आश्चर्यम..! 48 वर्षांपुर्वी केला होता नोकरीसाठी अर्ज; आता... कुठे मिळाले कंपनीकडून पत्र; वाचा... सविस्तर
सध्याच्या घडीला अनेक जण नव्याने नोकरीसाठी अर्ज करत असतात. तर काही जण हे आपली नोकरी बदलण्यासाठी अन्य संस्थेमध्ये अर्ज करत असतात. मात्र, तुम्ही एखादी संस्था किंवा कंपनीमध्ये अर्ज केल्यानंतर त्या अर्जावर तब्बल ४८ वर्षांनी प्रतिउत्तर मिळाले तर… तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. मात्र हे अगदी खरे असून, एका ७० वर्षीय महिलेला तिने ४८ वर्षांपुर्वी केलेल्या अर्जावर आता रिप्लाय मिळाला आहे. त्यामुळे सध्या या अनोख्या गोष्टीबाबत सध्या सर्वदूर चर्चा पाहायला मिळत आहे.
ब्रिटनमधील (युनायटेड किंग्डम) ७० वर्षीय टिजी हडसन यांनी पाच दशकांपूर्वी बाईक स्टंट रायडर बनण्याचे स्वप्न पाहिले होते. या नोकरीसाठी त्यांनी जानेवारी 1976 मध्ये अर्ज केला होता. त्या नेहमी या कंपनीच्या उत्तराची वाट पाहत होत्या. पण काहीच प्रतिसाद आला नाही. कंपनीने पत्राला प्रतिसाद का दिला नाही, याची त्यांना आयुष्यभर खंत वाटत होती. अशातच या महिलेला नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर आता तब्बल ४८ वर्षांनी हे पत्र मिळाले आहे. हे पत्र मिळाल्याने तिला आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, सध्या त्या ७० वर्षांच्या असून, त्या काम करण्यास असमर्थ आहेत. बाइक स्टंट रायडर हे उतारवयात करणे शक्य नसल्याचे त्या सांगतात.
(फोटो सौजन्य – istock)
नेमके कुठे अडकले होते पत्र?
नोकरीसाठी पत्र लिहिल्यानंतर हडसन हिने ते पोस्टाने पाठवले. मात्र, हे पत्र संबंधित कंपनीपर्यंत कधीही पोहोचले नाही. आणि ते पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. वास्तविक, तिचे हे पत्र पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचले होते. परंतु, कंपनीच्या पत्त्यावर पोहोचले नव्हते. हे पत्र तब्बल ४८ वर्षे पोस्ट ऑफिसमध्ये ड्रॉवरच्या मागे अडकून राहिले. नंतर ते आता कंपनीकडे पाठवण्यात आले.
काय मिळाले अर्जावर उत्तर
हडसन हिला ४८ वर्षांनंतर उत्तरासह हे पत्र मिळाले आहे. त्यावर जॉब ॲप्लिकेशन, “स्टेन्स पोस्ट ऑफिसद्वारे डिलिव्हरी विलंबित” असे वाचले. जे ड्रॉवरच्या मागे सापडले. त्यास सुमारे 50 वर्षे उशीरा झाला आहे. त्यावर ‘You Now Who’ अशी सही आहे. हे पत्र मिळाल्यानंतर हडसन यांनी म्हटले आहे की, हे पत्र त्यांना परत करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्या म्हणाला की नेहमी प्रश्न पडतो की, त्यांना नोकरीबद्दल उत्तरे का मिळत नाहीत.
देश बदलल्यानंतर मिळाले पत्र
हडसन हिला हे पत्र 50 वर्षांनंतर आणि 4 किंवा 5 देश बदलल्यानंतर मिळाले आहे. हडसन म्हणते की तिला हे पत्र कोणी परत केले किंवा ते तिच्यापर्यंत कसे पोहोचले हे माहित नाही. हडसन म्हणतात, इतक्या दिवसांनी हे पत्र परत मिळणे अविश्वसनीय वाटते. त्यांनी मला कसे शोधले हे एक रहस्य आहे. यावरही त्या आश्चर्य व्यक्त करतात.