेब्रुवारी रोजी हा रिपोर्ट प्रसिद्ध केला. या अहवालात आपल्याला सांगितले आहे की भारतातील लोक त्यांच्या उत्पन्नाच्या किती टक्के कुठे खर्च करतात?
निफ्टी-सेन्सेक्स मोठ्या घसरणीसह बंद, मेटल इंडेक्स वगळता सर्व निर्देशांक घसरले
भारतीय ग्राहकांची वागणूक समजण्यासाठी 30 लाखांहून अधिक ग्राहकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये महानगरे आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये राहणारे लोक समाविष्ट आहेत ज्यांचे वेतन 20,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे.
सर्वेक्षणाच्या निकालांवरून असे दिसून आले की भारतातील लोक त्यांच्या उत्पन्नाच्या 33 टक्क्यांहून अधिक रक्कम कर्जाच्या ईएमआय भरण्यासाठी खर्च करतात.
या यादीत, आवश्यक खर्च दुसऱ्या स्थानावर आहेत, ज्यामध्ये घरभाडे, वीज बिल इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. लोक त्यांच्या उत्पन्नाच्या 39 टक्के रक्कम यावर खर्च करतात. यात लोक त्यांच्या उत्पन्नाच्या ३२ टक्के रक्कम अन्न, पेट्रोल इत्यादींवर खर्च करत आहेत.
भारतात लोक फॅशन, पर्सनल केअर आणि खरेदीवर सर्वाधिक खर्च करतात. कमाईच्या 62 टक्के रक्कम त्यांना जाते.
पगार वाढत असताना, बाहेर जेवण्याची किंवा घरून ऑनलाइन जेवण मागवण्याचे प्रमाणही वाढत आहे. लोक त्यांच्या कमाईचा मोठा भाग यावर खर्च करत आहेत.
सर्वेक्षणात असे आढळून आले की 20,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले लोक ऑनलाइन गेमिंगवर जास्तीत जास्त 22 टक्के खर्च करत आहेत. उत्पन्न वाढत असताना, ऑनलाइन गेमिंगवर खर्च करणाऱ्या लोकांची संख्या देखील कमी होते. 75,000 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले फक्त 12 टक्के लोकं ऑनलाइन गेमिंगवर खर्च करतात.
लोक सहसा आवश्यक वस्तूंवर खर्च करण्यासाठी ECS (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस) वापरतात. तेच बहुतेक जीवनशैली आणि आवश्यक खर्चासाठी UPI द्वारे पेमेंट केले जाते.