
Junior UPI Wallet Launch
Junior UPI Wallet : RBI ने लहान मुलांसाठी खास भेट आणली आहे. ज्यामुळे मुलांना आर्थिक ज्ञान मिळून देण्यासाठी फायदा होईलच, तसेच मुलांना प्रत्यक्ष आर्थिक साक्षरतेचा अनुभव घेता येईल. आरबीआयने मुलांसाठी जुनियो पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडला मान्यता दिली असून, बँक खात्याशिवाय मुलांना आता UPI वॉलेट द्वारे व्यवहार करता येणार आहे. त्यामुळे त्यांच्या खर्चावर पालकांना सुद्धा नियंत्रण ठेवता येईल.
आरबीआयकडून मुलांसाठी जुनियो यूपीआय वॉलेट उपलब्ध करण्यात येणार आहे, त्यामुळे ते बँक अकाउंटशिवाय पेमेंट करू शकतील. आपत्कालीन काळात त्यांना त्याचा वापर करता येईल. यूपीआय वॉलेटद्वारे मुलं जेव्हा सुरक्षित डिजिटल पेमेंट करतील तेव्हा त्यांना व्यावहारिक पद्धतीने आर्थिक साक्षरता सुद्धा शिकवली जाईल. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारात भर पडेल. जुनियो पेमेंट्स या सेवेवर खर्च मर्यादा सेट करण्यास पालकांना अधिकार असून ते त्याची अनुमती देतात त्यामुळे प्रत्येक व्यवहाराचे रिअल-टाइम मॉनिटरिंग करता येईल.
हेही वाचा : Credit Card Guide : डिजिटल युगातील क्रेडिट कार्ड…; आर्थिक स्वातंत्र्य की कर्जाचे जाळे?
या तंत्रज्ञानाच्या युगात, अन्नापासून वीज बिलांपर्यंत माणसं प्रत्येक गोष्टीसाठी रोख न वापरता डिजिटल पेमेंट करतात. कारण, डिजिटल पेमेंट सुरक्षित असून रोख रक्कम सोबत घेऊन फिरायची गरज नाही. आता त्याला असून सोईस्कर बनवण्यासाठी आरबीआयने मुलांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. जुनियो पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडला रिझर्व्ह बँकेने प्रीपेड पेमेंट साधनं जारी करण्यास परवानगी दिली आहे.
RBI ने तरुण आणि मुलांसाठी सुरक्षित डिजिटल पेमेंट प्रणाली तयार करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल असल्याचे मानले जाते. आरबीआयकडून मान्यता मिळताच जुनियो लवकरच मुलांसाठी यूपीआय-लिंक्ड डिजिटल वॉलेट ग्राहकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. ज्यामुळे बँक खात्याशिवायही वापरकर्ते पेमेंट करू शकतील.
हेही वाचा : SBI Mutual Fund IPO : SBI फंड्स मॅनेजमेंट IPO मंजूर – जाणून घ्या सर्व तपशील, गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी
Digital India मध्ये नवा टप्पा
जुनिओचे वॉलेट खूप खास आहे कारण मुलाचे बँकेत खाते नसले तरीही ते UPI QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकतात. NPCI च्या UPI सर्कल उपक्रमाशी ते जोडलेले आहे. ज्यामुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या UPI खात्याशी लिंक करता येईल, जेणेकरून त्यांना त्यांच्या मुलांच्या व्यवहारात नियंत्रण ठेवता येईल. पैसे व्यवस्थापन आणि खर्च कसे नियंत्रित करायचे याचे प्राथमिक ज्ञान देण्यात सोपं होईल.