Jaya Bachchan Net Worth: 5 बंगले, 40 कोटींचे दागिने, 10 कोटी बँक बॅलन्स, जाणून घ्या जया बच्चन किती श्रीमंत आहेत (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Jaya Bachchan Net Worth Marathi News: राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आज त्यांचा ७७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने त्याच्या मालमत्तेबद्दल जाणून घेऊया. जया बच्चन आता राजकारणातही सक्रिय आहेत, अभिनेत्री आता राज्यसभेची खासदार आहे. जया बच्चन यांनी सत्यजित रे यांच्या महानगर (१९६३) चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
१९७१ मध्ये आलेल्या ‘गुड्डी’ चित्रपटातून जया बच्चन यांना विशेष ओळख मिळाली. जया बच्चन यांनी अभिमान, मिली, चुपके चुपके, कोरा कागज अशा अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. ही अभिनेत्री फक्त चित्रपटांपुरती मर्यादित नाही तर तिने राजकारणातही प्रवेश केला आहे. जया बच्चन शेवटचे २०२३ मध्ये रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये दिसल्या होत्या. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या संपत्तिबद्दल माहिती देणार आहोत.
रिपोर्ट्सनुसार, जया बच्चन आणि त्यांचे पती अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती १५०० कोटी रुपये आहे. त्यांनी २०२२-२३ या वर्षासाठी राज्यसभेत त्यांची एकूण मालमत्ता १.६३ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. या जोडप्याची एकत्रित जंगम मालमत्ता ८४९.११ कोटी रुपये आहे, तर स्थावर मालमत्ता ७२९.७७ कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीचे बँक बॅलन्स १०,११,३३,१७२ रुपये आहे, तर बिग बी यांचे बँक बॅलन्स १२०,४५,६२,०८३ रुपये आहे.
जया बच्चन यांनी शेअर्स, बाँड्स आणि डिबेंचरमध्ये ५,१८,५७,९२८ रुपये गुंतवले आहेत. तर, अमिताभ बच्चन यांनी यामध्ये १८२,४२,२९,४६४ कोटी रुपये गुंतवले आहेत. मनोरंजक गोष्ट म्हणजे, बच्चन दाम्पत्याने एनएसएस, पोस्टल सेव्हिंग्ज किंवा कोणत्याही प्रकारच्या विमा पॉलिसीमध्ये एक रुपयाही गुंतवलेला नाही.
रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीकडे ४०.९७ कोटी रुपयांचे दागिने आहेत. यासोबत ९.८२ लाख रुपयांची कार आहे. जया बच्चन यांच्याकडे ५१ लाख रुपयांची घड्याळे आहेत.
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचे मुंबईत जलसा आणि प्रतीक्षासह पाच बंगले आहेत. याशिवाय अमिताभ आणि जया यांच्याकडे अहमदाबाद, भोपाळ, गांधीनगर, नोएडा आणि पुणे येथेही जमीन आहे. दोघांनीही फ्रान्समधील ब्रिन्युगन प्लेजमध्ये ३,१७५ चौरस मीटर जमीन खरेदी केली होती, ज्याचा उल्लेख जया बच्चन यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. जया बच्चन यांचे लखनौमध्ये १.२२ कोटी हेक्टर शेती आहे, ज्याची किंमत २२ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.